CGTMSE scheme in marathi | सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मिळणार 5 कोटीपर्यंत विनाकारण  कर्ज 

CGTMSE scheme in marathi: मित्रांनो, केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी त्यासोबतच उद्योजकांसाठी सुद्धा विविध योजनांचा आरंभ करतच असतात. आज आपण जी योजना पाहणार आहे ती म्हणजे cgtmse scheme(क्रेडिट गॅरंटी स्कीम).  कर्जासाठी तारण न देऊ शकणाऱ्या उद्योगांना सक्षम करणे हा या क्रेडिट गॅरंटी स्कीम योजनेचा मुख्य उद्देश आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट ही योजना भारतातील  उद्योगांच्या विकासामध्ये हातभार लावण्याचे काम करत आहे.

CGTMSE Loan Scheme Benefits

 या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणतेही मालमत्ता तारण करण्याची गरज नाही. यामुळेच जे उद्योजक तारण करू शकत नाही त्यांच्या उद्योग वाढीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. त्यासोबतच कोणताही जामीनदार असण्याची गरज नाही. 

मित्रांनो आता आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया ही काय आहे योजना?  या योजनेसाठी पात्रता काय? या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता? लाभार्थी निवडीचे निकष काय? सर्वप्रथम आपण पाहूया या योजनेचे फायदे कोणकोणते होऊ शकतात.

CGTMSE Loan Scheme Benefits (क्रेडिट गॅरंटी स्कीम योजनेचे फायदे कोणते?)

  • या योजनेअंतर्गत आपल्याला विनाकारण कर्ज मिळते.
  •  या योजनेअंतर्गत वाढीव कर्ज घेऊन एखादा उद्योजक आपल्या उद्योगाचा विस्तार करू शकतो आणि सोबतच आधुनिकीकरण देखील करू शकतो.
  •  बँकांना सुद्धा या योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जामध्ये कमी असतो कारण या कर्जाची गॅरंटी CGTMSE  ने घेतलेली असते.
  •  नवीन उद्योगांना कर्ज पुरवठा करताना सुद्धा बँकेला जास्त जोखीम घ्यावी लागत नाही.
  •  समाजामध्ये उद्योजकांचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे.
  •  समाजातील व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक लाभ होत आहे.
  •  या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर व्याजदर सवलतीची असू शकतात तसेच परतफेडीचा कालावधी जास्त मिळू शकतो. यामुळे उद्योजकाला आपला उद्योग धंदा वाढीवर फोकस करता येईल.
  •  कर्जाचा योग्य वापर करून नवनवीन तंत्रज्ञान आणले जाऊ शकते जेणेकरून मार्केटची गरज हे उद्योगधंदे पूर्ण करू शकतील.
  •  रोजगारीची नवनवीन संधी उपलब्ध करून देतील.
Join Whatsapp Channel

हे देखील वाचा: आता मोदी सरकार देणार पाच कोटी पर्यंतच कर्ज फक्त 59 मिनिटात

क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट योजनेसाठी अर्ज कसा करावा? (CGTMSE Loan Scheme apply online)

CGTMSE Loan

मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेत  जावे लागेल. तेथे तुम्हाला बँकेला लेखी कळवावे लागेल की आपले  कर्ज खाते या योजनेखाली कव्हर(cgtmse cover) करावे.  त्यानंतर तुमची बँक स्वतः CGTMSE कडे अर्ज सादर करते.

हे देखील वाचा: अशा प्रकारे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार थेट तुमच्या बँक खात्यामध्ये

CGTMSE Loan for new business:

मित्रांनो, तुम्हीही एक युवा असेल तर तुमच्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम वरदान ठरू शकते. तुम्हाला जर उद्योगधंद्यामध्ये आवड असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन तुमच्या उद्योजकाची सुरुवात करू शकतात. तुम्हाला काही उद्योगधंद्याची आयडिया असेल तर त्याचं तुम्ही आर्थिक लाभात रूपांतर करू शकतात. या योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघुउद्योग सोबतच नवीन उद्योगधंद्यांना देखील चालना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय(cgtmse loan for new business) सुरू करू शकतात.

चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणती पात्रता(cgtmse scheme eligibility) आहे. 

हे देखील वाचा: आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळू शकते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!

या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष आणि अटी काय? (cgtmse scheme eligibility)

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विनाकारण कर्जाचा फायदा घेण्यासाठी काही अटी आहेत. या पात्रतेच्या अटी आपण पाहून घेऊया.
  • या योजनेअंतर्गत शेतीशी थेट निगडित असणारे व्यवसाय पात्र नाहीत.
  •  जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा ट्रेडिंग व्यवसाय या योजनेसाठी पात्र  नव्हते परंतु नवीन नियमानुसार ट्रेडिंग व्यवसाय सुद्धा योजनेअंतर्गत पात्र राहील.
  •  वार्षिक उलाढाल किती झालेली आहे, आपल्या बँकेच्या इतर नियमानुसार झाला पात्र आहात की नाही हे पाहिलं जाईल.
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक मालकत्व, भागीदारी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, llp आणि नोंदणीकृत कंपनी यासारख्या  एमएसएमइ युनिट्स या योजनेअंतर्गत पात्र राहतील.
  • सर्व एमएसएमइ  कर्जदार/ संस्था जे तणावग्रस्त आहेत उदाहरणार्थ आणि एनपीए खाते पुनर्रचनेसाठी पात्र आहेत.
  •  कर्ज देणाऱ्या  संस्थांच्या मूल्यांकनानुसार व्यवसायिक दृष्ट्या व्यवहार्य राहतील.
  •  ज्या प्रकरणांमध्ये वसुलीची कार्यवाही सुरू आहे जसे की SARFAESI से 13(2), 13(4), DRT, खटला दाखल, पुनर्रचना, MLIs RBI च्या पुनर्रचना तत्त्वानुसार MSME  च्या व्यवहार्यतेच्या आधारावर करू शकतात.

हे देखील वाचा: SBI Mudra Loan In 59 minutes: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन

क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट Scheme लागणारी फी काय? (CGTMSE Fee Charge)

Slab(cgtmse loan limit)CGTMSE Loan Interest Rate (pa)*()
0-10 लाख0.37
Above 10 – 50 लाख0.55
Above 50-1 करोड0.60
Above 1-2 करोड1.20
Above 2-5 करोड1.35

CGTMSE full form is “Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises”.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!