नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा ब्लॉग देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ती म्हणजे Mini tractor anudan yojana. मिनिट ट्रॅक्टर व त्यांची उपसागणे यांचा पुरवठा करणारी योजना. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार देखील नेहमी कार्यरत असते. अशीच एक योजना आहे मिनि ट्रॅक्टर अनुदान योजना. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया काय आहे ती मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना.
Mini tractor anudan yojana Maharashtra
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या राज्यात बहुतांश शेतकरी हे गरीब रेषेखालील आहेत. त्यांचे आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यांना शेतीमध्ये पेरणी पासून ते ती काढणीपर्यंत विविध कामासाठी पैशाची गरज भासते. त्यासाठी ते कर्ज देखील घेतात. बरेच शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यामुळे जास्त पीक घेता येत नाही आणि अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते.
शेती जर आधुनिक पद्धतीने केली तर त्यांना उत्पन्न चांगले घेता येईल. आधुनिक पद्धतीने शेती करायची म्हणजे विविध यंत्रसामग्रीचा वापर करणे आवश्यक राहील. आता असे आधुनिक सामग्री खरेदी करण्यासाठी देखील पैसे लागतील. म्हणूनच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा सर्व समस्यांचा विचार करून राज्य सरकारने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणारी योजना सुरू करण्याचे महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना
आपल्या राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटक यांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर तसेच त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि उपसागणे खरेदी करण्याकरता 3 लाख 150हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. मित्रांनो तुम्हालाही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जसे की Mini tractor anudan yojana उद्देश काय? या योजनेचे लाभार्थी पात्रतेचे निकष काय? या योजनेअंतर्गत अनुदान घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा? अशी सर्व माहिती आपण येथे जाणून घेऊया.
Mini tractor anudan yojana या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष काय?
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- स्वयंसहायता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक आतील असावेत.
- बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
- मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने खरेदी करण्याची कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी राहील.
- स्वयंसहायता बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या 10 टक्के सोयीचा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90%( जास्तीत जास्त 3.15 लाख) शासकीय अनुदान देय राहील.
- स्वयंसहायता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावाने बँक खाते उघडणे आवश्यक आहे. हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या आधार क्रमांकाची जोडलेले असावे.
- बचत गटाने या योजनेअंतर्गत देय असलेल्या किमान नऊ ते अठरा अश्वशक्ती पेक्षा जास्त व शक्तीचा ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत देय असलेल्या(3.15 lakh) अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम बचत गटाला खर्च करावी लागेल.
- संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसहायता बचत गटांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागवतील. अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने अर्जदाराची निवड केली जाईल.
- निवड झालेल्या स्वयंसहायता बचत गटाला लिखित द्वारे कळविण्यात येईल.
- ज्या लाभार्थ्यांना पॉवर ट्रेलर चा लाभ दिलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हे देखील वाचा: कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरा
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती काय? (Mini tractor anudan yojana Maharashtra terms and conditions)
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य राहील.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ मिळवण्याकरता शेतकरी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
- स्वयंसहायता बचत गटातील कमीत कमी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. आणि अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.
- मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर 3.15 लाख शासकीय अनुदान देय राहील.
- ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.
- स्वयंसहायता बचत गटांनी अनुदान रकमेच्या कमाल मर्यादेच्या दहा टक्के सोयीचा भरल्यानंतर 90% हिस्सा म्हणजे जास्तीत जास्त 3.15 लाख रुपये शासकीय अनुदान देय राहील.
- या योजनेअंतर्गत मिळालेले मिनी ट्रॅक्टर हा विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही.
हे देखील वाचा: मधुमक्षिका पालन योजना फॉर्म, कागदपत्रे, पात्रता, माहिती वाचा
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे कोणती? (Mini tractor anudan yojana document required)
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- रहिवासी दाखला
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याचा तपशील
- बचत गटाचे प्रमाणपत्र
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या.