Lek ladki yojana form Maharashtra Online/Offline apply 2024 | या योजनेतून मुलींसाठी 1 लाख 1000 रुपये  मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा?

 मित्रांनो, भारत सरकारच्या विविध योजनांपैकी एक आहे लेक लाडकी योजना. महाराष्ट्र राज्यामध्ये एक एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना lek ladki  योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. Lek ladki yojana form Maharashtra साठीकसा करावा हे आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण जाणून घेऊया काय आहे ही योजना? lek ladki yojana document कोणते लागणार? अटी आणि शर्ती काय असणार? कोण कोण लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकतो? ही सर्व माहिती.

Lek ladki yojana form maharashtra

 गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी लेक लाडकी ही कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकारने राबविण्याचा निर्णय घेतलेला होता. एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना अठरा वर्षानंतर पाच टप्प्यात एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, पहिलीच्या वर्गात गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीच्या वर्गात गेल्यावर 7000 रुपये, अकरावीच्या वर्गात केल्यावर आठ हजार रुपये, आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम येणार आहे.

लेक लाडकी योजनेचा लाभ कुणाला होणार?

लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व  केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना होणार. एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक ते दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील. एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला ही योजना लागू होणार नाही.

याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा: लेक लाडकी योजना महाराष्ट्र अधिक माहिती

लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? (Lek ladki yojana form)

Online पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला offline पद्धतीने अर्ज करावा लागेल.  त्यासाठी तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करावा लागेल. 

 अर्ज चा नमुना पुढे दिलेला आहे. तो तुम्ही डाऊनलोड करू शकता. किंवा एका साध्या कागदावर तुम्ही हा अर्ज लिहून देखील शकता.

या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर,  मुलीची माहिती, बँक खात्याचा तपशील, आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज करत आहात ते लिहायचं आहे. शेवटी तारीख, ठिकाण, सही करायची आहे. अर्ज  लिहिल्यानंतर हा Lek ladki yojana form तुम्हाला अंगणवाडी  सेविकेकडे जमा करून त्याची पोचपावती घ्यायची आहे.

हे देखील वाचा: माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अटी आणि शर्ती काय?

Lek ladki yojana document

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला
  •  कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला( वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे)
  •  लाभार्थ्याचे आधार कार्ड( पहिल्यांदा लाभ घेत असताना ही अट शिथिल राहील)
  •  पालकाचे आधार कार्ड
  •  बँक पासबुक झेरॉक्स
  •  रेशन कार्ड प्रत
  •  पालकाचे मतदान ओळखपत्र
  •  शाळेचा दाखला
  •  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

एकदा का तुम्ही ही कागदपत्रे जोडूनवर दिलेल्या फॉरमॅटमध्ये Lek ladki yojana form लिहिला आणि अंगणवाडी सेविकेकडे जमा केला, की अंगणवाडी सेविकेकडून पोच पावती घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे कागदपत्रे नीट तपासले जातील आणि ऑनलाईन पोर्टलवर याची नोंद केली जाईल. त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे दिला जाईल. अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठविला जाईल. प्रशासकीय यंत्रणेनं दोन महिन्यांच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करावयाची अनिवार्य राहील. एकदा का लाभार्थी निश्चित झाली की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!