PM Kisan Scheme Rejected Farmer|ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्रातील या 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार नाही|आयुक्तांची माहिती डिटेलमध्ये

Pm Kisan Scheme Rejected Farmer: मित्रांनो  जर  तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही पी एम किसान योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर आज चा लेख तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी नवीन बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. याबाबतचे सर्वात मोठे अपडेट समोर आलेले आहे. पीएम किसन योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याचे अपडेट आहेत परंतु अधिकृत अपडेट सध्या आलेले नाही.

Join Whatsapp Channel

काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना?

Pm Kisan Scheme Rejected Farmer

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजना(Pm Kisan Scheme) शेतकऱ्यांसाठी 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन-तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून दिली जात असतात. त्याचप्रमाणे या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची ओळख पटवून देण्याचं काम राज्य सरकारकडे सोपविण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारकडून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे. कारण त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.

हे देखील वाचा: फक्त 210 रुपयात दर महा 5000 रुपयांचा फायदा| केंद्र सरकारची नवीन योजना|पहा कसा आणि कोणाला मिळेल लाभ

Pm Kisan Scheme Rejected Farmer:

 या ठिकाणी नवीन अपडेट आलेला आहे. या अपडेटच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक केले गेलेले नसल्याचे समोर आले आहे. उपायुक्त कृषी गणना आणि पीएम किसान योजनेचे पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी हे अपडेट दिले आहे. तर राज्यात पीएम किसान योजनेचे एकूण 96 लाख 98 हजार इतके लाभार्थी आहेत त्यापैकी 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक केले गेलेले नाही.

Pm Kisan Scheme Rejected Farmer

या योजनेअंतर्गत चौदावा हप्ता हवा असल्यास दोन गोष्टी बंधनकारक आहे त्या म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. आणि तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यास त्वरित ते लिंक करून घ्यावे. जर तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे माहिती नसल्यास खालील लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा: येथे क्लिक करा: आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे कसे तपासावे

Pm Kisan Scheme Rejected Farmer

या दोन गोष्टी कराच! 

  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने गावातल्याच पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
  • त्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाने गरजेचे आहे.
  • त्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडेल.
  • केवायसी(KYC)  च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने  तुमची ओळख पडताळून पाहिली जाईल.

e-KYC

  • e-KYC म्हणजेच Electronic Know your Client.
  • माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
  • याद्वारे एखाद्या योजनेचा लाभार्थी हयात आहे की नाही हे पडताळून पाहिलं जातं.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील 18 लाख 27 हजार लाभार्थ्यांनी अद्यापही केवायसी  केलेली नाही.
  • ते जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर
  • तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरती देखील केवायसी करू शकता.
  • मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही नक्की करा की तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटशी जोडलेले आहे
  • आणि सोबतच केवायसी देखील केलेली आहे.
  • तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील याची माहिती करून द्या. आजचा लेख जर महत्त्वपूर्ण ठरला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा, धन्यवाद

हे देखील वाचा: प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार | अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये

pm kisan scheme, pm kisan yojana marathi, pm kisan mandhan yojana in marathi, pm kisan scheme rejected farmer, पीएम किसान योजना, पीएम सन्मान निधी योजना, पी एम किसान निधी योजना 2022, पी एम किसान सन्मान निधी योजना

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!