Women Entrepreneurs: मित्रांनो,विविध उद्योगधंद्यांमध्ये स्त्रियांचे वाढते सहभागाचे प्रमाण लक्षात घेता प्रचलित उद्योगात स्त्रियांचे असलेले नऊ टक्के चे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने स्त्री उद्योजकांसाठी विशेष धोरण जाहीर केले आहे. त्यांच्या उद्योगातील उत्पादित वस्तू विक्रीसाठी प्रोत्साहन प्रदर्शनात भाग घेण्यासाठी स्त्री उद्योजकांना विशेष अनुदान मिळत आहे.
स्त्री मुळातच उत्तम व्यवस्थापक असतातच. त्या जिद्दीने आणि नेटाने परिश्रम करून उद्योग व्यवसायात कार्य करत असतात. हे पाहता राज्याच्या, सामाजिक, आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वाची भूमिका ठरते. स्त्रियांचे उद्योगातील प्रमाण 9% पासून ते 20 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने 14 डिसेंबर 2017 रोजी शासन निर्णयान्वये श्री उद्योजकांसाठी विशेष धोरण जाहीर केले होते.
आपल्या समाजातील अशा काही गोष्टी आहेत ज्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी विरोध करतात. जसे की लिंग भेद, समाजातील स्थान, व्यवसाय सुरू करण्यासाठी अपुऱ्या गोष्टी, तांत्रिक आणि कौशल्यात्मक विकास अशा अनेक आव्हाने पेलण्यासाठी आणि सक्षम उद्योजक होण्यासाठी स्त्रियांच्या विकासासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हा शासन निर्णय Women Entrepreneurs साठी असलेल्या विशेष धोरणासंदर्भात आहे. यामध्ये एकट्या मालकीचे उद्योजक असलेल्या स्त्रिया, भागीदारीमध्ये असलेल्या उद्योग करणाऱ्या स्त्रिया, तसेच सहकार्य क्षेत्रात उद्योग करणाऱ्या स्त्रिया, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित उद्योग करणाऱ्या स्त्रिया आणि स्वयंसहायता गटात उद्योग करणाऱ्या स्त्रिया असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
हे देखील वाचा: खुशखबर! आता गर्भवती महिलांना बाळंतविडा किट योजना अंतर्गत मिळणार 1हजार दिवसासाठी बालसंगोपन साहित्य
या व्याख्येत बसणाऱ्या स्त्री उद्योजकांना त्यांच्या उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे.
चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कोणकोणती प्रोत्साहणे देण्यात येत आहे.
प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्त्री उद्योजकांना मिळणारी प्रोत्साहणे:
राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्त्रियांनी स्थापन केलेल्या आणि उत्पादन प्रक्रियेसाठी नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील स्त्रियांना प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी हा या मागचा मूळ हेतू आहे.
या योजनेत देशांतर्गत राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी 50 हजार रुपये किंवा प्रदर्शनातील गाळे भाड्याच्या 75 टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी असते ती दिली जाते. हे प्रोत्साहन श्री उद्योजकांना त्यांनी केलेल्या खर्चाच्या परताव्याच्या स्वरूपात मिळते.
हे देखील वाचा: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन
आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्त्री उद्योजकांना मिळणारे प्रोत्साहणे:(government scheme exhibition incentive grant or Women Entrepreneurs)
उत्पादन प्रक्रियेसाठी नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, ल आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रदर्शनाच्या गाळे भाड्याच्या 75 टक्के किंवा तीन लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असते ती प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाते.
विभागीय व राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या आयोजनकांसाठी मिळणारी प्रोत्साहणे:
खास श्री उद्योजकांकरता आयोजित केलेल्या विभागीय तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी आयोजकांना आयोजन खर्चाच्या 50 टक्के किंवा दहा लाख रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जाते.
हे देखील वाचा: दररोज जमा करा 50 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये
प्रोत्साहन मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा?
ज्या स्त्रिया नोंदणीकृत सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योगात कार्यरत आहेत आणि त्यांना राज्यस्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेतला असेल त्यांना गाडे भाड्याच्या परताव्यासाठी प्रदर्शनाच्या शेवटच्या तारखेपासून कमीत कमी तीन महिन्याच्या आत त्यांचा उद्योग ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. या अर्ज सोबत प्रदर्शनाची माहिती, स्वप्रमाने प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच हे अर्ज त्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत उद्योग संचालनाकडे पाठवले जातात.
आयोजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी, ज्या आयोजकांनी स्त्री उद्योजकांसाठी विभागीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शने आयोजित केली आहेत, त्यांनी ज्या महसुली विभागात हे नियोजित प्रदर्शन भरणार आहे त्याच्या तीन महिने अगोदर त्या विभागाच्या उद्योग सहसंचालकाकडे विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असतो. यासोबत प्रदर्शनाची माहिती आणि स्वयं प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते.