Annasaheb Patil Loan Yojana: नमस्कार मित्रांनो आजचा लेख मराठा विद्यार्थी तरुणांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जवळजवळ चाळीस लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. याबाबतीचा नुकताच निर्णय घेण्यात आलेला आहे. मराठा समाजातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी चाळीस लाख रुपये पर्यंतचे शैक्षणिक कर्ज हे बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कर्जाच्या हप्त्याची व्याज स्वतः महामंडळ भरणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे आणि गरजू तरुण यासाठी महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून नेहमीच मदत करत असते.
आता या महामंडळाने राज्य सरकारच्या मदतीने एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे ध्येय स्थापित केले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत कर्ज योजना:
या महामंडळासोबत आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जर कुणाला वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज हवे असेल तर त्यांना तेही दिले जाणार आहे. यासाठी दहा लाखांची कर्ज मर्यादा वाढवून 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे सामान्य मराठा तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे की 7 वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. छोट्या व्यवसायासाठी दोन लाख मराठा समाजातील होतकरू तरुणांना छोटे-मोठे उद्योग सुरू करू स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दहा हजार ते दोन लाख पर्यंतचे कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. आणि या कर्जावरील व्याज सुद्धा महामंडळ देणार आहे.
हे देखील वाचा: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन | एसबीआई ई मुद्रा लोन
Bin Vyaji Karj Yojana:
भारतात शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांना 40 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून त्या खर्चावर 12% इतके व्याज महामंडळ देणार आहे.
या दोन्ही योजना मंजूर केलेल्या आहे आणि लवकरच त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलेली आहे.
हे देखील वाचा: आता करा एसटीने आवडेल तिथे कुठेही प्रवास
मिळून उद्योग धंद्याकडे वाटचाल हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ध्येय आहे. यासंबंधीत अंमलबजावणी परिपत्रक किंवा जीआर या संबंधित माहिती दिली जाईल. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी, शेतासाठी ट्रॅक्टर योजना, आणि शिक्षणासाठी कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना(Annasaheb Patil Loan Yojana)
मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती.
मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, तसेच व्यवसायामध्ये त्यांना उभारी घेता यावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील युवकांना अत्यंत सोपा पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जर या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेतले तर व्याज महामंडळ भरती त्यामुळे तुम्हाला व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो.
मराठा समाजातील बेरोजगार व्यक्तींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्न करत आहेत.
सुरुवातीला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी युवकांना खूप सारा अडचणींचा सामना करावा लागत होता.
बँकांचा प्रतिसाद नसल्याने कर्जासाठी केलेले अर्ज निकाली निघत नव्हते. त्याचप्रमाणे अनुदान स्वरूपात योजना नसल्याने युवक कर्ज घेण्यास पुढे येत नव्हते.
मात्र आता ही परिस्थिती बदललेली आहे. महामंडळाला उभारी देण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत.
हे देखील वाचा: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा
Annasaheb Patil Loan Yojana:
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीन योजना:
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- गट कर्ज व्याज परतावा योजना
- गट प्रकल्प कर्ज योजना
मित्रांनो, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते.
त्याचप्रमाणे जर त्याला अर्थाने कर्जाचे हप्ते वेळेवर भरले तर त्या हप्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्याला बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते. कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दहा ते पन्नास लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. कर्जाचा परतफेड कालावधी पाच वर्षासाठी निर्धारित केलेला आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांना बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, अशा शासन प्रमाणे संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिन वाजे कर्ज दिले जाते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधू शकतात लेख आवडल्यास नक्की शेअर करा, धन्यवाद!
हे देखील वाचा: आता मोदी सरकार देणार पाच कोटी पर्यंतच कर्ज फक्त 59 मिनिटात
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करावे लागतील.
- सर्वप्रथम तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करू शकता.
- https://udyog.mahaswayam.gov.in/#/home
- त्यानंतर तुमची प्रोफाइल ओपन झालेली दिसेल, त्यात तुमचा प्रोफाइल माहिती दिसेल.
- आता तुम्हाला तुमच्यासमोर तुम्ही पात्र असलेल्या योजनांची यादी दिसेल.
- योजना निवडा आणि तेथे तुम्हाला अर्ज उपलब्ध होईल.
- तो अर्ज तुम्ही योग्य आणि खरी माहिती टाकून भरावा.
- काही कागदपत्रे विचारलेले असेल ती कागदपत्रे तेथे अपलोड करा.
- सर्वात शेवटी अर्ज पूर्ण भरल्यानंतर पन्नास रुपये फॉर्म चे पेमेंट करावे लागेल. अशा पद्धतीने तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता.
शैक्षणिक कर्जासाठी कोणती प्रोसेस आहे ?
अण्णासाहेब पाटील शैक्षणिक योजना कधी अमलात आणणार आहे त्याची प्रोसिजर काय आहे त्याचा मराठा जातीच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे का का उगाच फेक बातमी आहे हे लवकरात लवकर कळवणे व मुलींच्या शिक्षणासाठी कर्जाची काय सोय आहे का
Ho. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट द्या https://udyog.mahaswayam.gov.in/#/home
My son required education Loan
शक्य आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही लोन मिळवू शकतात