ज्या बालकांचे वय या तारखेला सहा वर्षे पूर्ण होणार त्यांनाच पहिलीत प्रवेश! इयत्ता पहिलीसाठी  वय निश्चिती | Admission for 1st standard

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऍडमिशन सुरू होतात. तुम्ही तुमच्या घरातील बालकाला पहिलीच्या वर्गात(admission for 1st standard) दाखल करणार असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कमी वयात मुलांवर शिक्षणाचा ओझ पडू नये म्हणून नर्सरी पासून ते पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी काही नियम ठरवून दिले आहेत. याच नियमानुसार तीन वर्षाच्या बालकाला नर्सरी प्रवेश दिला जाईल. आणि सहा वर्षाच्या बालकाला पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.  केंद्र सरकारने 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी सहा वर्षे वय पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 यानुसार जि मुलं 31 डिसेंबर 2024 तारखेला  सहा वर्षाचे पूर्ण होतील त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2024-25 मध्ये इयत्ता पहिली वर्गात प्रवेश दिला जाऊ शकतो. यापेक्षा कमी वयाच्या बालकांना मात्र इयत्ता पहिली मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच, जर तुमच्या मुलाचं पहिली वर्गामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचे वय 31 डिसेंबर 2024 ला सहा वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.ती शाळा खाजगी असो व सरकारी, ॲडमिशन मिळण्याची वयाची अट सहा वर्षे पूर्ण ही राहणार आहे. 

हे देखील वाचा: स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

Admission for 1st Standard

भारत देशातील शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेले आहे. आणि या धोरणाची संपूर्ण देशात अंमलबजावणी सुरू केलेली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. 

 विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास लक्षात घेता पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. शाळा विशेष करून खाजगी शाळा आणि पालक बऱ्याच वेळा मुले वर्गात बसण्यासाठी तयार आहेत की नाही याचा विचार न करता नर्सरी, प्री प्रायमरी मध्ये मुलांना घालत असतात. अशा शाळांना देखील येत्या जून पासून शिक्षण विभागाच्या अंतर्गत आणले जाणार असून त्यांनाही या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!