पोस्ट ऑफिस ची एक जबरदस्त योजना म्हणजे Post Office mis Scheme. पोस्ट ऑफिस बचत योजनांना भारतात जास्त प्राधान्य दिले जाते हे आपल्याला माहीतच आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर किंवा त्यापूर्वी मासिक उत्पन्नाची सोय करून ठेवायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला Post Office mis interest rate 2024 माहित असणे आवश्यक आहे.
Post Office mis scheme
- खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावं लागेल.
- संयुक्त खातं उघडून जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
- आणि जर तुम्हाला जॉईंट खातं उघडून गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
- कोणताही भारतीय नागरिक ( दहा वर्ष आणि त्यावरील) या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतो.
हे देखील वाचा: बघा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम संपूर्ण माहिती
Post Office mis interest rate 2024
या बचत योजनेवर भारत सरकार सध्या 7.4 टक्के एवढ्या दराने वार्षिक व्याज देत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर मिळणारे हे वार्षिक व्याज 12 महिन्यात वितरित केले जाते. आणि त्यानंतर तुम्हाला ही रक्कम तर महा मिळत राहते. जर तुम्ही दर महिन्याला पैसे काढले नाही तर तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात ते पैसे राहतील. आणि तुम्हाला हे पैसे मूळ रकमेसह जोडून आणखी व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही एक गॅरंटी रिटर्न्स योजना आहे. जर तुम्हाला गॅरंटी रिटर्न योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि तुमचं रिटायरमेंट सुरक्षित करू शकता.
चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या पोस्ट ऑफिस एम आय एस योजनेअंतर्गत तुम्हाला किती इंटरेस्टेड मिळू शकतो. तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला नऊ हजार रुपयांपेक्षा अधिक नियमित उत्पन्न हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला जॉईंट खातं उघडावं लागेल. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जर तुम्ही या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला 7.4% एवढं व्याजाची रक्कम म्हणजे 1.11 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही ही व्याजाचे रक्कम वर्षाच्या बारा महिन्यात समान प्रमाणात विभागली तर तुम्हाला तर महिन्याला 9250 एवढे रुपये मिळत जातील. जर तुम्हाला संयुक्त खाते उघडून या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 66 हजार 600 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच दर महिन्याला 5550 रुपये मिळतील.