Adhar Card Pan Card Link status: नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपले आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे कसे तपासावे. आयकर विभागाने 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड नंबर हा आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. एक ट्विटमध्ये आयटी विभागाने सांगितले आहे की ही प्रक्रिया प्राप्तिकर कायदा 1961अंतर्गत अनिवार्य आहे त्यात असे सांगितले आहे की 1 एप्रिल पासून सर्व असे पण जे आधार कार्डशी लिंक नाही ते पण निष्क्रिय होतील.
येथे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे की नाही हे तपासण्यासाठी आयकर विभागाने त्यांच्या वेबसाईटवर लिंक देखील दिली आहे. येथे तुम्ही जाणून घेऊ शकतात की आधार पॅन कार्ड लिंक स्थिती ऑनलाईन कशी तपासायची?
हे देखील वाचा: घरबसल्या मिळेल तुमच्या आधारवर सुरू असलेल्या सिम कार्डची माहिती
आधार पॅन कार्ड लिंक स्थिती ऑनलाईन कशी तपासायची How to check adhar card and pan card link status online?
आधार पॅन लिंक स्टेटस चेक करण्यासाठी करदात्याने आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी, म्हणजेच खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे: https://www.incometax.gov.in/iec/foportal/
येथे क्विक लिंक सेक्शन मध्ये लिंक आधार स्टेटस(link adhar status) वर क्लिक करा.
पुढे तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस(view link adhar status) वर क्लिक करा. जर तुम्ही आधीच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले असेल तर तुम्हाला खालील मेसेज दिसेल.
जर ही दोन्ही कागदपत्रे लिंक नसेल तर स्क्रीनवर “ पॅन आधारशी लिंक केलेले नाही कृपया तुमचे आधार त्यांची लिंक करण्यासाठी “Link Adhar Card” वर क्लिक करा” असा मेसेज दिसेल.
जर आधार पॅन लिंक होण्याच्या प्रक्रियेत असेल तर पुढील मेसेज दिसेल “ तुमचे आधार पॅन लिंकिंग विनंती प्रमाणी करण्यासाठी UIDAI कडे पाठवले आहे. कृपया होम पेजवर “Link Adhar Status” लिंक वर क्लिक करून नंतर स्थिती तपासा”.
हे देखील वाचा: किशोरी शक्ती योजना 2023 पात्रता, अटी, ऑनलाइन अर्ज संपूर्ण माहिती
आधार कार्ड अपडेट झाले आहे की नाही हे कसे बघावे?
Adhar to pan link Status Check:
- मित्रांनो तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यानंतर जर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायचा असेल तर तो बघण्यासाठी तुम्ही सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता.
- Uidai.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला चेक आधार अपडेट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पुढे नवीन पेज ओपन होईल त्यावर जो युजर आयडी तुम्हाला मिळालेला आहे तो टाका
- आणि त्याच्या मध्ये दिलेले शब्द रिकाम्या जागेत भरा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती उघडलेली दिसेल. अशाप्रकारे तुम्ही चेक करू शकतात.
- मित्रांनो पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर तुम्ही आयटीआर फाईल करू शकतात का? पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती आयटीआर फाईल करू शकत नाही. हे लक्षात असू द्या.
आता आपण बघूया जर तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असेल तर त्याची तुम्हाला कोण कोणते फायदे होऊ शकतात.
हे देखील वाचा: पीक कर्ज योजना(Crop Loan): डॉ. पंजाबराव देशमुख पिक कर्ज सवलत अनुदान योजना
आधार आणि पॅन कार्ड लिंक असण्याचे फायदे कोणते?
Adhar Card Pan Card Link status
- आधार आणि पॅन कार्ड लिंक असल्याने आयटीआय फाईल करणे झाले सोपे:
- ITR म्हणजेच Income tax return जो तुम्ही तुमच्या वार्षिक कमाई वरती होणारा टॅक्स सरकारला देत असतात.
- आधार आणि पॅन कार्ड लिंक असल्याने तुम्ही आयटीआय फाईल सोप्या पद्धतीने करू शकतात.
- सबसिडी आणि इतर फायदे मिळवणे झाले सोपे: मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सरकारकडून विविध योजनांची सुरुवात केल्या जाते
- अशा वेळेस जर तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक असेल तर तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
- तुमची फायनान्शिअल माहिती केंद्रिकृत करा: मित्रांनो आधार आणि पॅन कार्ड लिंक असल्याचा अजून एक फायदा म्हणजे
- तुम्ही तुमची जी ही फायनान्शिअल म्हणजेच आर्थिक माहिती असेल ती तुम्ही एका ठिकाणी केंद्रीकृत करू शकतात.
- त्यानंतर तुम्ही ती सोप्या पद्धतीने बघू शकतात.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच ब्लॉग ला शेअर करा. धन्यवाद!
हे देखील वाचा: ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी असा करू शकता अर्ज
adhar card pan card link, adhar pan link, link adhar with pan, pan adhar link status, adhar link with pan card, adhar to pan link, link pan with adhar, adhar card to pan card link, adhar card pan card link status