Gai Gotha, Navin Vihir mgnrega Online Complaint: मित्रांनो राज्य सरकारकडून राज्यातील जलसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. परंतु अशा योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्यामुळे बहुतांश लाभार्थी या योजनांपासून वंचित राहून जातात. ग्रामपंचायत मनरेगा अंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येत असतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
ग्रामपंचायत मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना जनसामान्य नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे विहीर गाय गोठा अनुदान योजनेचे अर्ज स्वीकारणे, योजनेची माहिती योग्यरीत्या न देणे, सविस्तर माहिती नसणे, योजनेची अंमलबजावणी न होणे इत्यादी समस्या ग्रामस्तरावर उद्भवत असतात. या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र शासनाकडून 14 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या नवीन मनरेगा पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जनसामान्य नागरिकांना विविध योजना संबंधीच्या तक्रारी आता नोंदवता येणार आहे.
आपल्या राज्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीचा दरवाजा तुटवावा लागतो. अशावेळी ग्रामपंचायतीकडून पुरेशी माहिती मिळत नाही किंवा अजून पर्यंत ही योजना आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुरू झालेली नाही अशा विविध कारणे सांगून या योजनेची अंमलबजावणी योग्यरिते ते करत नाहीत. काही ग्रामपंचायतीमध्ये तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैशाची मागणी सुद्धा केली जाते.
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पैशाची मागणी करणे ही काही नवीन बाब नाही, तुमच्यासमोरही अशा गोष्टी आधी येऊन गेलेले असतील. अशाच समस्यांची तक्रार तुम्ही आता मनरेगाच्या सरकारी पोर्टलवर करू शकता.
हे देखील वाचा: शासन निर्णय: तलंगा गट वाटप – योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
mgnrega Online Complaint
Mgnrega Online Complaint: मित्रांनो, मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या विविध योजनांची संबंधित नागरिकांना कोणत्याही प्रकारची तक्रार करायची असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- सर्वात आधी नागरिकांना मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर आल्यावर सर्वात शेवटी तुम्हाला ”रजिस्टर युवर कंप्लेंट” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तेथे तुमचा मोबाईल नंबर.
- तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो डीपी टाकून तुमचे संपूर्ण नाव त्या ठिकाणी टाकून घ्या.
- पुढे तुमच्या समोर मनरेगाचं नवीन पान दिसेल.
- या ठिकाणी तुमच्या मागील तक्रारी व नवीन तक्रारी करण्यासाठी Register New Complain हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता तुम्ही स्वतःसाठी तक्रार करताय का इतरांसाठी तक्रार करताय ते निवडा.
- पुढे तुम्हाला तुमच्या जॉब कार्डचा आयडी टाकावा लागेल( जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर जॉब कार्ड कसा काढावा हे वाचा).
- तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, आणि गावाचे नाव निवडून पिन कोड टाकावा लागेल.
- आता बी डी ओ, तहसीलदार, कृषी विभाग यापैकी तुम्हाला ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची आहे तो पर्याय निवडा.
- पुढे तुमच्या तक्रारीची माहिती त्या ठिकाणी 200 शब्दांमध्ये तुम्ही टाकू शकतात.
- तुम्हाला तुमच्या माहिती, वा किंवा योज असेल तर PDF टाईप मध्ये येथे अपलोड करा.
- आता सेल्फ डिक्लेरेशन या पर्यायावर क्लिक करून तुमची तक्रार सबमिट(Submit) करा.
- आता तुम्ही दाखल केलेल्या तक्रारीचा एक क्रमांक तुम्हाला देण्यात येईल तो तुम्ही नोंद करून ठेवायचा आहे.
- या क्रमांकाच्या आधारे तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाईन पाहू शकतात.
अशा प्रकारे मनरेगाच्या विविध योजना संबंधित तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन नोंदवू शकतात.
हे देखील वाचा: कांदा चाळ अनुदान योजना, नवीन वर्षात कांदा चाळ 50 टक्के अनुदान योजना भरा घरबसल्या ऑनलाइन फॉर्म
mgnrega online complaint, mgnrega complaint online, mgnrega, nrega nic in, mgnrega in nic, मनरेगा तक्रार