PM Surya Ghar Scheme | असा घ्या सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ | अशाप्रकारे सबसिडी  मिळण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

PM Surya Ghar Scheme: मित्रांनो, भारत सरकार आपल्यासाठी विविध योजना राबवत असतात त्यापैकीच एका योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे PM Surya Ghar Scheme. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत  रुफटॉप सोलर सिस्टिम(also called sunroof solar system) लोकांना सबसिडी दिली जात आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत कमीत कमी 30 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM Surya Ghar Scheme

 सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेसाठी ची पात्रता काय?  सूर्य घर मोफत वीज योजनेचे लाभ काय?  यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे? आणि ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ कसा मिळवायचा? अशा विविध गोष्टींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

हे देखील वाचा: अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

PM Surya Ghar योजनेचे लाभ कोणते?

  • मित्रांनो, ही योजना फक्त घरामध्ये विजेट साठी नव्हे तर  सूर्याच्या ऊर्जेपासून फायदा घेण्याची देखील आहे. ही योजना भारतातील प्रत्येक घरातील आर्थिक  भार कमी करणार आहे. आणि पर्यावरणामध्ये स्थिरता देखील आणण्यास मदत होईल. एक करोड लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
  •  या योजनेअंतर्गत सूर्यघर बनवल्याने 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे.
  •  सोलार पॅनल खरेदी करण्यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे.
  •  सरकारकडून बँकांमधून सोलार पॅनल खरेदी करण्यासाठी लोन देखील उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य मिळणार आहे.

 प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी पात्रता काय असणार आहे?

  •  अर्ज करणारा व्यक्ती भारत देशाचा मूळ रहिवासी असावा.
  •  या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्या  व्यक्तीचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे.
  •  या योजनेत मध्यमवर्ग आणि गरीब वर्गाला  प्राधान्य दिले जाईल.
  •  अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य राहील.

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा mahabhumi

PM Surya Ghar Scheme Document Required

  •  आधार कार्ड
  •  रहिवासी दाखला
  • विज बिल
  •  बँक पासबुक
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  राशन कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  शपथ पत्र
  •  उत्पन्नाचा दाखला

How to Apply online for PM Surya Ghar Scheme(पीएम  सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करायचा?)

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • https://pmsuryaghar.gov.in/
PM Surya Ghar Scheme
  • आता तुमच्यासमोर हे मुखपृष्ठ  ओपन होईल.  होम पेजवर Apply for rooftop solar या पर्यायावर क्लिक करा.
  •  पुढे सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे राज्य, ई-मेल, विज बिल कंपनी, मोबाइल नंबर आणि कंजूमर नंबर(consumer number) ही माहिती भरावी लागेल.
How to Apply for PM Surya Ghar Scheme
  • पुढे गेल्यावर तुम्हाला लॉगिन करावं लागेल. लॉगिन करण्यासाठी तुमचा युजरनेम आणि मोबाईल नंबर येथे टाकावा लागेल. आणि रुफटॉप सोलार साठीअर्ज करा.
  • पुढे, जेव्हा तुम्हाला feasibility approval  मंजुरी मिळेल, तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून  प्लांट तयार करा.
  •  इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर,  प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटर साठी अर्ज करा.
  •  पुढच्या टप्प्यामध्ये नीट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM  द्वारे पडताळणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
  •  शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टल द्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमच्या बँक खात्यात तीस दिवसाच्या आत सबसिडी मिळून जाईल.

 पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत रुफटॉप सोलार मिळवण्यासाठी कुठे अर्ज कराल?

 मित्रांनो, तुम्हालाही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम सूर्य घर योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर  जावं लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून करू शकता.

PM Surya Ghar Scheme Official website

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!