Active Sim Card On My Adhar Card: मित्रांनो या लेखामध्ये जाणून घेऊया की तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत? तुमच्या नावावर तुम्ही किती सिम कार्ड आतापर्यंत घेतलेली आहे? तसेच तुम्ही न वापरता दुसरी कोणी व्यक्ती तर तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड वापरत नाही ना?
- मित्रांनो तुम्हाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतले गेलेले आहेत.
- यावरून तुम्ही ओळखू शकतात की तुमच्याकडे किती सिमकार्ड आहेत.
- एका आधार कार्ड वर जवळ जवळ 9 सिम कार्ड घेऊ शकतात.
- त्यामुळे तुमचे आधार वापरून नकळत इतर कुणी सिमकार्ड घेऊ शकते.
- आता तुम्ही तुमच्या नावावर ऍक्टिव्ह असलेल्या सिम कार्ड ची सहजरित्या माहिती घेऊ शकतात.
- एकदा तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड माहिती पडले की जे नंबर ऍक्टिव्ह नाहीत ते तुम्ही ब्लॉक करू शकतात.
- आज आपण या लेखांमध्ये याची प्रोसेस जाणून घेऊया.
हे देखील वाचा: आधार कार्ड अपडेट कसे करायचे? Mobile number, Address अशा पद्धतीने करा अपडेट
Active Sim Card On My Adhar Card
मित्रांनो, आधार कार्ड हे एक प्रत्येक भारतीय साठी महत्त्वाचे कागदपत्र असून ते आपण ओळखपत्र म्हणून वापरतो. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी, कुठे हीऍडमिशन घेण्यासाठी तसेच कुठलाही व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे असते. जसे की बँकेत खातं उघडायचं असेल, केवायसी करणे, रेशन कार्ड साठी, ड्रायव्हिंग लायसन्स साठी इत्यादी.
हे देखील वाचा: Maharashtra Satbara Utara Online महाराष्ट्र 7 12 उतारा कसा बघायचा?
त्याचप्रमाणे सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी सरकारच्या दूरसंच विभागाने बनवलेल्या नियमानुसार एका आधार कार्डवर 9 सिम कार्ड घेता येतात. परंतु हे सर्व सिम कार्ड एकच व्यक्ती ऑपरेट करू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोकांचे आधार कार्डवर इतर अनेक सिमकार्ड घेतली जातात. मात्र याबद्दल आधार कार्ड धारकाला माहिती नसते.
DoT च्या वेबसाईटवर मिळेल माहिती: TAFCOP Consumer Portal
जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड ऍक्टिव्ह आहे तर तुमच्यासाठी हे TAFCOP Consumer Portal महत्त्वाचे आहे. https://tafcop.dgtelecom.gov.in/ या पोर्टल वर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डवर ऍक्टिव्ह असलेल्या मोबाईल नंबरची माहिती घेऊ शकतात.
- अनधिकृत सिमकार्ड ब्लॉक करण्याची विनंती देखील येथे तुम्ही करू शकतात.
- जर तुम्ही एखादे सिम कार्ड वापरत नाही तर ते बंद करण्याची विनंती देखील तुम्ही करू शकतात.
- यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटच्या साईट ओपन करायचे आहे.
- त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या कॉलम मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- नंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी मिळेल तो तेथे टाका आणि पुढे क्लिक करा.
- सर्व मोबाईल क्रमांक तुमच्यासमोर दिसून येतील.
- तुम्ही कोणते मोबाईल नंबर जर आधार कार्ड ची लिंक केलेले असेल तर तेही तुम्हाला तिथे दिसेल.
- जर कोणतीही बेकायदेशीर नंबर आढळला तर तो ब्लॉक देखील तुम्ही येथून करू शकता
- त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून हे कसे करायचे ते बघा.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून तुमच्या आधारवर ऍक्टिव्ह असलेले बेकायदेशीर सिम कार्ड ब्लॉक करा.
Active sim card on my adhar card, Active sim card, Adhar card, My adhar, Register sim card, सिम कार्ड कोणाच्या नावावर आहे, आधार कार्डवर किती सिम आहेत ऍक्टिव्ह
1 thought on “Active Sim Card On My Adhar Card|ऑनलाइन चेक करा तुमच्या आधार कार्डवर किती सिम आहेत ऍक्टिव्ह|तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड?”