eNAM app for Farmers: मित्रांनो आपल्या कृषी उत्पादनांची खरेदी विक्री आता ऑनलाईन पद्धतीने देखील शक्य झाली आहे. हो मित्रांनो हे खरं आहे. नॅशनल एग्रीकल्चर मार्केट म्हणजेच e NAM हा भारतातील कृषी उत्पादनांसाठीचा ऑनलाइन खरेदी आणि विक्री पोर्टल आहे. हा पोर्टल शेतकरी, व्यापारी तसेच खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची?
e NAM App
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्यास हे ॲप मदत करत आहे. उत्पादनांच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा पोर्टल उपयुक्त ठरत आहे. मित्रांनो आता तुम्ही देखील शेतकरी असाल तर या पोर्टलचा फायदा नक्की घ्या. तुमच्या शेतातील पिकाला योग्य तो भाव येथे नक्की मिळेल. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तुमच्या शेतीतील कृषी उत्पादनांना या e NAM App वर खरेदी विक्री कशी करू शकतात.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?
भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार e NAM App आणि पोर्टलवर कृषी उत्पादनांची ऑनलाईन खरेदी विक्री कशी करायची?
शेतकऱ्यां व्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था तसेच मंड्या या पोर्टलचे भाग आहेत. तुम्हाला जर या पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागेल. या पोर्टलवर ज्या उत्पादनांचा व्यवहार करण्यात येतो त्याची यादी देखील तुम्हाला बघता येईल. आता आपण पाहूया या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची.
हे देखील वाचा: शेतमाल तारण कर्ज योजना: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा
e NAM App नोंदणी करायची प्रोसेस
- शेतकरी https://www.enam.gov.in/web/ या लिंक वर क्लिक करून नोंदणी करू शकतो किंवा या https://enam.gov.in/NAMV2/home/other_register.html पोर्टलवर भेट देऊ शकतो.
- आता पुढे तुम्हाला शेतकरी म्हणून नोंदणी प्रकार निवडावा लागेल आणि इच्छित APMC हा पर्याय निवडा.
- पुढे तुमचा ईमेल आयडी द्या ज्याच्यावर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या ईमेलवर एक तात्पुरता लॉगिन आयडिया आणि पासवर्ड मिळेल.
- आता त्या लॉगीन आयडिया आणि पासवर्ड ने e NAM पोर्टलवर लॉगिन करा.
- आता तुमच्या समोर एक मेसेज येईल. तो असा “click here to register with APMC”. त्यावर क्लिक करा.
- पुढे विचारलेली माहिती भरा.
- केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या निवडलेल्या APMC(Agricultural Produce Marketing Committee) कडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. तुमच्या टेस्ट बोर्डवर तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमचे सर्व APMC पत्त्याचे तपशील पाहू शकता.
- तुमचा नोंदणीचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला APMC सबमिट केल्याची पुष्टी करणारा ई-मेल तुमच्या ईमेल आयडीवर मिळेल.
- मंजूर झाल्यानंतर तुम्हाला eNAM शेतकरी कायमस्वरूपी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या संबंधित मंडी/APMC संपर्क साधू शकतात.
हे देखील वाचा: अशी करा ई पीक पाहणी e pik pahani app मधून
e NAM app download
मित्रांनो, आता सारखं सारखं तुम्हाला e NAM च्या पोर्टलवर जाण्याची गरज नाही. तुम्ही e NAM app download करू शकतात. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही play store वर जाऊन mobile app डाउनलोड करू शकतात. किंवा पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ॲप डाऊनलोड करा.