बांधकाम कामगार पेटी योजना अर्ज, पात्रता, फायदे, कागदपत्रे संपूर्ण माहिती | Bandhkam kamgar peti yojana

मित्रांनो महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातर्फे विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक योजना आहे बांधकाम कामगार पेटी योजना. महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असतात. त्यातीलच एक आहे ही bandhkam kamgar peti yojana. 

बांधकाम कामगार पेटी योजना काय आहे (What is Bandhkam Kamgar Peti Yojana in Marathi)

Bandhkam kamgar peti yojana

बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या अपघातांना सामोरे जावे लागते. त्यांच्याजवळ सोयीसुविधा नसल्याने किंवा ते अशा सुरक्षेतेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करू शकत नसल्याने,त्यांना विविध अपघातांना सामोरे जावे लागते. हे कामगार आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने आणि त्यांच्याजवळ कुठलेच सेफ्टी किट उपलब्ध नसल्याने ते कुठल्याही सेफ्टी शिवाय काम करत असतात.  अशा वेळेस अपघात झाल्यास त्यांना अपंगत्वाचा देखील सामना करावा लागू शकतो. काही वेळेस तर त्यांच्या जीव सुद्धा गमवावा लागतो.

 अशा सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पेटी योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 चला तर मित्रांनो आता या योजनेबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. जसे की बांधकाम कामगार पेटी योजना काय आहे? बांधकाम कामगार पेटी योजनेचे उद्दिष्टे? Bandhkam km योजनेसाठी पात्रता काय? बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी अर्ज कसा करावा? कुठे? bandhkam kamgar peti yojana अंतर्गत कामगारांना दिला जाणाऱ्या वस्तू कोणत्या इत्यादी.

Bandhkam kamgar peti योजनेअंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू:

बांधकाम कामगार  पेटी योजना
  • बॅग
  • सेफ्टी बूट
  •  चार  डब्याचा जेवणाचा डबा
  •  सोलर टॉर्च
  •  सोलर चार्जर
  •  पाण्याची बॉटल
  •  मच्छरदाणी
  •  रिफ्लेक्टर जॅकेट
  •  सेफ्टी हेल्मेट
  •  हातमोजे
  •  चटई
  •  पत्र्याची पेटी

 बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी लागणारी पात्रता आणि अटी काय?

  • अर्ज केलेला बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहवासी असावा.
  •  कामगाराची वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
  • कामगारांनी मागील वर्षांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  •  कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असावे.
  •  कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे.
  •  बांधकाम कामगार केंद्र आणि राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा कामगाराला या कामगार योजनेचा लाभ होणार नाही.
  •  इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  या योजनेअंतर्गत नोंदीत केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू होतील.

 Bandhkam kamgar peti yojana साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  •  आधार कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  ईमेल आयडी
  •  रहिवासी दाखला
  •  90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  •  शपथ पत्र
  •  वयाचा दाखला
  •  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी  केल्याचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धती काय आहे?

  • मित्रांनो तुम्हालाही जर बांधकाम कामगार योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील
  •  सर्वप्रथम अर्जदार कामगाराला आपल्या क्षेत्रातील म्हणजेच आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जाऊन बांधकाम कामगार पेटी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  •  त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती बरोबर  भरावी. त्यासोबत विचारलेले आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
बांधकाम कामगार योजना फायदेबांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजना

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!