विहीर, गाई गोठा योजनेचा अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा ऑनलाईन तक्रार

Grampanchayat Online Complaint: मित्रांनो राज्य सरकार मार्फत जनसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात, परंतु या योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या न झाल्यामुळे बहुतांश लाभार्थी या योजने पासून वंचित राहतात. मनरेगा अंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात आणि या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.

विहीर, गाई गोठा योजनेचा अर्ज(Grampanchayat online complaint)

Grampanchayat Online Complaint

ग्रामपंचायत मध्ये अर्ज करताना विविध प्रकारच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. यामधील एक महत्त्वाची समस्या म्हणजे विहीर आणि गायब उपाय अनुदान योजनेच्या अर्ज  न स्वीकारणे, योजनेची योग्य माहिती न देणे, योजनेबद्दल सविस्तर माहिती नसणे, योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित रित्या न होणे इत्यादी समस्या उद्भवत असतात.

Join Whatsapp Channel

 या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र शासनामार्फत 14 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारच्या नवीन मनरेगा पोर्टलचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. याचा फायदा असा होईल की सर्वसामान्य नागरिकांना विविध योजना सह तक्रार सुद्धा आता एकाच ठिकाणी करता येणार आहे.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा Mgrega Job Card कसे बनवायचे? असे करा जॉब कार्ड डाउनलोड

 ग्रामपंचायत योजनांसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी ग्रामपंचायतीचा दरवाजा  तुडवावा लागतो. अशावेळी ग्रामपंचायतीकडून योजनेची पुरेशी माहिती  नसल्याने किंवा अद्यापही योजना आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुरू झालेली नाही अशा प्रकारचे कारण सांगून विविध योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही.  काही ठिकाणी तर पैशाची मागणी सुद्धा केली जाते.

 विहीर मंजुरीसाठी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पैशाची मागणी करणे ही बाब काही नवीन नाही. त्यामुळे अशा बऱ्याच अडचणींचा विचार करून शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येणार आहे तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 ऑनलाईन तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा 

मनरेगा अंतर्गत योजनांशी संबंधित तक्रारी करण्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करा:

  • सर्वात आधी तुम्हाला मनरेगाच्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  •  वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर आल्यावर सर्वात शेवटी तुम्हाला ”register user complaint”  हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • तेथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून मोबाईलवर रिसिव्ह झालेला आहे टाका. आणि तुमचे संपूर्ण नाव तेथे  टाका.
  •  आता मनरेगाचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर  ओपन होईल.
  • येथे तुम्ही तुमच्या मागील तक्रारी, नवीन तक्रारी करण्यासाठी Register new complaint  हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  •  येथे तुम्ही स्वतःसाठी तक्रार करताय की इतरांसाठी तक्रार करताय ते पर्याय निवडा.
  •  पुढे बीडिओ,  तहसीलदार, कृषी विभाग यापैकी तुम्हाला ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची असेल ते निवडा.
  •  येथे तुम्ही तुमच्या तक्रारीची माहिती २०० शब्दांमध्ये भरू शकतात.
  •  तुमच्याकडे जर या तक्रारी संबंधित काही पुरावा असेल तर तो तुम्ही तिथे अपलोड करू शकता.
  •  शेवटी selt declaration  या पर्यायावर क्लिक करून तक्रार सबमिट या बटनवर क्लिक करून नोंदवा.
  •  येथे तुम्हाला तुम्ही केलेल्या तक्रारीचा नोंदणी क्रमांक दिसेल तो नोंद करून ठेवायचं.
  • या क्रमांकाच्या आधारे तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती वेळोवेळी ऑनलाईन तपासून शकतात.

हे देखील वाचा: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा

अशाप्रकारे तुम्ही मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांचा संबंधित ग्रामपंचायत विषयी काही तक्रारी असतील तर तुम्ही येथे नोंदवू शकतात.

ही अत्यंत सोपी आणि टाईम न घेणारी पद्धत आहे. मित्रांनो माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा, धन्यवाद!

mgnrega online complaint, mgnrega complaint online, mgnrega, nrega nic in, mgnrega in nic, मनरेगा तक्रार, gram panchayat yojana list, grampanchayat yojana

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!