बांधकाम कामगार योजना: मित्रांनो आपले भारत सरकार सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत असते. या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, मजदूरी कामगारांसाठी, फेरीवाल्यांसाठी योजना समाविष्ट असतात. अशाच काही योजना बांधकाम कामगार आणि त्यांच्या परिवारासाठी देखील राबविल्या जातात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजना राबवित असते. बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या परिवारांसाठी फायदा होईल अशा या योजना असतात. या योजना विविध स्वरूपात असतात.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उद्दिष्टे:
- बांधकाम कामगारांसाठी कामाची चांगली संधी उपलब्ध करून देणे.
- तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे.
- धोकादायक क्षेत्रामध्ये बालकामगारांना काम न करू देणे.
- रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे .
- बांधकाम कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामाची स्थिती,तसेच व्यावसायिक आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी धोरणे, कार्यक्रम किंवा योजना आखणे.
- कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे.
- घातक व्यवसायांपासून बाल श्रम दूर करणे.
- प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास तसेच रोजगार सेवांचा प्रचार करणे.
हे सर्व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उद्दिष्टे आहे. आणि हे मंडळ या दृष्टीने खूप प्रयत्नशील आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया कल्याणकारी मंडळाकडून कोणकोणत्या योजना राबविल्या जातात.
हे देखील वाचा: ऑनलाइन चेक करा तुमच्या आधार कार्डवर किती सिम आहेत ऍक्टिव्ह
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना:
मित्रांनो, कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या वेगवेगळ्या फायद्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागले गेले आहेत. तर आपण या वेगवेगळ्या श्रेणीत कोणकोणत्या योजना येतात ते पाहूया.
- सामाजिक सुरक्षा
- शैक्षणिक
- आरोग्य विषयक
- आर्थिक
हे देखील वाचा: बांधकाम कामगार योजना फायदे कोणते?
सामाजिक सुरक्षा योजना
योजनेचे नाव | आवश्यक पात्रता | अधिक माहिती येथे पहा |
पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी 30 हजार रुपये अर्थसहाय्य | विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र | |
मध्यान्ह भोजन योजना | विहित नमुन्यातील मागणी पत्र | Click Here |
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना | पाल्याचे शाळेचे प्रमाणपत्र | |
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | विहित नमुन्यातील हमीपत्र | |
पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना | विहित नमुन्यातील मागणी पत्र | |
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | विहित नमुन्यातील हमीपत्र |
बांधकाम कामगार शैक्षणिक योजना
योजनेचे नाव | आवश्यक पात्रता | अधिक माहिती येथे पहा |
1) इयत्ता 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्षी 2500 रुपये 2) इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5000 रुपये ( कमीत कमी 75 टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक) | 75 टक्के हजेरी बाबत शाळेचा दाखला | |
इयत्ता 10वी ते 12वी मध्येकिमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10000 रुपये | किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका | |
इयत्ता 11 वी ते 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10000 रुपये | 10वी ते 11वीची गुणपत्रिका | |
पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये(नोंदित कामगाराच्या पत्नीसही लागू) | मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/ गुणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती/ बोनाफाईड | |
1) वैद्यकीय पदवी करता प्रतिवर्षी एक लाख रुपये 2) अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्षी साठ हजार रुपये (नोंदित कामगाराच्या पत्नीसही लागू) | मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/ गुणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती/ बोनाफाईड | |
1) शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये 20 हजार 2) शासनमान्य पदवीधर पदविकेसाठी प्रती शैक्षणिक वर्षी 25 हजार रुपये | मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/ गुणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती/ बोनाफाईड | |
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिकृती | MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि शुल्काची पावती |
बांधकाम कामगार आरोग्य विषयक योजना
योजनेचे नाव | आवश्यक पात्रता | अधिक माहिती येथे पहा |
1) नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रुपये 2) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20000 रुपये ( दोन जीवित आपत्यांसाठी) | 1) सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक/ शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाणपत्र 2) वैद्यकीय उपचाराची देयके | |
गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1लाख रुपये( लाभार्थी कामगार, त्याच्या कुटुंबीयांना) | 1) सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र 2) वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे | |
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत रुपये 1 लाख मुदत बंद ठेव | 1) सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये बाबतचे प्रमाणपत्र 2) अर्जदारास एक कन्या अपत्य पेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र | |
75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये | ७५ टक्के अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी/ मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके | |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | योजने करिता विहित शिधापत्रिका | |
आरोग्य तपासणी करणे | शासकीय/ निमशासकीय, व्यसनमुक्ती केंद्राकडून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र |
बांधकाम कामगार आर्थिक योजना
योजनेचे नाव | आवश्यक पात्रता | अधिक माहिती येथे पहा |
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाख रुपये | 1) सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला 2) बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा | |
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 2 लाख रुपये | सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला | |
अटल बांधकाम कामगार आवास योजना( शहरी) अर्थसहाय्य 2 लाख रुपये | प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/ प्रमाणित यादी | |
अटल बांधकाम कामगार आवास योजना(ग्रामीण) अर्थसहाय्य 2 लाख रुपये | प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/ प्रमाणित यादी | |
कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता 10 हजार रुपये ( वय 50 ते 60) | सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला | |
गृह कर्जावरील 6 लाखापर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये 2 लाख | 1) राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा 2) कर्ज विम्याची पावती 3) घर पती-पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा | |
कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा श्री कामगाराच्या विधुर पतीस 24 हजार रुपये (पाच वर्षाकरिता) | सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला |
Bandhkam kamgar yojna, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar awas yojana, bandhkam kamgar yojana 2024, mahabocw yojana, बांधकाम कामगार योजना, कल्याणकारी योजना