Swadhar Yojana Maharashtra | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप | Swadhar Yojana Maharashtra

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण Swadhar Yojana Maharashtra बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राबविल्या जात असणाऱ्या या योजनेअंतर्गत आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील मुला मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. स्वाधार योजना ही गरीब कुटुंबातील मुला-मुलींना स्वावलंबी बनण्यामध्ये खूप महत्त्वाची योजना ठरत आहे.

Swadhar Yojana Maharashtra

Swadhar Yojana  अंतर्गत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्वरूपात अनुदान प्रदान केले जाते. Maharashtra Swadhar Yojana  मार्फत दहावी, बारावी वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. या आर्थिक मदतीतून हे गरीब कुटुंबातील मुले शिक्षण पूर्ण करू शकतात. तसेच जे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत म्हणजेच  B.A, B.S.C, B.com, B.Sc, CA, CS, CMA आणि डिप्लोमा कोर्स करत आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा स्कॉलरशिप(Swadhar Yojana Scholarship) स्वरूपात लाभ मिळेल.

Join Whatsapp Channel

हे देखील वाचा: आधार कार्ड अपडेट कसे करायचे? Mobile number, Address अशा पद्धतीने करा अपडेट

Swadhar Yojana Maharashtra Scholarship

स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना रुपये 51 हजार एवढी रक्कम स्कॉलरशिप स्वरूपात प्रदान केली जाईल. वर दिल्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांचे शिक्षण असेल तर त्यांना या Scholarship चा लाभ नक्की मिळेल. ही स्कॉलरशिप शैक्षणिक वर्षानुसार अर्जदार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात असते.

 मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया कोणकोणते विद्यार्थी या योजनेत पात्र ठरतील, Swadhar Yojana या योजनेचा लाभ त्यांना कसा घेता येईल, या योजनेअंतर्गत कोणकोणती कागदपत्रे लागणार? स्कॉलरशिपची रक्कम कशी मिळणार? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पद्धती काय असणार? स्वाधार योजनेचे फायदे आणि लाभ काय असणार? चला तर आपण ही सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

हे देखील वाचा: काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासन निर्णय?

 स्वाधार योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष काय?(Swadhar Scholarship Yojana Qualification Rules)

  •  सर्वप्रथम स्वाधार  योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहवासी असावा.
  •  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  •  अर्जदार विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, प्रोफेशनल कोर्स यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. तसेच तो चालू वर्षात शिक्षण घेत असावा.
  •  विद्यार्थ्यांचे प्रवेश हा regular student या स्वरूपात असावा, म्हणजेच मुक्त विद्यापीठातून प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  •  विद्यार्थ्याने मागील व शैक्षणिक वर्षात कमीत कमी 60 टक्के एवढे गुण मिळवलेले असावेत, जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर 20 टक्के गुळांची सूट देण्यात येते, त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात किमान 40% एवढे मार्क मिळालेले असावेत.
  •  अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक 2.5 लाखापेक्षा कमी असावे.

स्वाधार योजनेचे फायदे कोणते? (Benefits of Swadhar yojana)

  • स्वाधार योजनेअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 51 हजार रुपये स्कॉलरशिप स्वरूपात अनुदान दिले जाईल.
  •  या अनुदान रकमेतून विद्यार्थी होस्टेलचा खर्च, जेवणाचा खर्च, शिक्षणाची फी  अशा गरजा पूर्ण करू शकेल.
  •  यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांना देखील मोठा फायदा होईल, कारण पालकांचा मुलाच्या शिक्षणासाठीचा खर्चाचा   भार कमी होईल.
  • Swadhar Yojana Maharashtra अंतर्गत मिळणाऱ्या स्कॉलरशिप मधून गरीब कुटुंबातील मुले देखील आता त्यांचे शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी बघू  शकतील.

चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

स्वाधार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती? (Swadhar Yojana Maharashtra Reuired Document)

मित्रांनो  स्वतः योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. येथे क्लिक करून तुम्ही जाणून घेऊ शकता कोणकोणती कागदपत्रे आहेत जी तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे.

हे देखील वाचा: स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही आहेत

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा? (swadhar yojana online apply)

  • मित्रांनो, जर या Swadhar Yojana Maharashtra Scholarship  अंतर्गत असलेल्या लाभार्थी निवडीचे निकष व परिपूर्ण होत असतील, तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ऑनलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ जर तुम्ही घेऊ इच्छित असाल, तर ते  सध्या तरी शक्य नाही.
  • कारण व धार योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा सुविधा अजून तरी उपलब्ध झालेली नाही.
  • पण भविष्यात जेव्हा ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची पद्धती उपलब्ध होईल तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईट द्वारे नक्की  कळवू.

 स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा?

 स्वाधार योजनेसाठी अर्जदार उमेदवाराला ऑफलाईन स्वरूपात स्वतः कार्यालयात जाऊन या योजनेचा फॉर्म सादर करावा लागतो.  या योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज दिलेला आहे तो तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.

Click here to download Form

हा अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा. माहिती जेवढी अचूक असेल तेवढ्या लवकर आपल्याला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळेल.

  • अर्जामध्ये तुमचे नाव, पत्ता, वैयक्तिक इन्फॉर्मेशन विचारली जाईल ती भरा.
  • ही सर्व माहिती भरणे अनिवार्य राहील. फॉर्म भरून झाल्यानंतर त्यासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे(वर दिल्याप्रमाणे) जोडा.
  • आता हा अर्ज कागदपत्रांसोबत तुम्हाला  तुमच्या जिल्ह्याचे ठिकाणी समाज कल्याण कार्यालयात जाऊन हा अर्ज जमा करावा लागेल.
  • समाज कल्याण कार्यालयात स्वाधार योजनेचा अर्ज दिल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्याद्वारे तुमच्या स्वाधार योजनेच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • त्यानंतर कागदपत्र देखील तपासले जातील. मग शेवटी तुम्ही जर स्वाधार योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
  • आणि तुमची स्कॉलरशिप ची प्रोसेस सुरू होईल.

swadhar yojana official website कोणती आहे?

मित्रांनो  स्वाधार योजनेची  वेगळी कोणतीही ऑफिशियल वेबसाईट नाही. स्वाधार योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही समाज कल्याणच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकतात. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात.

https://syn.mahasamajkalyan.in/

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!