Pradhan Mantri Pik Vima Yojana|शेतकऱ्यांसाठी केंद्राची प्रधान मंत्री पिक विमा योजना|पहा योजनेचे फायदे, आवश्यक कागदपत्रे, विमा रक्कम व हप्ता दर, ऑनलाईन रजिस्ट्रेशन

Pradhan Mantri Pik Vima Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य महा मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे. यामार्फत लाखो कामगारांचे हित जपले जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यातच pm fasal bima yojana बद्दल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

चला तर मित्रांनो या बाबतीत सविस्तरपणे जाणून घेऊया की काय आहे पिक विमा योजना(PMFBY), प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फायदे काय, लागणारी कागदपत्रे कोणती, लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची, आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे ते.

Join Whatsapp Channel

हे देखील वाचा: पिक विमा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड करा

प्रधानमंत्री पिक विमा योजना(pradhanmantri fasal bima yojana)

  • अधिक आणि अवकाळी  पाऊस, दुष्काळ अशा संकटांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसान होत असतं.
  • त्यामुळे 2016 पासून केंद्र सरकारने पंतप्रधान विमा योजना सुरू केलेली आहे.
  • रब्बी हंगामासाठी पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचा आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
Pradhan Mantri Pik Vima Yojana
  • पीक विमा योजनेमध्ये कर्जदार, भाडेपट्टी वर शेती करणारे, बिगर कर्जदार असे सर्व शेतकरी सहभागी होऊ शकतात.
  • यामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणजे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे  होणारी नुकसान भरपाई मिळणार आहे.
  • राज्य शासनाने निर्धारित केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई मिळणार आहे.
  • अजून एक मित्रांनो, चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न  सुरुवातीच्या उत्पन्नापेक्षा कमी नोंदवले गेल्यास नुकसान भरपाई मिळेल.
Pradhan Mantri Pik Vima Yojana

 हवामानातील होणाऱ्या बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी झाल्यानंतरचे नुकसान,  स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबींचा समावेश या योजनेत आहे.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा ऑनलाइन सातबारा उतारा कसा बघायचा?

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती डिटेल मध्ये

 प्रधानमंत्री पीक विमा योजना(PMFBY) काय आहे?

 नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास  शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण  दिल्या जाते. पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य अबाधित  राखणे. ही योजना राज्यांनी निकेश पूर्ण करून राबवायचे असली तरी प्रधानमंत्री यांच्या ‘एक राष्ट्र एक योजना’ या उद्देशाने ती पूर्ण देशात राबविण्याचे लक्ष  ठेवण्यात आले आहे.

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे कोणती?

  • कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
  • खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांसाठी म्हणजेच भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा ही योजना खुली करण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम दोन टक्के ठेवण्यात आला आहे.

हे देखील वाचा: भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री

 pm fasal bima yojana ही योजना कार्यान्वित कोणत्या यत्रणेने केली?

 पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे.

PMFBY- प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये कोणते शेतकरी सहभाग घेऊ शकतात?

 PMFBY या योजनेत सर्व कर्जदार, बिगर कर्जदार, तसेच भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेऊ शकतात.

हे देखील वाचा: PMFME योजनेच्या अटी व शर्ती कोणत्या?

Pradhan Mantri Pik Vima Yojana: प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  •  पूर्ण माहिती भरलेले विमा घोषणापत्र
  •  जमिनीचा पुरावा म्हणून 7/12 उतारा
  •  पीक पेरणी दाखला म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकाची पेरणी, लागवड केल्याबाबत स्वयंघोषणापत्र

 प्रधानमंत्री पीक विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता दर काय?

PMFBY या योजनेत भात पिकासाठी 42 हजार 100 रुपये व नागरी पिकासाठी 20 हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता दर भात व नागरी पिकांसाठी अनुक्रमे रुपये  210.50 आणि 100 आहे.

 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा हप्ता आणि विमा अर्ज केवळ आपल्या नजीकच्या बँकेत किंवा राज्य सरकारने विमा हप्ता व विमा अर्ज स्वीकारण्यासाठी अधि मान्यता दिलेल्या सरकार कॉमन सर्विस सेंटर मार्फत ऑनलाईन पद्धतीने संबंधित पीका करिता भरावा. 

हे देखील वाचा: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना काय आहे?

विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता दर

सदर योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी शेतकऱ्यांनी भरावयाची विमा प्रस्ताव पत्र कृषी कार्यालयात, आणि बँकेत उपलब्ध असून सर्व इच्छुक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या गावात कार्यरत असलेले कृषी  सहाय्यक सहाय्यक, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.

pm fasal bima yojana या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनी असणार आहे. इतर खाजगी विमा कंपन्या एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया शी संलग्न करण्यात येणार आहेत.

हा विमा केवळ उत्पन्नातील घट एवढ्या पुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान तसेच चक्रीवादळे, भूत्खलन, बिगर मोसमी पाऊस अशा आपत्ती पासूनच्या संरक्षणासाठी हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे. 

पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे. मात्र कोणावरही बंधनकारक नाही.

 PMFBY या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर येथे क्लिक करून व्हिजिट  करू शकतात.

Pradhan Mantri Pik Vima Yojana साठी विमा दर

अ. क्र.पिकेशेतकऱ्याने देय असलेले कमाल विमा शुल्क
1खरीप2%
2रब्बी1.5%
3वार्षिक व्यावसायिक येव बागायती लागवड पिके5%

हे देखील वाचा: स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

प्रधानमंत्री पिक विमा  योजना(PMFBY) ऑनलाइन रजिस्ट्रेशन

 मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर  तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतात

त्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा लागेल.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!