पांढरे रेशन कार्ड धारकांनाही मिळणार आयुष्यमान भारत योजनेचा लाभ| अशा पद्धतीने मिळवा लाभ |Ayushman Bharat Card

Ayushman Bharat card: महत्वाची बातमी पाहूयात. पांढरा रेशन कार्ड धारकांनाही आता आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे. अन्न नागरी आणि संरक्षण पुरवठा विभागांना आता या संदर्भातील सूचना दिलेल्या आहेत या आधी केशरी पिवळा रेशन कार्डधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत होता भाताचा पांढऱ्या रेशन कार्डधारकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणारे आणि त्यांना पाच लाखांच्या मोफत उपचाराची सुविधा सुद्धा मिळणार आहे.

चला तर मित्रांनो आता आपण पाहूया की पांढरे रेशन कार्ड तारक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात. आणि आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार कसा घेऊ शकतात.

Ayushman Bharat Card for White Ration Card Holder

आता तुमच्याकडे जर पांढरे रेशन कार्ड असेल तरीसुद्धा तुम्ही आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्डचा लाभ मिळू शकतात. अशी सूचना अन्न, नागरी व संरक्षण पुरवठा विभागाने दिलेली आहे. हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. मित्रांनो, सरकारच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान योजना यांची एकत्रितपणे सांगड घालून या योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शासनाच्या केशरी, पिवळे रेशन कार्ड धारक असलेल्या व्यक्तींना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ यापूर्वी मिळत होता. या योजनेपासून आधी पांढरे रेशन कार्डधारक व्यक्ती वंचित राहत होते. पण आता शासनाच्या आरोग्य विभागाच्या या निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे. आता पांढरे रेशन कार्ड धारक देखील आयुष्यमान योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना राबवली जात आहे. या भारतीय व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार अगदी मोफत करून दिले जात आहे. हाच लाभ आता पांढरे रेशन कार्डधारक व्यक्ती देखील उचलू शकतील. महाराष्ट्र राज्यात सुमारे 1350 एवढी रुग्णालय आयुष्यमान भारत कार्ड धारकांना शंभर टक्के मोफत उपचार देत आहेत

हे देखील वाचा: आधार कार्ड अपडेट कसे करायचे? Mobile number, Address अशा पद्धतीने करा अपडेट

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!