मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे Kisan Vikas Patra Scheme. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना खूप लोकप्रिय योजना म्हणून प्रचलित होत आहे.
या योजनेअंतर्गत जर तुम्ही काही रक्कम गुंतवणूक केली तर ती दुप्पट होते. सोबतच तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा होतो. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये पैसे एकत्र गुंतवावे लागतात. आणि तुमचे पैसे एका निश्चित कालावधीमध्ये दुप्पट होतात. चला तर मित्रांनो details of kisan vikas patra या योजनेबद्दल आपण आता अधिक माहिती घेऊया.
Kisan Vikas Patra Scheme
किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक प्रचलित योजना आहे. ज्यामध्ये पैसे एकत्रित या गुंतवावे लागतात. तुम्ही गुंतवलेल्या पैसे एका निश्चित कालावधीत दुप्पट होतात. ही योजना पोस्ट ऑफिस ची अशी योजना आहे त्यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत सध्या 7.5 टक्के एवढं वार्षिक व्याज दिले जात आहे. हा तर पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या मुदत ठेव योजनेच्या बरोबरीचा आहे.
हे देखील वाचा: Post Office mis interest rate 2024 | पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत किती रुपये कमवू शकता?
Details of kisan vikas patra
- मित्रांनो, ही देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठमोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे.
- म्हणजेच तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेचा फायदा तर घेऊ शकतातच पण जर तुमची इतर बँकांमध्ये खाते असेल तर तिथे पण तुम्ही या योजनेचा तपशील काढू शकतात.
- केंद्र सरकारने किसान विकास पत्र योजनेवरील व्याज एक एप्रिल 2023 पासून 7.2% वरून 7.5 टक्के एवढा केला आहे.
- सध्याच्या व्यासदरानुसार किसान विकास पत्र योजनेतील पैसे 115 महिन्यात म्हणजे दहा वर्षे आणि तीन महिन्यांमध्ये दुप्पट होतात.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा.
किसान विकास पत्र खाते कसे उघडायचे?
- तर तुम्हाला किसान विकास पत्र खाते उघडायचे असेल तर तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- याशिवाय अठरा वर्ष खालील अल्पवयीन मुलाचे खाते उघडायचे असेल तर त्या कुटुंबातील कोणताही प्रौढ व्यक्ती उघडू शकतो.
- Kisan Vikas Patra योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करू शकता.
- जर तुमचे खाते बँके शाखेमध्ये असेल तर तुमच्या बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
- पोस्ट ऑफिस मध्ये kvp scheme खाते उघडल्यास, तेथे तुम्हाला जमा पावती
- किंवा गुंतवणूक रोख रक्कम किंवा किंवा डिमांड ड्राफ्ट सह अर्ज भरावा लागेल.
- अर्जासाठी केवायसी आवश्यक असणार आहे.
- या केवायसी मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांचा समावेश असणार आहे.
- अर्ज आणि पैसे जमा केल्यानंतरच तुम्हाला किसान विकास पत्राचे प्रमाणपत्र दिले जाईल.
एखाद्या व्यक्तीने ही प्रक्रिया केली आणि जर तो एका वर्षाच्या आत परत आला तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही. हे खाते अर्ज केल्याच्या तारखेपासून दोन वर्ष सहा महिन्यानंतरच मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
हे देखील वाचा: फायदा करायचाय? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार 1.85 लाख रुपये व्याज
kvp योजनेअंतर्गत किती पैशांची गुंतवणूक करू शकतात?
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र मिळते. तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी 1000 रुपये, 5000 रुपये, 10000 रुपये, 50000 रुपये अशाप्रमाणे गुंतवणूक करू शकतात. आणि त्याच प्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र देखील उपलब्ध होईल.
e kisan vikas patra योजनेअंतर्गत किती टक्के व्याज मिळते? (current rate of interest on kvp)
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत मिळणारे व्याज एक एप्रिल 2023 पासून 7.2 टक्के वरून 7.5% एवढे केले आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत वार्षिक व्याज 7.5 टक्के एवढे मिळते.
हे देखील वाचा: जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रावर किती टक्के व्याज मिळते?
हे देखील वाचा: Post Office Gram Suraksha Scheme दररोज जमा करा 50 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये