Pradhan Mantri Gramin Avas Yojana List 2023: मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे. हा ब्लॉग तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे जर तुम्हीही PM Avas Yojna Gramin साठी अर्ज केलेला असेल. तुम्ही तुमचे नाव या दिलेल्या यादीमध्ये आहे की नाही हे तपासू शकतात.
मित्रांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या द्वारा देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःच घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रासाठी ही योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घर बनवण्यासाठी gharkul yadi 2023 मध्ये उपस्थित आहे. लाभार्थ्यांनी Pradhanmantri Gramin Avas Yojana List पाहण्यासाठी pmayg.gov.in या सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी.
आजच्या लेखांमधून तुम्हाला ही घरकुल यादी बघण्याची पद्धत सोपी करून दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला घरकुल योजनेबद्दल अधिक माहिती येथे दिलेली आहे, ती तुम्ही नक्की वाचा.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
Pradhanmantri Gramin Avas Yojana List 2023
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये नोंद केलेले असतील.
- घरकुल यादी मध्ये त्याच व्यक्तींचे नाव असतील ज्यांना या योजनेसाठी निवडलेले आहे.
- ग्रामीण आवास योजना लिस्ट आणि PMAY -G New List या लिस्टमध्ये ज्या लाभार्थ्यांची नाव आहे त्यांनाच या योजनेचा लाभ होईल.
- आणि त्यांनाच घर बनवण्यासाठी अनुदान प्राप्त होईल.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या द्वारे सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांना स्वतःचे पक्के घर बनवून देण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत दिल्या जाते. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना म्हणजेच घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या परिवारांना केंद्र सरकारकडून पक्के घर बनवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची तसेच डोंगराळ भागातील लोकांना घर बनवण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपयांचे आर्थिक सहायता दिल्या जाते.
आता या योजनेची लिस्ट ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. शिवाय तुमच्या वेळेची आणि पैशाची सुद्धा बचत होईल. ऑनलाइन पद्धतीने लिस्ट उपलब्ध असल्याने या योजनेमध्ये पारदर्शकता येईल. आणि योग्य त्या लाभार्थ्यालाच लाभ प्राप्त होईल.
मित्रांनो जर तुम्हीही पंतप्रधान घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही हे बघायचे असेल तर ते आपण कसे बघायचे हे बघूया.
gharkul yadi 2024: नवीन घरकुल यादी अशी चेक करा स्टेप बाय स्टेप
पंतप्रधान ग्रामीण आवास योजना 2023: घरकुल यादी कशी बघायची?
Gharkul yadi 2023
ज्या व्यक्तीला घरकुल योजनेच्या यादीमध्ये आपले नाव शोधायचे असेल त्याने खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- सर्वात आधी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावं लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर मुखपृष्ठ उघडलेला असेल. येथे तुम्ही इंग्लिश ऐवजी हिंदी भाषा सिलेक्ट करू शकतात. हिंदी भाषा सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला उजव्या हाताला वर “language” हा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन हिंदी सिलेक्ट करा.
- आता मुख्यपृष्ठावर हितधारक(Stackholders) हा पर्याय दिसेल. त्यावर गेल्यानंतर आईएवाई/ पीएमएवाईजी लाभार्थी(IAY/PMAYG Beneficiary) या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे एक नवीन विंडो खुली होईल. येथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. आणि त्यानंतर सबमिट(submit) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही तर “advanced search” या पर्यायावर क्लिक करा.
- इथे दिलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा
हे देखील वाचा: बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे?
PMAY यादी कशी तयार होते?
- प्रधानमंत्री आवास योजना आर्थिक सहाय्य करून लोकांना घरमालक बनण्यास मदत करते.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी 640 जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेली ही पहिली पेपरलेस योजना आहे.
- प्रधानमंत्री आवास योजना यादी मध्ये जोडण्यासाठी पात्रलाभार्थ्यांची ओळख पटवताना आणि त्यांना शॉर्टलिस्ट करताना भारत सरकार SECC 2011चा विचार करते.
- याव्यतिरिक्त शेवटची प्रधानमंत्री आवास योजना यादी जाहीर करण्यासाठी त्यांचे इनपुट प्रदान करण्यासाठी सरकार संबंधित पंचायती आणि तहसील ला सामील करते.
प्रधानमंत्री आवास योजनेची यादी तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला खाली दिलेल्या सूचना दिल्या जातात त्यापुढील प्रमाणे:
लाभार्थी नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधण्यासाठी किंवा केंद्र किंवा राज्यशासित प्रदेशांना हस्तांतरित केल्या गेलेल्या केंद्रीय सहाय्यासाठी सबसिडीच्या अंतर्गत, लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही पद्धतीने अनुदान दिले जातील. वैयक्तिक बांधकामासाठी प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी आधार/ मतदान ओळखपत्र किंवा कोणत्याही ओळखपत्र क्रमांक सह किंवा लाभार्थ्याच्या मूळ जिल्ह्याच्या महसूल प्राधिकरणाकडून घराच्या मालकीचे प्रमाणपत्र तसेच बँक खाते क्रमांक यासोबत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने यादी तयार करावी.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा?
Pradhan Mantri Gramin Avas Yojana List PDF डाऊनलोड कशी करायची?
मित्रांनो, जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल यादी डाऊनलोड करायची असेल ते तुम्ही खालील पद्धतीने करू शकतात.
- सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर मुख्यपृष्ठ ओपन होईल त्यावर Awaasoft या विभागाखालील report या पर्यायावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, त्यावर Social audit report या पर्यायाखालील Beneficiary details for verification या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला Filter वर क्लिक करून काही गोष्टी फिल्टर करावे लागतील.
- सर्वात आधी तुम्हाला PMAY यादी वर्ष निवडावे लागेल जी तुम्हाला तपासायचे आहे.
- त्यानंतर दुसऱ्या पर्यायांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर राज्याचे नाव, जिल्हा निवडावा लागेल.
- नंतर पाचव्या पर्यायांमध्ये ब्लॉक निवडा व शेवटी सहाव्या पर्यायांमध्ये पंचायत नाव निवडणे आवश्यक आहे.
- पुढे सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्ही तुमच्या गावाचे नाव, नोंदणी क्रमांक, लाभार्थ्याचे नाव, वडिलांचे व आईचे नाव, त्यांना वाटप केले गेलेले घर मंजुरी क्रमांक, मंजूर रक्कम, भरलेला हप्ता अशा विविध गोष्टींची स्थिती तपासू शकतात.
- ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही ती एक्सेल आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकतात.
- एक्सेल फॉरमॅट मध्ये डाउनलोड करण्यासाठी “ Download Excel” आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करण्यासाठी “Download PDF” या पर्यायावर क्लिक करा.
हे देखील वाचा: Aam Aadmi Vima Yojana Benifits आम आदमी विमा योजनेचे फायदे कोणते?
PMAY अंतर्गत पॅनल केलेल्या बँकांची यादी कशी मिळवायची?
नॅशनल हाऊसिंग बँक(NHB) ने भारतातील अग्रगण्य बँकांसोबत काही सामंजस करार केलेले आहेत जे MIG श्रेणीतील गृह खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कर्जे वितरित करतील. जर तुम्हाला प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्थांची यादी मिळवायची असेल तर ते तुम्ही खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करून मिळू शकतात.
- सर्वात आधी तुम्हाला पुढे दिलेल्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल: https://pmayuclap.gov.in/
- त्यानंतर मुख्यपृष्ठावर CNA-PLI या सूचीवर क्लिक करा.
- PLI’s नॅशनल हाऊसिंग बँक(NHB) ची यादी
- PLI’s गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ(HUDCO) ची यादी
- PLI’s ची यादी- स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)
- तुम्हाला PLI ची PMAY यादी निवडावी लागेल. त्यानंतर तुम्ही ही यादी बघून डाऊनलोड करू शकतात.
हे देखील वाचा: गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार
PM Avas Yojna Gramin, Pradhanmantri Gramin Avas Yojana List, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, घरकुल योजना, gharkul yadi 2023, घरकुल यादी कशी बघायची, घरकुल यादी 2023