Government Scheme Maharashtra: मित्रांनो, एक अशी योजना आहे ज्यातून शेतकरी पतीला दोन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. या योजनेबद्दल आता आपण जाणून घेऊया. या योजनेचे नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना(gopinath munde farmer accident insurance scheme). या योजनेतून शेतकरी पतीला 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. आता आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया.
हे देखील वाचा: Swasthya bima yojana: स्वास्थ्य बीमा योजनेची संपूर्ण माहिती मराठीमध्ये
Government Scheme Maharashtra
gopinath munde farmer accident insurance scheme
मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह औंढा या योजनेअंतर्गत जर शेतकरी पत्नी बाळांतपणात दुर्दैवाने मरण पावली तर तिच्या शेतकरी पतीला दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी विमा दावा पत्र, सातबारा उतारा, 6- क वारस नोंद, 6- ड फेरफार, वयाचा पुरावा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ चा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, विच्छेदन अहवाल, अपंगत्व असल्यास अपंगाची टक्केवारी नमूद असलेले जिल्हा प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते.
या योजनेअंतर्गत जर
- अपघाती मृत्यू झाल्यास
- अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास
- अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास
- बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला
- आणि इतर प्रकरणात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला 2 लाख रुपये सानुग्रह रक्कम प्रदान केली जाते.
बाळंतपण हे प्रत्येक महिलेसाठी एक पुनर्जन्म असतो असं म्हटले जाते. पण काही वेळा बाळंतपणा दरम्यान महिलेचा अनपेक्षितपणे मृत्यू होतो. अशा स्थितीमध्ये तिचे कुटुंब देखील खचून जाते. अशा परिस्थितीत त्या महिलेच्या कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत व्हावी म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत दोन लाख रुपयांची मदत दिली जाते.
हे देखील वाचा: अश्या पद्धतीने करा लाडकी बहिण योजनेचा अर्ज
gopinath munde farmer accident insurance scheme इतर महत्त्वाच्या बाबी:
रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, संतुनाशक किंवा इतर कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का लागून मृत्यू, वीज पडून मृत्यू, सर्पदंश किंवा विंचू दंश, बाळंतपणातील मृत्यू, जनावराच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे जखमी किंवा मृत्यू यासोबत अन्न कोणताही अपघात झाल्यास या योजनेतून आर्थिक लाभ दिला जातो.
वरील कारणांमुळे जर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्याही दूर केल्या जातात. तालुकास्तरावर समितीचे अध्यक्ष तहसीलदार असतात आणि तालुका कृषी अधिकारी सचिव असतात. तालुका पातळीवरच प्रस्तावास मंजुरी देण्याचे अधिकार आहेत. यामुळे आर्थिक लाभ लवकर मिळण्यास मदत होते.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असा करा अर्ज