Gai Gotha Anudan Yojana|गाय/म्हैस गोठ्यासाठी 100% अनुदान सुरू|ग्राम समृद्धी योजना|असा करा अर्ज

Gai Gotha Anudan Yojana: मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एका महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.  मित्रांनो केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकास भर पडावी. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करत असते. त्या योजनांपैकी एक योजना आहे तिचे नाव Gai Gotha Anudan Yojana  आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड म्हणजेच गोठा बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.

Gai Gotha Anudan Yojana

Gai Gotha Anudan Yojana:

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई, म्हशी असतातच पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपात जागा नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस याच्यापासून जनावरांची संरक्षण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यांच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे ही काय मोठा अनुदान योजना प्रत्येक शेतकऱ्याला अत्यंत उपयुक्त ठरते.

Join Whatsapp Channel

 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी  योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रिकणातून ही योजना राबविण्यात येत आहे.

 मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही म्हणून चला तर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यात जावे लागते.  म्हणूनच तर त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.  केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेची जोडला जाणार आहे.

 येथे गाय गोठा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती विस्तार स्वरूपात दिलेली आहे त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मित्रांनो बघूया काय आहे हे गाय गोठा अनुदान योजना, Gai gotha anudan yojana  चे फायदे.

हे देखील वाचा: गाय म्हैस वाटप योजना GR | असा करा जीआर डाऊनलोड

 गाय गोठा अनुदान योजनेचे  उद्दिष्टे:

  •  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे आणि त्यांना समृद्ध बनविणे हे उद्देश समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  •  शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरासाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  •  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  •  शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणे.
  •  शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास घडविले.
  •   शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  •  राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे.

हे देखील वाचा: ग्राम पंचायत अर्ज स्वीकारत नाही? मग अशी करा गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार

गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्ट्ये:

  • महाराष्ट्र शासनाद्वारा गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
  •  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.
  •  या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आहे त्यामुळे अर्जदाराला सारख्या जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  •  गाय गोठा अनुदान योजना ही शरद  पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखल्या जाते.
  •  गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर ने जमा करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यास आणि त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा 2 दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत मिळणार 75 टक्के अनुदान

 Gai Gotha Anudan Yojana: गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत मिळणारे अनुदान:

  • या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाईल.
  • ६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
  • १२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
  • गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असेल
  • गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
  • जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.
  • सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.

हे देखील वाचा: गाय/म्हैस गोठ्यासाठी 100% अनुदान सुरू|ग्राम समृद्धी योजना|असा करा अर्ज

गाय गोठा अनुदान 2023  योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्यांचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो:

सदर लाभार्थ्यांचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो:

  •  काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो
  •  काम सुरू असतानाचा फोटो
  •  काम पूर्ण झाल्यानंतर चा फोटो आणि लाभार्थ्यासह फोटो इत्यादी

 हे तीन प्रकारांमधील फोटो अंतिम ध्येय प्रस्ताव सोबत सात दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.

 गाय गोठा योजनेचे लाभार्थी:

 महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असतील.

 गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ:

  • गाय गोठा योजना अंतर्गत लाभार्थ्याला गाय व म्हैस म्हणजेच जनावरांकरिता पक्का गोठा बांधून देण्यासाठी अनुदान देण्यात येते.
  •  या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होते.
  •  गाय गोठा अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतो.
  •  शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल.
  •  या योजनेअंतर्गत गाय म्हशीसाठी शेड म्हणजेच गोठा बांधल्यामुळे त्यांचा ऊन वारा पावसापासून बचाव  होईल.
  •  या योजनेअंतर्गत पुरुष शेतकऱ्यांसोबत महिला शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.

हे देखील वाचा:आता 15 दिवसात नुकसान भरपाई मिळेल

 गाय गोठा अनुदान योजना 2023 साठी आवश्यक पात्रता:

 अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहवासी असणे बंधनकारक आहे.

 गाय गोठा अनुदान योजना 2023 अटी:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर कागदपत्रे आवश्यक असणे बंधनकारक आहे.
  • शेतकऱ्याने जर  केंद्र किंवा राज्य शासनाकडून आधी कोणत्याही  शेड बांधण्यासाठीच्या  योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  •  एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  •  अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा महाराष्ट्रातील या 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार नाही

 Gai Gotha Anudan Yojana: गाय गोठा अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •   अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
  •  मतदान कार्ड
  •  कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  •  मोबाईल क्रमांक
  •  रहिवासी दाखला
  •   जन्म प्रमाणपत्र
  •  जात प्रमाणपत्र
  •  आदिवासी प्रमाणपत्र
  •  या आधी कोणत्याही इतर जनावरांच्या गोठ्याच्या योजनेचा लाभ न  घेतल्याचे घोषणापत्र
  • ज्या जागेत शेड बांधणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह हिस्सेदार असल्यास त्यांचे संमती पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र
  •  अर्जदाराचे अल्पभूधारक प्रमाणपत्र
  •  अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक
  •  अर्जदाराकडे कुटुंबाचे मनरेगा ओळखपत्र किंवा जॉब कार्ड असणे आवश्यक
  •  अर्जदारांना जनावरांसाठी गोठा बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक

 गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेले अर्जदारांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा किंवा पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो अर्ज डाऊनलोड करावा.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून काय गोठा अनुदान योजनेचा अर्ज डाउनलोड करा.

अर्जामध्ये विचारलेली  संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा.  एकदाका हा अर्ज जमा केल्यावर अर्जाची पोच पावती नक्की घ्यावी. अशा प्रकारे  तुमची  गाय गोठा अनुदान नियोजने साठीचा अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज कसा भरावा(Gai Gotha Yojana 2023 Online Apply)?

  • या गाय गोठा योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची  खूण करावी.
  • त्याखाली अर्जामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
  • अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
  • अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
  • अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
  •  अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
  • लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
  • तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
  • त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
  • त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.

गाय गोठा योजना |  गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 |  शरद पवार गाय गोठा योजना | Gay Gotha Yojana | जनावरांचा गोठा अनुदान |  गाय म्हैस पालन योजना 2023 | Sharad Pawar Gotha Yojana चे फायदे, पात्रता, लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि Gai Gotha Anudan Yojana साठी अर्ज पद्धती.

2 thoughts on “Gai Gotha Anudan Yojana|गाय/म्हैस गोठ्यासाठी 100% अनुदान सुरू|ग्राम समृद्धी योजना|असा करा अर्ज”

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!