Aam Aadmi Vima Yojana: नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती आपण येथे बघणार आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नवीन नवीन योजनांची माहिती घेऊन येत असतो. आजची योजना आहे आम आदमी विमा योजना. आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजुरांना त्याचप्रमाणे 2.5 एक कर पेक्षा कमी बागायती आणि पाच एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना लाभ होईल.
या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा समावेश आहे. म्हणजेच वार्षिक विम्याचा हप्ता दोनशे रुपये असून त्यात केंद्र शासनाकडून 100 रुपये आणि राज्य शासनाकडून 100 रुपये इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येत आहे.
हे देखील वाचा: फक्त 20 रुपयात मिळणार 2लाखांचे विमा संरक्षण
मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला भरपूर लाभ होणार आहेत. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत तुम्हाला विम्याचा लाभ कसा होईल.
हे देखील वाचा: PM Svanidhi Loan योजनेअंतर्गत एक वर्षासाठी तारण मुक्त कर्ज
Aam Aadmi Vima Yojana Benifits आम आदमी विमा योजनेचे फायदे कोणते?
मित्रांनो या आम आदमी विमा योजनेचे फायदे खालील प्रमाणे घडणाऱ्या घटनांनुसार मिळणार आहे. नक्कीच ही एक विमा योजना आहे त्यामुळे या योजनेचा फायदा काही केस मध्ये तुम्हाला तर काही केसमध्ये तुमच्या नंतर तुमच्या वारसाला होईल. चला तर आपण जाणून घेऊया कोणत्या घटनांसाठी कोणत्या प्रकारचा लाभ होऊ शकतो.
- विमा धारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये 30 हजार त्याच्या वारसाला देण्यात येते.
- अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 75 हजार विमाधारकाच्या वारसाला देण्यात येते.
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास रुपये 75 हजार विमाधारकास देण्यात येतात.
- विमाधारकास अपघातामुळे दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय गमावल्यास रुपये 75 हजार देण्यात येतात.
- अपघातात एक डोळा किंवा एक पाय गमावल्यास 37 हजार 500 रुपये या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास देण्यात येतात.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना दर महिना शंभर रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
अशा प्रकारे या आम आदमी विमा योजनेचे फायदे तुम्हाला मिळणार आहे. तुमचा जर दुर्दैवी मृत्यू होत असेल तर तुमच्या नंतर तुमच्या वारसाला हे फायदे मिळेल.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घेऊया काय अर्ज पद्धती असणार आहे.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी पात्र कोण ठरणार?
आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?(Aam Aadmi Vima Yojana Apply)
ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो म्हणजेच अर्जदार. तर अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसीलदार संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय यापैकी कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकतो. यापैकी कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला तेथे या योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल.
तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Aam Aadmi Bima Yojana official website: https://aaby.mahaonline.gov.in/
Application Process To Aam Aadmi Vima Yojana:
- सर्वात प्रथम अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसीलदार संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय यापैकी कोणत्याही कार्यालयाला भेट द्यावी.
- तेथे जाऊन आम आदमी विमा योजनेसाठी चा फॉर्म घ्यावा.
- त्या अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, फायनान्शियल डिटेल तसेच बँक अकाउंट डिटेल सर्व भरायचं.
- अर्जासोबत सर्व विचारलेले कागदपत्र जोडायचे. विमा अधिकारी तुम्ही सादर केलेला अर्ज आणि त्यासोबतचे सर्व कागदपत्रे परताळणी करतील.
- सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर तुम्हाला विमा सर्टिफिकेट दिले जाईल. हे विमा सर्टिफिकेट तुमच्या पत्त्यावर घरपोच मिळेल.
- पॉलिसी अटीनुसार पॉलिसीधारक व्यक्ती विम्याचा हप्ता वार्षिक किंवा हप्ते प्रमाणे भरेल.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री जनधन योजना बँक खाते कसे उघडायचे?
आम आदमी विमा योजनेसाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
- आधार कार्ड
- वयाचा दाखला(जसे की जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पासपोर्ट)
- पत्ता( रहिवासी दाखला): जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, लाईट बिल, पासपोर्ट
- बँक अकाउंट डिटेल: बँक अकाउंट नंबर, आयएफएससी कोड
- इन्कम सर्टिफिकेट
- व्यवसायचा दाखला