Block Unauthorised Sim Card On My Adhar Card | घरबसल्या मिळेल तुमच्या आधारवर सुरू असलेल्या सिम कार्डची माहिती

Block Unauthorised Sim Card: मित्रांनो, आता मोबाईल सिम कार्ड देखिल आधार कार्ड अशी जोडले गेलेले असते. जर तुम्ही दुकानात गेले तर सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड ची प्रत द्यावी लागते. विना आधार कार्ड तुमचं सिम कार्ड घेण्यासाठी व्हेरिफिकेशन होत नाही. परंतु, बऱ्याचशा केस होतात जेथे कुणी अनोळखी व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिम कार्ड घेतलेले असते आणि तो चुकीच्या कामांमध्ये त्याचा वापर करत असतो.  या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड घेतले गेलेले आहे हे चेक केले गेले पाहिजे.

मित्रांनो सिम कार्ड घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आपल्याला adhar card ची प्रत द्यावी लागते. बऱ्याच वेळेस असे होते की आपल्याला माहीतच नसते की आपल्या आधार कार्ड वर किती सिम कार्ड allow करण्यात आले आहे. परंतु आता दूरसंचार विभागाच्या एका वेबसाईट चा वापर करूनतुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतल्या गेलेले आहे हे माहिती करू शकतात.

हे देखील वाचा: Active Sim Card On My Adhar Card

Block Unauthorised Sim Card

Block Unauthorised Sim Card
  • एक आधार कार्डवर तुम्ही 9 सिम कार्ड घेऊ शकता.
  • टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनुसार, एका आधारवर नागरिक 9 सिम कार्ड घेऊ शकतात.
  • तुमच्या आधारवर किती सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. (जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसल्यास येथे क्लिक करून मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करा)
  • तसेच, सर्वात प्रथम तुम्हाला यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला ‘Get Adhar’वर जावून ‘डाउनलोड आधार’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता व्ह्यू मोर या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला ‘आधार ऑनलाइन सर्विस’वर जायचे आहे. त्यानंतर ‘Aadhaar Authentication History’ वर क्लिक करता.
  • पुढे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी’वर क्लिक करा.
  • आता ‘AuthenticationType’वर ऑल निवडून ज्या तारखेची माहिती हवी आहे, ती निवडा.
  • आता तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी भरा. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आधारवर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या सिम कार्डची माहिती मिळेल.
  • तुम्हाला माहित नसलेला मोबाइल नंबर अ‍ॅक्टिव्ह असल्यास ट्रायकडे बंद करण्यासाठी तक्रार देखील करू शकता.
  • याशिवाय, तुम्ही tafcop.dgtelecom.gov.in वर जावून देखील याबाबत माहिती घेऊ शकता. मात्र, ही सुविधा ठराविक राज्यातच उपलब्ध आहे.

हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी

tafcop.dgtelecom.gov.in

tafcop.dgtelecom.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डवर घेतल्या गेलेल्या सिम कार्ड बद्दलची माहिती घेऊ शकतात, त्यासोबतच तुम्ही जर सिमकार्ड बंद करायचे असेल तर तेही करू शकतात.  मित्रांनो, तुमच्या सिम कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये आणि तो आरोप तुमच्यावर येऊ नये यासाठी तुम्ही एकदा तरी चेक करायला हवं की तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत. तुमच्या आधार कार्डवर घेतल्या गेलेले सिम कार्ड जे तुम्ही वापरत नाहीत असे सिम कार्ड तुम्ही ब्लॉक केले पाहिजे.

DOT च्या tafcop.dgtelecom.gov.in  या पोर्टलवरून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतले गेलेले आहे हे बघू शकतात. या व्यतिरिक्त unauthorised सिम कार्ड सुद्धा बंद करण्यासाठी(Block Unauthorised Sim Card) रिक्वेस्ट करू शकतात.सोबतच जे सिम कार्ड तुम्ही वापरत नाही असे सिम कार्ड तुम्ही बंद करण्यासाठी रिक्वेस्ट देखील करू शकतात. बऱ्याच वेळेस तुमचा मोबाईल हरवतो किंवा चोरीला जातो अशा वेळेस देखील तुम्ही तुमचे सिम कार्ड ब्लॉक केले पाहिजे. ते तुम्ही या वेबसाईटवर जाऊन करू शकतात, जेणेकरून तुमच्या सिम कार्डचा दुरुपयोग करून कोणत्याही गुन्हा घडणार नाही. मित्रांनो या पोर्टलचा वापर करा आणि तुमच्या नावावर गुन्हा होण्यापासून थांबवा. सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी, तुमच्या नावावर किती सिमकार्ड घेतले गेलेले आहे यासाठी, तसेच सिम कार्ड बद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या काही स्टेप फॉलो करू शकतात.

हे देखील वाचा: Free Silai Machine योजनेसाठी आवश्यक पात्रता

मित्रांनो माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा, धन्यवाद!

Adhar card, adhar card fraud, uidai, sim card on adhar card, how many sim card you can buy on your adhar card, block unauthorised sim card on my adhar

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!