साठेखत म्हणजे काय | साठेखत करणे का आवश्यक असते? | जाणून घ्या याचे फायदे काय

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की साठेखत म्हणजे काय.  साठे खतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यानंतर एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क खरेदी दाराला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे विकणाऱ्याला संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. खरेदीदार आणि विक्रेतार दोघांनीही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या मिळकतीचे खरेदी खत होऊन खरेदीदार याला त्या मिळकतीचा संपूर्ण ताबा मिळतो.

साठेखत म्हणजे काय

 एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल तो म्हणजे साठी साठेखत. पण साठेखत म्हणजे काय हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हे देखील वाचा: शासन निर्णय Sheli Palan Yojana: शेळी मेंढी पालन योजनेला नवीन मंजुरी

साठेखत म्हणजे काय?

 मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार साठे खत हा मिळकतीच्या विक्रीचा करार आहे. एखादी मालमत्ता भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार दुसरे काही नाही तर साठेखत हा होय. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार जर  भविष्यात करणार आहात, तर त्याविषयी माहिती देणाऱ्या कागदपत्र म्हणजे साठेखत.साठे खताला विसार, वायदा पत्र, बेचेन नामा असं देखील म्हटलं जातं.  चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया साठे खत कागदपत्राचे फायदे कोणते आहेत.

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा?

साठेखत कागदपत्राचे फायदे काय?

 साठेखत शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर वर करता येते. पण मित्रांनो शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर केलेले साठे खत कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. अशासाठी खताची शासकीय अभिलेखात नोंदणी करता येत नाही.तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये साठेखत नोंदणी करू शकतात. यालाच नोंदणीकृत साठेखत म्हटले जाते. हे साठेकर करताना तुम्हाला मालमत्तेचं पूर्ण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करावा लागतो. हे कायदेशीर रित्या फायद्याचं ठरते. अशा साठेखत ची नोंदणी महसूल दप्तरात इतर हक्क या सदरात नोंदवली जात असते.

 एकदा का तुम्ही नोंदणीकृत साठेखत  केले तर पुढे प्रत्यक्षात खरेदी करताना खरेदी दाराला मुद्रांक नोंदणी शुल्क करावे लागत नाही. तुम्ही हे नोंदणीकृत साठे खत तयार केले आणि काही कारणास्तव तुमचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही, तर हे साठेखत रद्द करता येऊ शकते. आणि मित्रांनो, पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर खरेदीदाराला त्यांनी झोप मुद्रांक शुल्क भरला होता तोही परत मिळतो. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया साठी खतामध्ये काय काय नमूद केलेलं असतं.

हे देखील वाचा: पोकरा लाभार्थी यादी कशी तपासायची? अशा पद्धतीने पहा यादीमध्ये तुमचे नाव

साठे खतामध्ये नमूद केल्या जातात या गोष्टी

  • मित्रांनो, प्रामुख्याने साठे खतामध्ये पुढील बाबींची माहिती नमूद केलेली असावी.
  • मालमत्ता  विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तीची नावे, त्यांचा पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक नमूद असावा.
  • मालमत्तेचा तपशील जसे की मालमत्तेचे ठिकाण म्हणजेच जागा, गट क्रमांक आणि क्षेत्रफळ, मालमत्तेच्या चारही बाजूंना काय आहे त्याची माहिती नमूद असावी.
  • खरेदीदार ठरलेली रक्कम कशा स्वरूपात आणि किती वेळात विक्रेत्याला देणार याचा देखील तपशील नमूद असावा.
  • साठेखत केल्याच्या  तारखेपासून ते कधीपर्यंत प्रत्यक्षात अमलात आणण्यात येईल, याची नोंद.
  • जर दिलेल्या मुदतीत खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होतील, याची माहिती नमूद असावी.
  • साठेखत करताना काही रक्कम आगाऊ स्वरूपात देण्यात आली आहे का?  हेही नमूद असावे.
  • जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली, म्हणजे विक्रेता जमिनीचा पूर्ण मालक आहे का ते पाहणे. यासाठी जमिनीचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट  घेता येऊ शकतो.
  • या मालमत्तेबाबत याआधी काही व्यवहार, गहन खत, साठेखत केले आहे का?
  • कोणत्या कारणासाठी मालमत्ता विकणार आहे याची माहिती असावी. मालमत्तेवर काही पोहोचा किंवा कर्ज आहे का, मालमत्तेसंबंधी कोर्टामध्ये खटला आहे का? याची माहिती असावी. 

हे देखील वाचा: अशा पद्धतीने पहा 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाइन तुमच्या मोबाईलवरून

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!