मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच व्यक्तींनी घरकुल मिळावे यासाठी आवेदन पाठवलेले असेल. घरकुल मंजूर झाले आहे की नाही हे बऱ्याच जणांना समजत नाही. दरवर्षी त्यांना घरकुल मिळालेले आहे अशा लोकांची यादी जाहीर होत असते. ही यादी कशी तपासायची हेही बरं जणांना माहित नसते. तीच माहिती आता आपण येथे पाहणार आहोत. gharkul yadi 2024 step by step guide येथे तुम्हाला केले जाणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने आता घरकुल यादी तपासू शकतात.
gharkul yadi 2024
घरकुल योजनेअंतर्गत नवीन घर बनविण्यासाठी किंवा कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी सरकार अनुदान देत असते. या योजनेअंतर्गत आधी 70 हजार रुपयांच्या अनुदान सरकारमार्फत दिले जात होते. पुढे हे अनुदान कमी असल्याचे लक्षात आल्यावर त्यामध्ये वाढ करून एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदानाची रक्कम करण्यात आली. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया की स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुल यादी मध्ये तुमचे नाव कसे तपासू शकतात.
Step by step guide to check gharkul yadi 2024
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx
- आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट उघडी झालेली दिसेल.
- या पेजवर F box बॉक्समध्ये “Beneficiaries registered,accounts frozen and verified” हा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर पुढे एक नवीन वेब पेज ओपन होईल.
- या पेजवर तुमच्या डाव्या हाताला तीन पर्याय दिसतील. त्यातील पहिले दोन पर्याय तसेच असू द्या. तिसऱ्या पर्याय मध्ये “all states” वर क्लिक करा आणि Maharashtra हा पर्याय निवडा.
- त्या पुढच्या पर्याया मधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- पुढे अजून एक पर्याय दिसू लागेल, त्यात तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. शेवटी पुढच्या पर्यायात तुमचे गाव निवडा.
- पुढे विचारलेला कॅपच्या भरा.
- आता तुमच्यासमोर gharkul yadi ओपन झालेली दिसेल. ती तुम्ही download पर्याय यावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.