शेतकऱ्यांनो! आनंदाची बातमी! | मान्सूनची 12 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत

 Mansoon update 2024: मित्रांनो, मे महिन्याचा तीव्र उकाडा आणि अवकाळीचा होणारा पाऊस यांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. अशा महाराष्ट्र राज्यात यंदा मान्सूनचे आगमन 10 ते 12 जून पर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होत असून नागपुरात 12 जून पर्यंत मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा: साठेखत म्हणजे काय | साठेखत करणे का आवश्यक असते?

नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या हालचालीवरून मिळालेले आहेत संकेत(Mansoon update 2024)

सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ ची स्थिती आहे. तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे. ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची बातमी हवामान तज्ञ श्री माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

 सध्याची स्थिती आहे ती जर कायम राहिली तर यात आठवड्यात म्हणजे 19 मे पर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस  देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी आणि तसेच तो मात्र बेटापर्यंत धडक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जून पर्यंत देशाच्या प्रवेशद्वारा जवळ म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो. मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो यापूर्वीच म्हणजे 27 ते 28 मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यानंतर दहा ते बारा दिवसांमध्ये तो अरबी समुद्रात धडकेल. आणि पुढे तिथून महाराष्ट्रात, असा अंदाज आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण ठिकाणी विजयसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. Mansoon update 2024

हे देखील वाचा: खरंच रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ? पहा डी.ए.पी., युरिया खतांचे 2024 या वर्षीचे भाव

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!