Drip Irrigation 80% Subsidy: मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी माझ्या शेतकरी मित्रांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून भरघोस अनुदान मिळणार आहे आणि यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या दोन योजनेतून 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता 90 टक्के अनुदान मिळणार आहे.
आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे.
ठिबक सिंचन योजना 2023(Drip Irrigation 80% Subsidy) अंतर्गत किती अनुदान मिळणार?
शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान म्हणजेच प्रति हेक्टर एक लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेअंतर्गत पार्श्व अंतरानुसार अनुदान दिले जाईल. एक हेक्टर ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान, 12001 रुपये आणि ठिबक सिंचनासाठी 19355 रुपये अनुदान दिले जात आहे.
हे देखील वाचा: बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्रता व अटी, अर्ज पद्धती, कागदपत्रे संपूर्ण माहिती
दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेद्वारे 75 टक्के अनुदान दिले जाईल. सेच दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाईल.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि कोणता शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
हे देखील वाचा: बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी लागणारी पात्रता आणि अटी काय?
ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता कोणती?
ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे शेतजमिनीची कागदपत्रे (7/12 उतारा व 8 अ प्रमाणपत्र) असणे गरजेचे आहे.
- अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे आणि त्या विज बिलाची पावती कागदपत्रांमध्ये जोडणे गरजेचे आहे.
- फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन तीस दिवसाच्या आत त्याच्या पावत्या कागदपत्र मध्ये जोडणे गरजेचे आहे.
तर माझ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा.
हे देखील वाचा: LIC Jeevan Labh Policy Calculator
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा आणि कुठे करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील प्रमाणे करा.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी च्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट करावं लागेल त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://mahadbtmahait.gov.in किंवा तुम्ही “MahaDBT Shetkari Portal” असं गुगलमध्ये शोधून पहिल्या लिंक वर क्लिक करू शकता.
- हे पोर्टल उघडल्यानंतर एक शेतकरी एक अर्थावर क्लिक करा. पुढे तुम्हाला लॉगिन करायचं आहे.
- जर तुम्ही आधी पण व्हिजिट केलेलं असेल आणि त्यावेळेस रजिस्टर केलेलं असेल तर आता लॉगिन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
- नवीन असाल तर रजिस्टर करा.
- मुख्य पृष्ठावर क्लिक केल्यानंतर आपल्या बटन वर क्लिक करा.
- पुढे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अधिक पीक घटक प्रति ड्रॉप समोरील आयटम निवडीवर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला सिंचन स्त्रोत आणि ऊर्जा स्त्रोत पर्याय दिसतील त्यापैकी यासाठी अर्ज करायचा आहे
- तो पर्याय निवडा म्हणजे सिंचन स्त्रोत निवडा.
- यानंतर खाली add word वर क्लिक करा म्हणजे तुमचा अर्ज जतन केला जाईल.
- पुढे तुम्ही होम पेजवर म्हणजे मुख्य पृष्ठ वर परत जा येथे तुम्हाला पुन्हा Appy(अप्लाय) पर्यायावर क्लिक करावे लागेल. Irrigation ‘select items on tools and facilities’ वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर मुख्य अर्ज उघडेल. येथे विचारलेले संपूर्ण माहिती भरा.
- अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला पेमेंट पर्याय यावर करावे लागेल यासाठी तुम्हाला 23 रुपये 60 पैसे रुपये द्यावे लागतील.