Atal Pension Yojana canculator(अटल पेन्शन योजना): नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण एका नवीन योजनेबद्दल आणि महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. आता केंद्र शासनाच्या या योजनेतून तुम्हाला 210 रुपये गुंतवणूक करून पाच हजार रुपये मिळणार आहे. आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. या योजनेत देशभरातून जवळजवळ पाच कोटी होऊन जास्त लोकांनी लाभ घेतलेला आहे. त्याच अटल पेन्शन योजनेची माहिती आपण बघूया.
काय आहे ही अटल पेन्शन योजना:
9 मे 2015 रोजी मोदी सरकारने ही अटल पेन्शन योजना राबविण्यास सुरुवात केली. यावर्षी या योजनेला आठ वर्षे पूर्ण झाले आहे. या योजनेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर वयाचे साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आपल्याला सेवानिवृत्तीनंतर 5 हजार रुपये दरमहा पेन्शन मिळेल. या योजनेचा जर तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी वीस वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला 42 ते 210 रुपये हप्ता द्यावा लागेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, आणि बचत खाते असणे आवश्यक आहे. निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळवायचे आहे त्यानुसार तुमची रक्कमदार दरमहा कापली जाईल. या योजनेत दरमहा एक ते पाच हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी 42 ते 210 रुपये दर महा भरावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल.
हे देखील वाचा: आता मोदी सरकार देणार पाच कोटी पर्यंतच कर्ज फक्त 59 मिनिटात | पहा कोणत्या बँकांनी वाढवली कर्जाची रक्कम
Atal Pension Yojana Calculator:
- आज आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत ती योजना म्हणजे अटल पेन्शन योजना.
- अटल पेन्शन योजनेची सुरुवात केंद्र शासनाकडून 2015 मध्ये करण्यात आली होती.
- या योजनेच्या माध्यमातून एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपये पर्यंत प्रति महिना पेन्शन स्वरूपात फायदा मिळतो.या योजनेच्या सुरुवातीला कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकत होतं, पण गेल्या काही वर्षांमध्ये यात बदल करण्यात आलेला आहे.
- आता तुमच्या वयानुसार तुम्हाला किती रकमेचा हप्ता भरल्यास पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे याची माहिती आपण येथे पाहूया.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते कसे उघडायचे?
Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यावा?
- अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते बँक खाते जाऊन खाते उघडून घ्यावे.
- या योजनेत तुम्हाला तीन महिने आणि सहा महिन्याचा हप्ता भरण्याची सुविधा मिळते.
- तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून ऑटोमॅटिक फीचर्स चालू ठेवू शकतात जेणेकरून या पर्यायामुळे तुमच्या खात्यातून हप्ता ऑटोमॅटिक भरला जाईल.
- निश्चित कालावधीत तुमच्या खात्यावरून हवी असलेली ठराविक रक्कम कट होईल.
- जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पेन्शन त्याच्या जोडीदाराला मिळेल.
- आणि जर दोघांचा मृत्यू झाल्यास वारसाला साठ वर्षापर्यंत जमा केलेली रक्कम परत दिली जाते.
- जर 18 वर्षाच्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याला 42 रुपये जमा केले तर 60 वर्षानंतर त्या व्यक्तीला एक हजार रुपये प्रत्येक महिना पेन्शन मिळेल.
- 84 रुपये जमा केले तर तुम्हाला दोन हजार रुपये पेन्शन मिळेल.
- त्यासोबतच जर तुम्ही 210 रुपये जमा केले तर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन म्हणून तुम्हाला निवृत्तीनंतर दिले जातील.
- दुसरीकडे चाळीस वर्षाच्या व्यक्तीला पाच हजार रुपयांच्या पेन्शन साठी 1454 रुपये जमा करावे लागतील.
- त्याचप्रमाणे 19 ते 39 वर्षे वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळे रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
- तुम्ही ते ऑनलाइन किंवा बँकेला भेट देऊन जाणून घेऊ शकता.
- आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही या योजनेमध्ये हप्ता भरू शकतात. मित्रांनो माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा, धन्यवाद!
हे देखील वाचा: ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये
atal pension yojana, atal pension yojana in marathi, atal pension yojana benefits in marathi, अटल पेन्शन योजना, पेन्शन योजना, पेन्शन योजना माहिती, पंतप्रधान पेन्शन योजना