Free Silai Machine Yojana: फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म- संपूर्ण माहिती

Free Silai Machine Scheme: नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यात PM फ्री शिलाई मशीन योजना 2022 अंतर्गत शिलाई  मशीन कोणकोणत्या महिलांना मिळू शकते, ते मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, रजिस्ट्रेशन ऑनलाईन असेल की ऑफलाईन, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती या सर्व घटकांची माहिती. तर मित्रांनो ही सर्व माहिती बघूया.

Join Whatsapp Channel

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023:

मित्रांनो फ्री शिलाई मशीन  योजना केंद्र सरकारची योजना आहे. योजनेची सुरुवात आपले पीएम श्री नरेंद्र मोदी यांनी  2022 मध्ये केली. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होणार आहेत. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देणे होय.

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या या फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ आपल्या देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक राज्यामध्ये 50 हजारावर अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  ज्याचा परिणाम असा होईल की आपल्या देशातील महिला घरी बसून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह भाग होऊ शकतील.  या योजनेअंतर्गत वीस ते चाळीस वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्टे काय.

हे देखील वाचा: Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यावा?

Free Silai Machine(फ्री शिलाई मशीन) योजनेचे उद्दिष्टे:

फ्री शिलाई मशीन योजनेची सुरुवात 2022 मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली होती.  या योजनेचे उद्दिष्ट असे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देऊन त्यांना उत्पन्नाची संधी प्राप्त करून देणे होय. या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. घरबसल्या शिवणकाम करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक खर्च पूर्ण करू शकतील. ही योजना शिवणकाम येत असलेल्या  महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवेल. त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.

 चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय असणार आहे.

हे देखील वाचा: आता महिला उद्योजकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान

Free Silai Machine योजनेसाठी आवश्यक पात्रता:

  • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीचे वय २० ते ४० वर्ष असावे.
  • अर्जदार महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1,20000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • भारत देशातील विधवा आणि अपंग महिला देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी आणि सक्षम बनू शकतात.

फ्री शिलाई मशीन योजनेमध्ये समाविष्ट असणारी राज्य:

फ्री शिलाई मशीन योजना केवळ काही राज्यांमध्येच लागू करण्यात आलेली आहे. काही काळानंतर ही योजना संपूर्ण देशभरात लागू केली जाईल. तर जाणून घेऊया कोण कोणत्या राज्यांमध्ये ही योजना लागू केली गेलेली आहे.

  • हरियाणा
  •  महाराष्ट्र
  •  गुजरात
  •  उत्तर प्रदेश
  •  कर्नाटक
  •  राजस्थान
  •  छत्तीसगढ
  •  मध्यप्रदेश
  •  बिहार

हे देखील वाचा: माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, उद्दिष्टे, फायदे संपूर्ण माहिती 

Free Silai Machine योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  •  आधार कार्ड
  •  वय प्रमाणपत्र
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  ओळखपत्र
  •  अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र
  •  समुदाय प्रमाणपत्र
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  मोबाईल नंबर
  •  महिला विधवा असल्यास तिचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र

हे देखील वाचा: आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळू शकते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!

  फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक महिलांना भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • https://www.india.gov.in/
  • यानंतर अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला अर्ज मिळवावा लागेल.
  •  अर्ज मिळवल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल, आधार कार्ड माहिती भरावी लागेल.
  •  सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो त्या अर्जासोबत जोडा.
  •  या योजनेसाठीचा फॉर्म हा तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय, तहसील किंवा जिल्हा कार्यालय अशा सरकारी कार्यालयामध्ये जमा  करू शकतात.
  •  त्यानंतर कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाते. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!