हरविलेला किंवा चोरी झालेला मोबाईल कसा ब्लॉक करायचा? | how to block lost phone with Sanchar saathi

मित्रांनो, संचार साथी पोर्टल हरविलेला किंवा चोरी झालेला मोबाईल तसेच सिम कार्ड  ब्लॉक किंवा अनब्लॉक करण्यासाठी वापरले जात आहे.  जर तुमचा देखील मोबाईल हरवला असेल किंवा चोरी गेला असेल तर तुम्ही तो ट्रॅक करू शकता. आपण येथे जाणून घेऊया  तुमचा हरविलेला किंवा चोरी झालेला फोन कसा ब्लॉक करायचा(how to block lost phone)

संचार साथी पोर्टल संपूर्ण माहिती

हे देखील वाचा: संचार साथी पोर्टल वरून तक्रारीची स्थिती कशी तपासायची?

मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर कसा ब्लॉक करायचा? (how to block lost phone)

  • हरविलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करा.
  •  सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारची अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • Sancharsaathi portal
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर तुम्हाला “Block stolen/lost mobile”  हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला हरवलेल्या मोबाईलची माहिती भरायची आहे. जसे की मोबाईल नंबर, IMEI number, device, brand name, model, मोबाईल विकत घेतल्याची पावती इत्यादी.
how to block lost phone
  • तसेच पुढे मोबाईल कुठे हरवला म्हणजेच स्थळ, तारीख,  जिल्हा, राज्य, पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या कंप्लेंट चा नंबर, आणि कंप्लेंट ची पावती.
how to block lost phone with Sanchar saathi
  •  येथे पुढे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देखील भरावी लागेल. जसे की तुमचे नाव, पत्ता, ओळखपत्र म्हणून तुमच्या आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर( तुमच्या जवळच्या व्यक्तीचा पण चालेल)
how to block lost phone with Sanchar saathi
  •  ही सर्व डिटेल्स अचूक भरा आणि पुढे Get OTP या पर्यायावर क्लिक करा.  तुमच्या दिलेल्या नंबर वर ओटीपी मिळालेला असेल, तो तेथे टाका.
  • त्याखाली declaration  या चेक बॉक्स वर क्लिक करा. आणि सबमिट या बटनवर क्लिक करा.
  •  ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला request id  तिला जाईल. तो सांभाळून ठेवा. हा request id तुमचा मोबाईल परत मिळाल्यानंतर त्याला unblock करण्यासाठी लागेल.
  • अशाप्रकारे तुम्ही तुमचा चोरी गेलेला किंवा हरविलेला मोबाईल ब्लॉक करू शकता.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!