एक शेतकरी एक डीपी योजना|ऑनलाईन अर्ज|शेतकऱ्यांची यादी जाहीर

एक शेतकरी एक डीपी योजना: नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये एक नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ती म्हणजे एक शेतकरी योजना 2022.  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 14 एप्रिल 2014 रोजी झालेल्या एका “ एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर”  या योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता दिली होती.  तसेच 14 ऑक्टोबर 2020 रोजी ही योजना मंजूर झाली होती.  ज्या शेतकऱ्यांनी मार्च 2014 पर्यंत या योजनेसाठी शुल्क भरले होते त्यामध्ये दोन लाख 24 हजार 785 शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बसवणे आवश्यक होते. 

Join Whatsapp Channel

ek dp ek shetkari Yojana

ek dp ek shetkari Yojana

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना लाईट जाणे अनियमित लाईट किंवा वीज कट तारांवर प्रकाश टाकने अशा जीव घेण्या  गोष्टी होऊ नये या सर्व बाबींचा विचार करून एच व्ही डी एस ला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  या योजनेअंतर्गत आतापर्यंत नव्वद हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.  तर 11347 कोटींचा या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे.  महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन 2248 कोटी रुपयांचा आर्थिक निधी वाटप करण्यात येणार आहे.

 चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे उद्दिष्टे कोणकोणते आहेत.

एक शेतकरी एक डीपी( ट्रान्सफॉर्मर) योजनेचे मुख्य उद्दिष्टे:

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खाली दिलेल्या गंभीर समस्यांचा विनाश करणे होय.

  • तांत्रिक वीज हानी वाढणे
  •  रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
  •  विजेमुळे होणारे अपघात
  • वीज तारेवर आकडा टाकून विज चोरी करणे
  •  विद्युत तारेची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाची वीज पुरवठा होणे
  •  विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे

या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना नेहमी सामोरे जावे लागते यामुळे या एक शेतकरी एक ट्रांसफार्मर किंवा डीपी योजनेचे मुख्य उद्दिष्ट यांसारख्या अडचणी थांबवून अखंडित आणि शाश्वत वीज पुरवठा करणे होय. या समस्या  मिटवून कृषी पंपांना यापुढे उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एक शेतकरी एक डीपी  योजने अंतर्गत कोण कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.  म्हणजेच राज्यात कोणकोणत्या शेतकऱ्यांना ती एक  शेतकरी एक डीपी योज नेचा लाभ दिला जाणार आहे.

हे देखील वाचा: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे व पात्रता, पहा संपूर्ण माहिती

 एक शेतकरी एक डीपी लिस्ट(Ek Shetkari Ek DP List):

 अर्जदारांना पारंपारिक पद्धतीने विद्युत वाहिनीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित केलेले आहे. त्यापैकी सुमारे 40 हजार कृषी पंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुतात वाहिनीवर उर्जीकरण करण्याकरता लागणारा निधी महावितरण तर्फे उपलब्ध करून देण्याचे नियोजित केलेल्या असून उर्वरित सुमारे 60 हजार कृषी पंपांचे पारंपारिक पद्धतीने उच्च दाब वितरण प्रणालीवर मुर्जीकरण करण्यासाठी प्रति पंप रु 2.50  लाख याप्रमाणे प्रतिवर्षी  रुपये 1500  कोटी भाग भांडवल, धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरण आला उपलब्ध करून दिले जाणार आहे

एक शेतकरी एक डीपी योजना फार्मर लिस्ट(Ek Shetkari Ek DP Yojana Farmer List):

सन 2021 22 या वर्षाकरिता अनुसूचित जाती वर्गातील प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्याकरता येणारा खर्च सुमारे 89  कोटी रुपये भाग भांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  जर तुम्हाला पहायचे आहे की तुमचे एक शेतकरी एक टीपी  योजनेच्या लिस्टमध्ये नाव आलेले आहे की नाही तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा: सादर योजनेचा शासन निर्णय व यादी पाहण्यासाठी येथे टच करा

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एक शेतकरी योजनेचे फायदे कोणकोणते आहेत.

 एक शेतकरी एक डीपी योजनेचे फायदे:

  • या योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना मात्र स्वहिस्सा  म्हणूनकाही पैसे  भरावे लागतात ते खालील प्रमाणे-
    1. महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे ने 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये द्यावे लागतील.
    2. अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 5 हजार रुपये द्यावे लागतील.
  • शेतकऱ्यांनी इतकी रक्कम भरल्यानंतर ट्रान्सफॉर्मर साठी येणारा अतिरिक्त खर्च हा राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो.
  • तसेच या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे असे शेतकऱ्यांना 11000 रुपये प्रति एचपी इतका खर्च करावा लागतो यानंतर मग डीपी बसवण्यासाठी जो काही खर्च लागतो तो खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात संबंधित शेतकऱ्यांना मंजूर केला जातो आणि महावितरणाला दिला जातो म्हणजेच उरलेला खर्चाचा फार हा राज्य शासनाच्या माध्यमातून केला जातो.

3 HP डीपीला लागणारा  खर्च:

अनुसूचित जाती जमातीतील असा शेतकरी तिच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे आणि त्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला पाच हजार प्रति एचपी इतका खर्च करावा लागेल. म्हणजेच तीन एचपी ट्रांसफार्मर बसवायचा असेल तर त्याला एकूण पंधरा हजार रुपये खर्च करावा लागेल.

 चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत काम करणारा कोण कोणत्या संस्था आहेत.

हे देखील वाचा: किसान ट्रैक्टर अनुदान योजना 2023 | PM Kisan Tractor Yojana – ऑनलाइन अर्ज कसा करावा

 ek shetkari ek dp Yojana अंतर्गत काम करणाऱ्या संस्था:

  • कृषि विभाग, महाराष्ट्र सरकार
  • कृषि संघटना
  • संगणक संस्था
  • शेतकरी संघ

 ek shetkari ek transformer yojana साठी लागणारे कागदपत्रे:

 या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते ती खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  रेशन कार्ड
  •  शेत जमिनीची कागदपत्रे म्हणजेच 7/12  उतारा आणि 8  अ  उतारा
  •  बँक खाते क्रमांक व पासबुक  प्रत
  • जातीचे प्रमाणपत्र( अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी)

आता आपण जाणून घेऊया एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.

हे देखील वाचा: कांदा चाळ साठी 50% अनुदान|असा भरा ऑनलाइन फॉर्म घरबसल्या

 एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा:

ek shetkari ek transformer yojana Apply Online:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा: https://mahadiscom.in/
  • या पेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.  त्यावर नवीन कनेक्शन साठी अर्ज भरा या पर्यायावर क्लिक करा.
  •  त्यानंतर ॲग्रीकल्चर(agriculture) वर क्लिक करा
  •  पुढे हॉर्स पावर म्हणजे एचपी निवडा. दिलेल्या बॉक्स वर क्लिक करा आणि  सबमिट करा.
  •  पुढे तुमच्यासमोर येईल नवीन फॉर्म उघडेल त्यावर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.
  •  फॉर्म सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट जमा करण्यासाठी अपलोड  डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
  • त्यानंतर मेल आयडी मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे सबमिट करा.  शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाऊनलोड करा.

ek shetkari ek dp, ek dp ek shetkari, ek shetkari ek transformer yojana, farmer scheme, महाडबीटी शेतकरी, mahadbt farmer scheme list in marathi

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!