मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. या विविध बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत राबविल्या जात आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याच्या हक्काचे घर मिळावे या उद्देशाने घर बांधण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण म्हणजेच दुरुस्तीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य atal bandhkam kamgar awas yojana अंतर्गत आता मिळणे शक्य आहे.
चला तर मित्रांनो आता आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया. जसे की या योजनेअंतर्गत कोणता लाभ होईल? या योजनेचे उद्दिष्टे काय? योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय असणार? बांधकाम कामगार आवास योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? atal bandhkam kamgar awas yojana gramin या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धती कोणती असणार? अटी आणि शर्ती काय?
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin
बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण चे स्वरूप कसं असणार ते आपण पाहूया.
नोंदीत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या/ पती किंवा पत्नीच्या नावावरील जागेवर असलेल्या नवीन घर बांधण्यासाठी किंवा आधीच घर असल्यास त्या कच्च्या घराचे पक्क्या घरातून पंतर करण्यासाठी 1.50 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार. हे अनुदान Atal Bandhkam Kamgar Awas Yojana योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेच्या आधारावर अनुदेय असणारे 18 हजार रुपये तसेच स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छालय बांधण्यासाठी दिले जाणारे बारा हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपये अनुदान दीड लाख अनुदानामध्ये समाविष्ट असल्याने संबंधित योजनांचा दुबार ला त्याला भरत्याला दिला जाणार नाही.
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin अंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य किती असणार आहे?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदणीत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा आधीच कच्चा घर असेल तर ते पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण मार्फत एक लाख पन्नास हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन आणि इतर बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिकृती करण्यात येते.. अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणी पूर्ण झाल्याचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घर बांधणीच्या अनुषंगिक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी मंडळाकडून 50 हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. हे अर्थ साहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते.
हे देखील वाचा: PM Surya Ghar Scheme | असा घ्या सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता काय असणार?
- नोंदीत बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगार अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ प्रतिक कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता पुढे दिल्याप्रमाणे राहील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा.
- अर्ज करताना तो बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
- नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतः/ पती किंवापत्नीच्या नावे मालकीची जागा असावी. किंवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.
- बांधकाम कामगाराचे स्वतःचे/ पती किंवा पत्नीचे नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसावे. अशा परिस्थितीत स्वयंघोषणापत्र म्हणजेच शपथपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा( ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असणार आहे.
- जर त्या बांधकाम कामगाराने एकदा लाभ घेतलेला असेल तर त्याला पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- नोंदणीकृत बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.
अटी आणि शर्ती काय?
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात जर इतर राज्यातील कामगार बांधकाम कामगार म्हणून आलेला असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणीत जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणचा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महामंडळाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यास पात्र राहतील.
- या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या कामगारांनी किमान 269 चौरस फूट इतके क्षेत्र असलेले घर बांधणे आवश्यक आहे.
- त्याकरिता दीड लाख एवढे अनुदान देय राहील. लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वतःच्या खर्चाने करण्यास मुभा देखील राहील.
- संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे.
- घरकुलामध्ये एक स्वयंपाक घर व बैठक हॉल यांचा समावेश असावा.
- शौचालय व स्नान घर बांधणे अनिवार्य राहील.
- जोत्यापासून घराची उंची कमीत कमी दहा फूट असावी.
- छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलाचा वापर करण्यास मुभा राहील.
- घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे बोधचिन्ह लावणे आवश्यक राहील.
हे देखील वाचा: नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजना अंतर्गत अर्ज पद्धती
अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे? (Document required)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/ प्रमाणीत यादी
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट साईज तीन फोटो
- बँक पासबुकची झेरॉक्स कॉपी
- घोषणा पत्र
- जन्माचा दाखला
- महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- नियुक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला(इंजिनीयर किंवा ठेकेदार कडून)
हे देखील वाचा:बांधकाम कामगार योजना फायदे कोणते?
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin अंतर्गत अर्ज करण्याची पद्धती काय असणार आहे? (How to apply)
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी सर्वात आधी जिल्हा कार्यकारी अधिकारी/ उपजिल्हा कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे मंडळांनी विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.
- बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती करेल.
- व त्यात पात्र झालेल्या कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण योजनेमध्ये लाभार्थी म्हणून निवड केली जाईल.
- उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ तसेच सदस्य सचिव व नियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननी पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांचे तालुका निहाय यादी तयार करतील.
- सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील.
- त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करून दिली जाईल.
- सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कल्याणकारी मंडळ हे ग्रामविकास विभाग यांच्या अधिपत्याखाली संचालक, राज्यव्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, नवी मुंबई याचे कडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा कोटी निधी वर्ग करतील.
- घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्यव्यवस्थापन कक्षा कडून टप्प्याटप्प्याने ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली द्वारे बांधकाम कामगाराच्या खात्यावर अनुदान पाठवण्यात येईल.
- Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून चार टक्के एवढी रक्कम राज्यव्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील.
हे देखील वाचा:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करा. अर्जंट विचारलेली संपूर्ण माहिती भरा. त्यासोबत विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. हा अर्ज आणि कागदपत्रे आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करा. अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.