बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे | ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी | How to link aadhar card with bank account

how to link aadhar card with bank account: मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात विविध कामांसाठी आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट ठरत आहे. जर आपल्याला विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, कोणती सेवा घ्यायची असेल तर आपल्याला आधार कार्ड ची आवश्यकता भासते. त्याच सोबतच आधार कार्ड हे बँक  खात्याशी जोडलेले असणे देखील या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असते. जर आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक केलेले नसेल तर बऱ्याच वेळेस आपल्याला योजनांमधून जे अनुदान मिळते ते मिळत नाही. किंवा ते मिळण्यास अडचणी येतात.

link aadhar card with bank account

 जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोघी पद्धतीने करू शकतात. आपल्या आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडल्याचे खूप फायदे आहेत ते आता आपण जाणून घेऊया.

हे देखील वाचा: आधार कार्ड अपडेट कसे करायचे? Mobile number, Address अशा पद्धतीने करा अपडेट

 आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केल्याने होतात हे फायदे(Benefits of linking aadhaar with bank account)

  • बँक खात्याशी आधार लिंक केल्यास शिष्यवृत्ती आणि मनरेगा पेन्शन निधीचे थेट वितरण आपल्या खात्यामध्ये होते.
  •  आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये फसवणुकीच्या घटना घडण्याची शक्यता कमी  किंवा नसतेच. कारण आधार कार्ड साठी सुरक्षा निकष कठोर असतात.
  • आधार कार्ड एक व्हॅलिड केवायसी कागदपत्र  आहे आणि आपल्या बँकेची या प्रक्रियेस जोडण्यास मदत होईल.
  • व्यवहारामध्ये पारदर्शकता प्रस्थापित होत असल्याने बँक खात्याशी आधार लिंक केल्याने सार्वजनिक खर्च गळती रोखली जाते.
  •  आधार लिंक केल्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून बँक खात्यापर्यंत पोहोचणे सुलभ होते.

 चला तर मित्रांनो आता आपण पाहिले तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात ते. आता आपण पाहूया आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक कसे करावे. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

हे देखील वाचा: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता

  • सर्वप्रथम आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेत भेट द्यावी लागेल.
  •  तुमचे इ आधार किंवा आधार कार्ड तेथे द्यावे.
  •  लिंकिंग प्रोसेस साठी एक फॉर्म भरावा लागेल.
  •   आता आधार कार्ड ची स्वप्रामाणिक प्रत(self attested) घेऊन फॉर्म सबमिट करा.
  •  त्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुरू होईल आणि तुमच्या आधार कार्ड  बँक खात्याशी लिंक केले जाईल.
  •  ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या aadhaar bank link status ऑनलाइन तपासू शकतात.

हे देखील वाचा: वृद्धापकाळत नियमित पेन्शन मिळवण्यासाठी जाणून घ्या काय आहे SBI चा हा खास प्लान

  • सर्वप्रथम तुमच्या अकाउंट असलेल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग वेबसाईटवर लॉग इन करा.
  •  तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
  •  लिंक केले जाणारे खाते निवडा, पुढे तुमचा आधार कार्ड क्रमांक तेथे भरा.
  •  सबमिट या बटनवर क्लिक करा.
  •  आता स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरची शेवटचे दोन आकडे दिसतील.
  •  आपल्याला एसएमएस वर लिंक करण्यासाठी आपल्या विनंतीची स्थिती प्राप्त होईल.
  • मित्रांनो, इंटरनेट बँकिंग द्वारे ही प्रक्रिया वेगवेगळ्या बँकांसाठी थोडीशी वेगवेगळी असू शकते. परंतु स्टेप मात्र जवळजवळ अशाच असतील.

हे देखील वाचा: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन

 मोबाईल ॲपच्या माध्यमातून बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे.

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँकेचे मोबाईल ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल.
  • येथे तुम्हाला तुमचं  बँकेच्या डिटेल्स ने रजिस्ट्रेशन करावे लागेल. नंतर लॉगिन करा.
  • तुम्हाला या ॲपमध्ये “ सर्विस रिक्वेस्ट” किंवा ” रिक्वेस्ट” असे पर्याय दिसतील.  त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला “ आधार लिंक करा”  किंवा “ बँक खात्याशी आधार लिंक करा” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड कोणत्या खात्याशी लिंक करायचे आहे हे विचारले जाईल जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असतील. एकच खात असेल तर हे विचारले जाणार नाही.
  • ते खाते निवडा. पुढे आपला आधार कार्ड क्रमांक भरा.
  • ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी “अपडेट”  किंवा तेथे दिसत असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची आधार बँक लिंकिंग प्रोसेस पूर्ण झालेली आहे. 

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा? How to see land map online?

aadhar card update bank: तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक झाले आहे की नाही हे कसं तपासायचे?

मित्रांनो, वर दिलेल्या कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक अकाउंट सोबत जोडले असेल तर, तुम्हाला एक ईमेल किंवा एसएमएस प्राप्त होईल. या मध्ये नमूद केलेले असेल की आपल्या बँक खात्याशी आपला आधार कार्ड नंबर लिंक झालेला आहे. तरी जर  तुम्हाला इमेल किंवा एसएमएस प्राप्त झालेला नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेची संपर्क साधू शकता.

Conclusion

As per government regulation, Aadhar card linking with bank account is mandatory. it is for government schemes benefits. aadhar card mobile number update in bank is done with easy steps. You may know better here about How to link aadhar card with bank account. Here also mention “how to link aadhar card with bank account through internet banking”, “through mobile app”, “by visiting the bank”. aadhar card mobile number change online link you get here. how can i link aadhaar with bank account.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!