गाय म्हैस वाटप योजना|दोन दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत मिळणार 75 टक्के अनुदान|पहा हा शासन मंजुरी नवीन जीआर

गाय म्हैस वाटप योजना: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एक नवीन योजना घेऊन आलो आहे ती म्हणजे गाई म्हशी वाटप योजना. ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते. याच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या दोन दुधाळ गाई म्हशीच्या योजनेला आता नवीन स्वरूपामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचे अर्ज लवकरच सुरू होणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये आपण घेणार आहोत.

गाय म्हैस वाटप योजना

 दोन दुधाळ गाई म्हशी वाटप योजना:

 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन गाई किंवा म्हशी विकत घेण्यासाठी 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या विभागाला आता नवीन स्वरूपामध्ये नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे ही योजना 2023 24 मध्ये प्रवर्गातील लाभार्थ्यांना एक लाख 34 हजार रुपये अनुदान मिळवून देणारी आहे.

Join Whatsapp Channel

 जनरल, ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना 89 हजार रुपयांपर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. ही गाई म्हशी वाटप योजना नवीन स्वरूपामध्ये राबविण्याकरता 27 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे.

सर्वसाधारण अनुसूचित जातीय उपायोजना, जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2 दुधाळ देशी, 2 संकरित गाई किंवा 2 म्हशींचा एक गट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून अनुदान वाढवण्यात आलेले आहे आणि तोच शासन निर्णय आपण येथे पाहणार आहोत.

हे देखील वाचा: दोन दुधाळ गाय/म्हैस वाटप योजनेचा शासन निर्णय

 गाय म्हैस वाटप योजनेसाठीची पात्रता

मित्रांनो, तुम्हालाही गाय म्हैस वाटप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधी तपासा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही योजना चालू आर्थिक वर्षात मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच दुग्धोत्पादन मध्ये स्वयंपूर्ण असलेले जिल्हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि अहमदनगर या  अंतर्गत राबविण्यात जाणार नाही.

  • दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती
  •  अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी( एक हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • अल्पभूधारक शेतकरी( एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  •  सुशिक्षित बेरोजगार( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी आवश्यक)
  •  महिला बचत गट समूह

हे देखील वाचा: अशी करा गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार

गाय म्हैस वाटप योजना अंतर्गत लाभार्थी निवडीची प्रक्रिया आपण जाणून घेऊया.

  • अर्जदाराला सर्वात आधी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घ्यावी लागेल.
  • ही नोंदणी झाल्यानंतर दुधाळ गाई व म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • हे अर्ज स्वीकारल्यानंतर मिळालेला अर्जांमधून प्राथमिक निवड केली जाईल. तुमचा डेटा बॅकअप केला जाईल.
  • रेड मायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाईल. निवड झालेला अर्जदारांची कागदपत्रे अपलोड  करण्यात सांगण्यात येईल.
  • यानंतर अंतिम निवड केली जाईल. त्यानंतर पशु विकास  अधिकारी( वी) जिल्हा|
  • पशुसंवर्धन अधिकारी, आणि पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • त्यानंतर लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करून घेतल्या जाईल.
  • आता शेवटी कागदपत्रांची अंतिम पडताळणी केली जाईल. आणि या आधारे अंतिम लाभार्थी यादी तयार केली जाईल.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून गाय म्हैस वाटप योजना जीआर आणि लागणारी कागदपत्रांबद्दल अधिक माहिती मिळवा

गाय म्हशी गट वाटप अनुदान योजनेअंतर्गत कुणाला मिळणार किती अनुदान?

 या योजनेअंतर्गत सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गाला दोन देशी किंवा दोन संकरित, किंवा दोन म्हशी यापैकी एक गट 50% अनुदानावर मिळणार आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी क्षेत्र उपाय योजना अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणार आहे.  मित्रांनो तुम्हाला या लेखातील माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आमच्या ब्लॉग ला नक्की शेअर करा, धन्यवाद! 

हे देखील वाचा: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

Gai mhashi vatap yojana 2024, Dudhal gai mhashi vatap yojana, Mahabms list, Mahabms online application

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!