RBI Imposes Monetary Penalties On 9 Cooperative Banks|या बँकांचे परवाने झाले रद्द

RBI Imposes Monetary Penalties On 9 Cooperative Banks:

RBI Imposes Monetary Penalties On 9 Cooperative Banks List 

  1. मुधोल को-ऑपरेटिव्ह बँक
  2. म‍िलथ को-ऑपरेटिव्ह बँक
  3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक
  4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक
  5. डेक्‍कन अर्बन ऑपरेटिव्ह बँक
  6. लक्ष्‍मी को-ऑपरेटिव्ह बँक
  7. सेवा व‍िकास को-ऑपरेटिव्ह बँक
  8. बाबाजी दाते मह‍िला अर्बन बँक
Join Whatsapp Channel

या 8 बँकांचे परवाने रद्द झालेले आहेत. अपुरे भांडवल आणि बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांचे लायसन्स रद्द होऊन व्यवहार थांबवण्यात आलेले आहे. आरबीआयच्या मध्यवर्ती बँकेने 2021 22 मध्ये 12 सहकारी बँकांचे परवाने, तर 2020 21 मध्ये 3 बँका, आणि 2019 20 मध्ये 2 सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत.

रिझर्व बँकेने काही नियमावली आखून दिलेली असते. त्याचे पालन सर्व प्रकारच्या बँकांना करणे बंधनकारक असते. बँकांचे व्यवहारावर या रिझर्व बँकेचे बारकाईने लक्ष असते. त्या बँकांना व्यवहारांची आणि लेख्या जगाची माहिती सादर करावी लागते. दिलेल्या तरतुदीनुसार जर काही विसंगती आढळली तर रिझर्व बँक त्या बँकेवर कारवाई करते.

RBI Imposes Monetary Penalties: रुपी बँक परवाना का झाला रद्द? रिझर्व बँकेने का केली कारवाई?

RBI Imposes Monetary Penalties
  • मित्रांनो, 10 ऑगस्ट रोजी रिझर्व बँकेने एक पत्र काढलं आणि त्याचा परिणाम रुपी सहकारी बँकेच्या हजारो ठेवीदारांना मनातली भीती सत्यात उतरली.
  • या पत्रकामध्ये रिझर्व बँकेने स्पष्ट केलं की, रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द झाला आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिलेल्या आदेशाच्या आधार घेऊन परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली होती.
  • आणि या रिझर्व बँकेच्या आदेशाची अंमलबजावणी 22 सप्टेंबर पासून करण्यात आलेली आहे.
  • माननीय लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य आणि स्वदेशी विचारांच्या प्रेरणेतून रूपी सहकारी बँकेची 1912  ला स्थापना करण्यात आलेली होती.
  • 110 वर्षानंतर या ऐतिहासिक बँकेवर कारवाई  करून बंद करण्यात आली.
  • परवाना रद्द करण्याच्या आदेशासाठी रिझर्व बँकेने काही कारण दिली होती ती म्हणजे रुपी बँकेकडे भांडवल नाही,
  • रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पुढच्या कमाईची शक्यताही नाही.
  • त्यामुळे बँक सुरू ठेवणे हे ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल  असल्याचे रिझर्व बँकेने म्हटलं होतं.

हे देखील वाचा: पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम

रुपी बँकेच्या जवळ जवळ 35 शाखा महाराष्ट्र मध्ये आहेत. रुपी सहकारी बँक 2003 पर्यंत चांगली चालत होती. 2003 मध्ये तिला पहिल्यांदा खेळ बसला, तेव्हा रिझर्व बँकेने काही निर्बंध लादले. ते निर्बंध 2005 मध्ये पुन्हा काढूनही घेण्यात आले. पूर्वीच्या बँकेच्या संचालक मंडळ आला निवडणूक लढण्याची परवानगी दिली नाही. रिझर्व बँकेने असं सांगितलं की तुम्ही नवीन संचालक मंडळ आणा जुना आणू नका. पण रुपी सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये तीच जुनी लोकं संचालक मंडळात आली. काही कालावधीसाठी त्यांनी रुपी बँकेचा व्यवहार व्यवस्थित पाहिला.

हे देखील वाचा: विहीर अनुदान योजना महाराष्ट्र|4 लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज

रुपी बँक परवाना का झाला रद्द?

पुन्हा 2010  मध्ये निर्बंध लादल्या गेले आणि ते तसेच राहिले, पुढे चालून 2013 मध्ये बँकेवर प्रशासक मंडळ रिझर्व बँकेला भाग पडलं. संचालकांची मुदत काढून घेण्यात आली. आतापर्यंत आठ वर्षे झाली तरी बँकेवर क रिझर्व बँकेचे नेमलेले प्रशासक मंडळ होते. 1997 ते 2001 या वेळेत बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झालं होतं. मिळालेल्या तक्रारींवरून 2001 मध्ये रिझर्व बँकेने या प्रकरणी चौकशी सुरू केली त्यामध्ये असे समोर आले की मोठ्या प्रमाणात कर्ज अनुत्पादित केले गेलेले आहे.

 RBI Imposes Monetary Penalties On 9 Cooperative Banks: जास्त प्रमाणात कर्ज वाटप होणं हेच या बँकेला अडचणीत आणण्याचं मुख्य कारण ठरलं. याचा परिणाम असा झाला की त्या दिलेल्या कर्जाची रिकवरी होऊ शकली नाही आणि बँकेकडे लिक्विडिटी राहिली नाही. त्यानंतर रिझर्व बँकेने ठेवी काढण्यावर बंधन आणली. रुपी बँकेवर काही निर्बंध लादण्यात आली. सुरुवातीला 5000 काढायला परवानगी होती. त्यानंतर एक हजार काढायला परवानगी होती. नंतर ती पूर्णपणे बंद करण्यात आली. मधल्या काळामध्ये हाडशीप खाली डिपॉझिटरला रिझर्व बँकेने परवानगी दिली म्हणजे मेजर सर्जरी किंवा घरात मुलीचे लग्न अशा कारणांसाठी पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत विड्रॉलची परवानगी मिळाली होती.

हे देखील वाचा: बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे?

मुधोल को-ऑपरेटिव्ह बँकेचा  का झाला परवाना रद्द?  रिझर्व बँकेने का केली कारवाई?

मुधोल को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा कठोर निर्णय रिझर्व बँकेने घेतला होता. ही बँक कर्नाटक मधील बागलकोट येथील आहे. या बँकेत राज्यासह इतर ठिकाणच्या ग्राहकांच्या ठेवी होत्या. बँकेला ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणे आणि पैसे भरण्यास मनाई केली आहे. सध्या बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही बँक ठेवीदारांना पूर्ण रक्कम देण्याच्या स्थितीमध्ये नसल्याचे रिझर्व बँकेने म्हटलेले होते

हे देखील वाचा: क्लिक करून वाचा लायसन्स रद्द झालेल्या बँकांमधील ठेवीदाराच्या पैशाचे काय होणार?

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!