या 7 कागदपत्रांच्या आधारावर तुम्ही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकता |What are the Proof of land ownership

मित्रांनो, शेत जमीन च्या संदर्भात आपण वेगवेगळे वाद होत असताना बघतच असतो. जमिनीच्या मुद्द्यावरून  होणारे वाद विवाद  आपल्या राज्यभरात लाखो खटले  असतील.  बऱ्याच वेळेस असे होते की  जमिनीत काम करणारा वेगळा  आणि त्या जमिनीचा मालक  इतर कोणी दुसराच असतो.  म्हणून  जमिनीच्या मालकी  हक्काविषयी  वाद निर्माण होतो.  त्यामुळे  ती जमीन आपल्या मालकी हक्काचे आहे  हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे  काही आवश्यक कागदपत्रे असणे  गरजेचे आहे.  Proof of land ownership ज्या आधारे तुम्ही  तुमचा या जमिनीवरचा मालकी हक्क  सिद्ध करू शकतात.

Proof of Land Ownership

Proof of land ownership

जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात  जर काही वाद होत असतील  तर  जमिनीची मोजणी देखील केली जाते.  अशावेळी  आपल्या जवळ जमिनीचे  नकाशे  असणे आवश्यक आहे.  त्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येतो. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया कोण कोणती आहेत ही कागदपत्रे  ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवू शकतात.

हे देखील वाचा: Nano DAP By IFFCO ची किंमत आणि फायदे?

1) सातबारा उतारा

 मित्रांनो, या सात कागदपत्रांपैकी एक आहे सातबारा उतारा. हा जमिनीच्या मालकी हक्काचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. सातबारा उताऱ्यामध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, म्हणजेच त्या शेतकऱ्याचा किती जमिनीवर मालकी हक्क आहे. हे सर्व नमूद केलेलं असतं. सातबारा उताऱ्यावरील भूधारणा पद्धत मुळे जमिनीचा खरा मालक कोण,  याचा निकाल लागतो. 

  • मित्रांनो, भोगवटादार वर्ग 1 या पद्धतीमध्ये अशी जमीन  येते ज्यांचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
  • भोगवटादार वर्ग 2  मध्ये अशा जमिनी येतात ज्यांच्यावर सरकारचे निर्बंध आहेत, आणि सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतरण होऊ शकत नाही.
  •  तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकारी प्रवर्गात मोडल्या जातात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
  •  चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार जमिनी येतात. या जमिनीमध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10,30,50, किंवा 99 वर्षाच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात.

 मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा काढायचा असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

हे देखील वाचा: ऑनलाईन सातबारा(7/12) उतारा कसा बघायचा?

 2) खाते उतारा किंवा  8अ उतारा

 मित्रांनो, एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेले असू शकते. या सर्व गट क्रमांकांमध्ये शेत जमिनीची माहिती एकत्रितपणे 8अ उताऱ्यामध्ये नमूद केलेली असते. या उताऱ्यांवरून तुमची जमीन कोणकोणत्या गटात आहे याची माहिती मिळते. म्हणूनच हा एक महत्त्वाचा कागदपत्र आहे, जो जमिनीवरील तुमचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतो.

 3) जमीन मोजणीचे नकाशे

 जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमीन मोजणीचे नकाशे हा सुद्धा महत्त्वाचं कागदपत्र असतो. जमिनी मालकीच्या हक्का संदर्भात जर काही वाद निर्माण झाले तर जमिनीची मोजणी केली जाते. अशावेळी जमीन मोजणीचे नकाशे आपल्याजवळ असणे आवश्यक ठरते. एक ठराविक गट नकाशातील शेत जमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे हे सर्व माहिती या नकाशावर नमूद केलेले असते.  हे सुद्धा एक  चांगलं Proof of land ownership  ठरते.

हे देखील वाचा: कांदा चाळ अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

4) खरेदी खत

जेव्हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार होतो तेव्हा जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी हा खरेदी खत document आवश्यक असतं. खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला? कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला? किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना व्यवहार झाला? अशी सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली असते.

 खरेदी खत झालं की ती माहिती फेरफार वर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद केली जाते.

 5) महसूलच्या पावत्या

 दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठी कार्यालयाकडून तुम्हाला जी पावती मिळते ती म्हणजेच महसूल पावती. ही सुद्धा जमिनीच्या मालकी हक्क बाबत महत्त्वाचा पुरावा ठरते. या पावत्या एका फाईल मध्ये तुम्ही सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात जर काही वाद उद्भवला तर तुमच्याजवळ या पावत्या पुरावा म्हणून उपलब्ध राहतील.

हे देखील वाचा: आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे कसे तपासावे?

 6) प्रॉपर्टी कार्ड

 बिगर शेती जमिनीवर जर तुमची मालमत्ता असेल तर  त्याच्या मालकी हक्क विषयी जागृत राहिला पाहिजे. मित्रांनो, बिगर शेत जमिनीवर मालमत्तेवरील हक्का दाखवणारा महत्त्वाचा  पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेत जमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते तर हा सुद्धा  एक महत्त्वाचा Proof of land ownership ठरतो.

7) जमिनीसंबंधीचे आधीचे  खटले

 मित्रांनो, एखादी जमीन जर तुमच्या मालकीची आहे आणि या जमिनीवर भूतकाळात कोणतीही केस किंवा खटला होऊन गेलेला असेल तर त्या खटल्याची कागदपत्र, त्यातील जबाबदाच्या प्रती, तसेच निकाल पत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्र आपल्याला शेतजमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठरतात. त्यामुळे तुम्हीही कागदपत्रे सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!