मित्रांनो, महिला व बालकल्याण विभागाकडून आपल्यासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. काही वेळेस काही योजनांची माहिती तर आपल्याला मिळते आणि काही योजनांचा फायदा आपल्याला माहिती मिळत नसल्याने आपल्याला घेता येत नाही. लातूर जिल्ह्यातील गर्भवती महिलांसाठी आता खुशखबरी आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती म्हणजे बाळंतविडा किट योजना. तुमच्या घरात एखादी महिला गर्भवती असेल तर अशा महिलांना जिल्हा परिषद योजना अंतर्गत बाळंतविडा योजनेचा लाभ मिळणार आहे. या किट द्वारे 1 हजार दिवस बाळाचे संगोपन केले जाणार आहे. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. या किटमध्ये जीवनावश्यक विविध साहित्य असणार आहे. या किट द्वारे गरोदर महिलांना काय मिळेल ते आपण पाहूया.
तर यामध्ये एक किलो खारीक, गुळ, फुटाणा, डाळ, शेंगदाणे, गावरान तूप, खोबरे, काजू, बदाम, डिंक आणि जवस तीळ, ओवा, बडीशेप, काळे मीठ, दोन बेडशीट, दोन टावेल, आईसाठी दोन गाऊन इत्यादी साहित्य या बाळंतविडा किट मध्ये असणार आहे.
हे देखील वाचा: आता महिला उद्योजकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान
कोणते साहित्य मिळणार आहे बाळंतविडा किटमध्ये?
- एक किलो खारीक
- एक किलो खोबरे
- दोन किलो गूळ
- दीड किलो शेंगदाणे
- फुटाण्याची डाळ एक किलो
- गाईचे तूप अर्धा किलो
- पाव किलो डिंक
- पाव किलो काजू
- आळीव पाव किलो
- जवस पाव किलो
- बडीशेप आणि काळे मीठ
- तीळ आणि ओवा
- डिंक
- दोन बेडशीट
- दोन टॉवेल
- आईसाठी दोन गाऊन
हे देखील वाचा: ही आहेत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
बाळंतविडा किट योजना
मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिला व बालकल्याण विभागात भेट देऊन या बाळांत किट मिळण्यासाठी अर्ज सादर करून द्या. ही योजना जिल्हा परिषद लातूर विभागाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राविण्यात येत आहे.
सदर योजना लातूर जिल्ह्यासाठी लागू आहे. माता मृत्यू तर कमी करणे, गाव कुपोषणमुक्त करणे हा या बाळंत विडा किट योजनेचा मुख्य उद्देश आहे. लातूर जिल्ह्यातील गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे.
सध्या ही योजना फक्त लातूर जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. बाळंतविडा किट योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील 87 अंगणवाडीची निवड करण्यात आली आहे. त्या अंगणवाडी केंद्रांवर जिल्ह्यातील 2000 गरोदर मातांना या बाळंतविडा किट योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्या बाळांतविडा कीट मध्ये असणाऱ्या ड्रायफूट द्वारे १००० दिवस बाळाचे संगोपन केले जाणार असल्याने गरोदर मातांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
ज्याप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेने ही नवीन योजना अमलात आणली आहे, अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील ही योजना लागू होणे आवश्यक आहे. महिलांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. तुमच्या तालुक्यातील महिला व बालकल्याण विभागात भेट देऊन तुम्ही महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.
हे देखील वाचा: कोंबडी फार्म सुरू करण्यासाठी मिळणार 25 लाख रुपये पर्यंतचे अनुदान. अर्ज सुरू!
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. महिला व बालकल्याण विभाग लातूर या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
हे देखील वाचा: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काय आहे? mahafood gov