Shet Rasta Magni Arj in Marathi | शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा? | जाणून घ्या सविस्तर मराठी मध्ये

Shet Rasta Magni Arj in Marathi:  मित्रांनो, आपण शेतकरी आहात, त्यामुळे आपल्याला माहीतच आहे की चवीची जसजशी विभागणी होत जाते तस तशी रस्त्यांची मागणी देखील वाढते. भावाभावांमध्ये आपल्या वडिलांच्या शेताची विभागणी होते. विभागणी झाली की प्रत्येकाला आपापल्या शेतात जायला रस्त्याची गरज भासते. अशातच जर आपला शेत रस्ता कोणी अडवला तर समजदारीनेजर कोणी करू देत नसेल तर आपण कायदेशीर मार्गाने अर्ज करू शकतो. कायदेशीर मार्गाने आपण शेत रस्ता मागू शकतो. आता तुम्हाला माहिती नसेल  शेत रस्त्यासाठी अर्ज कुणाकडे करावा? कसा करावा? Shet Rasta Magni Arj  करण्यासाठी अटी आणि शर्टी काय असतात? रस्ता मिळवण्यासाठी कसा पाठपुरावा करावा? या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तरपणे येथे जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा.

 शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा?(how to apply to get road for agricultural land)

मित्रांनो, शेत रस्त्याची मागणी आपण तालुक्याच्या तहसीलदाराकडे करू शकतो. ही मागणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये करू शकतो. मित्रांनो, शेत रस्त्यासाठी तहसीलदार अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो त्याचा  नमुना तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकतात.

Click here to download PDF

 हा अर्ज तुम्ही व्यवस्थित अचूकपणे भरावा. हा अर्ज तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता. किंवा स्वतः देखील लिहू शकतात.  एकदा का तुम्ही हा अर्ज भरला नंतर प्रक्रिया काय राहील ते आता आपण पाहूया.

अधिनियम 1966 कलम 143 या कलमानुसार तहसीलदाराकडे शेत रस्ता मागणीसाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची गरज भासते. ती कागदपत्रे कोणकोणती ते आता आपण पाहूया.

हे देखील वाचा: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती

शेत रस्ता मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे कोणकोणती आहेत? Document required for Shet Rasta Magni Arj

  • शेत रस्त्याचा कच्चा नकाशा.
  •  शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा
  •  अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा उतारा( तीन महिन्याच्या आतील हवा)
  •  शेत रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यांची नावे आणि त्यांचा पत्ता. सोबत त्यांच्या जमिनीचा तपशील अनिवार्य
  •  अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती.

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा?

शेत रस्त्याची कायदेशीर मागणी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया ही राहील:

  • तहसीलदार मार्फतअर्ज दाखल करून घेतला जातो.
  • अर्जदार आणि क्षेत्र रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते.
  • शेत रस्त्याच्या नकाशावरून किमान किती फुटाचा रस्ता देणे आवश्यक आहे याची देखील पडताळणी केली जाते.
  • तहसीलदाराकडून शेत रस्ता पाहणी दौरा देखील केला जातो.

 मित्रांनो, Shet Rasta Magni चा निर्णय करत असताना  तहसीलदारांना खालील काही प्रश्नांची उत्तर देणेदेखील अपेक्षित असते. म्हणजेच त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा विचार रस्ता देण्यापूर्वी करावा लागतो त्या अशा.

  • शेत रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे का?
  • शेतात येण्यासाठी दुसऱ्या पर्यायी रस्ता उपलब्ध आहेत की नाही?
  • मागणी केलेल्या रस्ता सरळ बांधावरूनच आहे का?
  • अर्जदाराच्या शेताचे यापूर्वीचे मालक कोणत्या रस्त्याचे वापर करीत होते?
  • जर नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग कोणता?
  • अर्जदाराला नवीन शेत रस्ता दिल्यास लगतच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण किती असेल?

हे देखील वाचा: Maharashtra Satbara Utara Online: महाराष्ट्र 7 12 उतारा कसा बघायचा?

Shet Rasta Magni Arj in Marathi

 तहसीलदार या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवत असतात. आणि त्यानुसार तेथे शेतकऱ्याला नवीन शेत रस्ता करून द्यायचा की नाही याचा विचार करतात. वर दिलेल्या सर्व बाबींची शहानिशा केली जाते. त्याची खात्री पटल्यानंतर तहसीलदार अर्ज मान्य करतात किंवा त्या अर्जाची मागणी फेटळतात. जर अर्ज मान्य झाला तर  रस्ता लगतच्या शेतीच्या हद्दी किंवा बांधावरून देण्याचा आदेश दिला जातो.  रस्ता देताना तो आठ ते बारा फूट रुंदीचा देता येतो. यावेळेस शेजारच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने विचार केला जातो.

वाजवी रुंदी पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याची मागणी जर अर्जदार शेतकरी करत असेल तर त्याला शेजारच्या शेतकऱ्याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षित असते. म्हणजे नियमानुसार आठ ते बारा फूट रुंदीचा रस्ता मिळत असतो पण त्यापेक्षा जास्त रुंदीचा रस्ता हवा असेल तर त्याचे हक्क सदर शेतकऱ्यांकडून आपल्याला विकत घ्यावे लागतात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही शेत रस्ता मागणी अर्ज करू शकतात. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!