swadhar yojana scholarship | स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?|  ही आहेत नवीन अर्ज आणि जुने अर्ज रिन्यू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

swadhar yojana scholarship: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारने 2016 17 मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय  महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल. यामुळे आता गरीब परिवारातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होणार आहे. ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना खूप लाभदायक ठरणार आहे.

swadhar yojana scholarship या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे. स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही ही कागदपत्रे तपासून तुमच्याकडे असल्याची खात्री करून घ्या. त्यानंतर अर्ज भरा.

swadhar yojana scholarship required document

हे देखील वाचा: swadhar yojana: काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना? अधिक माहिती जाणून घ्या

 नवीन अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि माहिती(swadhar yojana required document)

  • अर्जदार विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
  •  वडिलांचे संपूर्ण नाव
  •  अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
  • आधार कार्ड
  •  जन्मतारीख, वय, लिंग
  •  आईचे संपूर्ण नाव
  •  रहिवासी पत्ता
  •  अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
  •  तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी यांच्याकडचा रहिवासी दाखला
  •  सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र
  •  सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •  वडिलांचे वार्षिक उत्पन्न
  •  शिक्षण घेत असलेला जिल्हा
  •  अभ्यासक्रम, शिक्षण घेत असलेला वर्ग
  •  प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव, शाखा
  •  महाविद्यालयातील नोंदणी क्रमांक किंवा ओळखपत्र
  •  इयत्ता दहावी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य राहील.
  •  शैक्षणिक गॅप आहे का: असल्यास त्या प्रमाणपत्र अनिवार्य
  •  प्रवेश वर्ष/ दिनांक
  •  उत्तीर्ण महिना/ वर्ष
  •  मिळालेले गुण आणि एकूण गुण

हे देखील वाचा: स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा? (swadhar yojana online apply)

swadhar yojana scholarship साठी बँकेची माहिती

  • विद्यार्थ्यांचे पासबुक वरील नाव
  •  राष्ट्रीयकृत बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC Code

मित्रांनो आता तुम्हाला जी कागदपत्रे अपलोड करायची आहे ती कागदपत्रे आपण जाणून घेऊया. अर्ज भरण्याआधी तुमच्याजवळ ही कागदपत्रे आहे की नाही याची खात्री करून घ्या म्हणजे अर्ज भरताना कोणती अडचण येणार नाही.

  • अर्जदाराचा फोटो
  •  अर्जदाराची सही
  •  जातीचा दाखला
  •  आधार कार्ड प्रत
  •  बँक खाते पासबुकची प्रत( पहिल्या पानाची प्रत/ बँक स्टेटमेंट ची प्रत/ रद्द केलेला चेक)
  •  तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
  •  विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
  •  महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  •  बँक खाते आधार कार्ड क्रमांकाची जोडलेले असल्याचा पुरावा
  •  स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  •  शेवटच्या शिकलेल्या वर्गातला TC
  •  मेस किंवा खानावळ यांची बिलाची पावती
  •  उपविभागीय अधिकारी/ उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
  •  सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
  •  शपथपत्र/ हमीपत्र
  •  भाडे करारनामा

हे देखील वाचा: ज्या बालकांचे वय या तारखेला सहा वर्षे पूर्ण होणार त्यांनाच पहिलीत प्रवेश!

 मित्रांनो, आता आपण पाहूया आधीच भरलेला अर्ज जर रिन्यू करायचा असेल तर त्या अर्जासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असते. सोबतच कोण कोणती माहिती असणे आवश्यक आहे.

  • रिनीवल अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
  •  चालू वर्षाचे  बोनाफाईड
  •  मागील वर्षाचे गुणपत्रक
  •  जातीचा दाखला
  •  चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •  बँकेचे पासबुक
  •  भाडे करार नामा
  •  रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
  •  मेस/ खानावळ बिलाची पावती
  • रिनीवल  अर्ज सादर करीत असताना हमीपत्र उपलब्ध करण्याची गरज नाही.

 मित्रांनो, तुम्ही जर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थी असाल किंवा तुमच्या आजूबाजूला असे विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षण घ्यायचे आहे पण ते राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!