शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाई आली | पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 दिवसात नुकसान भरपाईचे निर्देश

Ativrushti Nuksan Bharpai 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. राज्यात होणाऱ्या सतत पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाईशेतकऱ्यांना येत्या दहा दिवसात देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना येत्या 10 दिवसात देण्याचे निर्देश आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रिमंडळात  होते.  राज्यातील नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर, पुणे महसूल विभागातून राज्य सरकारकडे 3 हजार 128 कोटी 96 लाख रुपयांचे प्रस्ताव आलेले आहेत.  नुकसान भरपाईची रक्कम सरसकट दिली जाणार नाही तर ती शास्त्रीय निकषाच्या आधारे निश्चित केली जाणार आहे. शास्त्रीय निकषाच्या  आधारे पाठवलेले प्रस्ताव भरपाईसाठी  पात्र ठरणार आहे.

Join Whatsapp Channel

अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai):

अतिवृष्टी नुकसान भरपाई आली

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाणीपुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी इतरमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे असा आग्रह धरला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना याबाबत विचारणा केली. सचिवांनी पुढील 10 दिवसांमध्ये भरपाई दिली जाईल असे सांगितले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुदत व  पुनर्वसन विभागाचे दहा दिवसात शेतकऱ्यांच्या भरपाई रक्कम मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे देखील निर्देश यावेळी शासनाकडून देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा: शेतमाल तारण कर्ज योजना: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा

अशाप्रकारे या ठिकाणी सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचे अपडेट मिळाले आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने या अगोदर 755 कोटी 69 लाख रुपयांचा निधी वितरित केलेला आहे आणि त्याचबरोबर सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा प्रस्तावांची संख्या आणि देण्यात येणारी मदत याचा विचार करून राज्य सरकारने नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. शास्त्रीय निकष गृहीत धरले जाणार आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीची पाहणी सुद्धा होणार आहे.

  • या अपडेटनुसार आपण जाणून घेतले की तुम्हाला झालेल्या पीक नुकसान भरपाई केव्हा मिळेल.
  • दहा दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
  • सरकारने घोषणा तर केली आहे पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही हे अजूनही सांगता येत नाही
  • परंतु दहा दिवसात  नुकसान भरपाई चे निर्देश हे सचिवांना दिले आहे तर पुढे बघूया ही रक्कम जमा होते की नाही.

हे देखील वाचा: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मल्चिंग पेपर अनुदान किती मिळणार?

आता 15 दिवसात नुकसान भरपाई मिळेल

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई लगेच मिळावी यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी पार पाडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर पुढील येत्या पंधरा दिवसांमध्ये नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. म्हणूनच येत्या पुढील  काळामध्ये शेतीचे जर नुकसान झाले तर पंधरा दिवसाच्या आत nuksan bharpai  मिळेल. 

 पंचनामे इ पद्धतीने होतील

  • नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी बांधवांना पंचनामे प्रक्रियेला खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागत असतो.
  • शासनाने आदेश दिल्यानंतर शासकीय अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ऑफलाइन पद्धतीने पंचनामे करतात.
  • पण या प्रक्रियेचा वापर केला तर शेतकऱ्यांपर्यंत त्यांची नुकसान भरपाई ची किंमत लवकर पोहोचणार नाही.
  • त्यामुळेच राज्य सरकारने की पंचनामे प्रक्रिया सुरू केलेली आहे.
  • आता हे पंचनामे एम आर एस सी या कंपनीच्या माध्यमातून मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई-पंचनामे करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: खुशखबर! आता गर्भवती महिलांना बाळंतविडा किट योजना अंतर्गत मिळणार 1 हजार दिवसासाठी बालसंगोपन साहित्य

सततचा पाऊस नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai)कुणाला मिळणार? 

आपल्या राज्यातील विविध भागातील शेतकरी बांधवांना त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती,तसेच छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, आणि पुणे या महसूल विभागाकडून राज्य शासनाकडे नुकसान भरपाई  संदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे. या विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे म्हणजेच  पिकांचे  नुकसान झालेले असल्यामुळे निकषांच्या आधारे Ativrushti Nuksan Bharpai  निश्चित करून वाटप करण्यात येणार आहे.

मित्रांनो तुमच्या आजूबाजूलाही कोणत्या शेतकऱ्याचे असे नुकसान झालेले असेल तर ही माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. त्या शेतकऱ्याला नक्कीच दिलासा मिळेल. माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा, धन्यवाद! 

Ativrushti Nuksan Bharpai, अतिवृष्टी अनुदान यादी 2023, maharashtra yojana 2023

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!