संचार साथी पोर्टल लॉन्च | संचार साथी पोर्टल वरून चोरी झालेला मोबाईल असा शोधा | संपूर्ण माहिती

मित्रांनो चोरीच्या बातम्या तर आपण नेहमीच ऐकत असतो. त्यातल्या त्यात मोबाईल चोरी ही एक अतिशय कॉमन आणि नेहमी घडणारी चोरी आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तर मोबाईल नेहमी चोरीला जात असतात. आता आपल्या भारत सरकारने sanchar sathi portal  लॉन्च केले आहे. या पोर्टलचा एकच उद्देश आहे तो म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षा तसेच जबाबदारी वाढवणे. कुणाचा मोबाईल जर हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही sanchar sathi portal या  पोर्टलच्या सहाय्याने तुम्ही तुमचा मोबाईल शोधू शकता किंवा  ब्लॉक करू शकता. मोबाईल सोबतच तुमचा सिम कार्ड जर खूप  दिवसापूर्वी हरविले असेल तर तुमचं सिम कार्ड कुणी वापरत तर नाही ना तेही तुम्ही येथे शोधू शकतात. आणि असे सिम कार्ड तुम्ही बंद करू शकतात. चला तर मित्रांनो संचार साथी पोर्टल बद्दल आपण आता अधिक माहिती घेऊया.

Sanchar saathi portal

Sanchar saathi portal

संचार साथी पोर्टल हे मोबाईल ग्राहकांना सक्षम करण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता आणि सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सरकारच्या नागरिक  केंद्रित उपक्रमा जागरूकता वाढविण्यासाठी दूरसंचार विभागाचा एक उपक्रम आहे. याचा वापर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

संचार साथी नागरिकांना त्यांच्या नावाने घेतलेले मोबाईल कनेक्शन जाणून घेण्याची परवानगी देते. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा कनेक्शन नको असेल तर ते तुम्ही डिस्कनेक्ट देखील येथून करू शकतात. हरविलेला मोबाईल किंवा सिम कार्ड ब्लॉक करू शकता. संचार साथी मध्ये CEIR, TAFCOP इत्यादी विविध मॉड्युल आहेत. ही sanchar sathi meaning in marathi  माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

Sanchar saathi portal benefits

  • हरविलेला मोबाईल सहजपणे ट्रॅक करू शकतो.
  •  संचार साथीचा वापर करून त्या मोबाईलला तुम्ही block/unblock  करू शकता.
  •  सरकारी वेबसाईट असल्याने कोणतीही पैसे देण्याची आवश्यकता नाही.
  •  तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल कोणी दुसरे वापरू शकत नाही.
  •  वेबसाईट सरकारी असल्याने येथे तुमची फसवणूक होणार नाही.
  •  मोबाईल प्रमाणेच ठरविलेले सिम कार्ड ब्लॉक करू शकता.
मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर कसा ब्लॉक करायचा?

How Sanchar saathi portal works?

Sanchar sathi portal  दुसऱ्या कंपन्यांशी जुळलेले आहे. जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तेव्हा संचार साथी पोर्टल वरती नोंदणी केल्यानंतर, हे पोर्टल दुसऱ्या दूरसंचार कंपन्यांशी संपर्क साधून तुमचा  चोरी झालेला किंवा ठरविलेला मोबाईल ट्रॅक करते. हे पोर्टल सरकारी असल्याने तुम्हाला याचा लाभ फ्री मध्ये घेता येणार आहे.

हे देखील वाचा: संचार साथी पोर्टल वरून तक्रारीची स्थिती कशी तपासायची?

Sanchar saathi app

मित्रांनो, संचार साथी पोर्टलचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल शोधू शकता, तो ब्लॉक किंवा अनब्लॉक करू शकतात. जर तुम्हाला Sanchar sathi app हवे असेल, तर तुम्हाला सांगण्यात येत आहे की अजून अधिकृतपणे sanchar sathi app develop झालेले नाही. पण तुम्ही जेव्हा पण  जुना मोबाईल विकत घेता तेव्हा Know your mobile(KYM) या app चा वापर करून IMEI नंबर टाकून मोबाईल चेक करून घ्यावा. म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा मोबाईल हा चोरीचा किंवा हरवलेला मोबाईल तर नाही ना. असा मोबाईल तुम्ही घेणे टाळू शकता.

हे देखील वाचा: Active Sim Card On My Adhar Card

काय आहे sancharsaathi.gov.in

sancharsaathi.gov.in पोर्टल हा मोबाईल ग्राहकांना सक्षम करण्यासाठी, त्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दूरसंचार विभागाचा एक नागरिक केंद्रित उपक्रम आहे. चोरीला गेलेला/हरवलेला मोबाईल फोन ब्लॉक करून शोधून काढणे आणि नवीन/ खरेदी करताना डिव्हाइसची खरी ओळख करून देणे याद्वारे त्यांना सक्षम करते. जुना मोबाईल फोन. संचार साथी हे पोर्टल संशयित फसवणूक तक्रार करण्यासाठी नागरिकांना मदत करते. संचार साथी मध्ये Chakshu, CEIR, TAFCOP, KYM, RICWIN, KYI इत्यादी विविध मॉड्यूल्स आहेत.

संचार साथी पोर्टलची अधिकृत वेबसाईट: sancharsaathi.gov.in

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!