गाय म्हैस वाटप योजना GR | असा करा जीआर डाऊनलोड

गाय म्हैस वाटप योजना GR: या योजनेअंतर्गत लाभार्थी कोणत्या निकषांवर निवडला जाईल ते आपण बघूयात.  या योजनेअंतर्गत ओबीसी, ओपन, या प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान मिळेल. यातील लाभार्थ्यांना उर्वरित 25 टक्के रक्कम स्वतः द्यावे लागतील.  आता आपण बघूया लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर निवडले जाईल.

गाय म्हैस वाटप योजना GR
Join Whatsapp Channel

 गाय म्हैस वाटप योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष:

  •  महिला बचत गटातील लाभार्थी( शासन निर्णय मधील  अ क्र. 2  व 3 मधील)
  •  अल्पभूधारक शेतकरी( एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  •  सुरक्षित बेरोजगार( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)

 अशा प्रकारे निवड केली जाणार आहे याची अंमलबजावणी या योजनेच्या अटी व शर्ती आणि महत्त्वाचा शासन निर्णय हा सुद्धा  तुम्ही येथून डाऊनलोड करू शकतात.

येथे क्लिक करून जीआर डाऊनलोड करा

आता आपण जाणून घेऊया या गायब वाटप योजनेसाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा 2 दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत मिळणार 75 टक्के अनुदान

 गाय म्हैस वाटप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
  •  सातबारा उतारा
  •  8अ उतारा
  •  आधार कार्ड
  •  स्वयंघोषणापत्र
  •  रहिवासी दाखला
  •  अनुसूचित जाती जमातीत असल्यास जातीचा दाखला
  •   दिव्यांग असल्यास दाखला
  •  बँक खाते पासबुक सत्यप्रत
  •  जन्मतारखेचा पुरावा
  •  शैक्षणिक पात्रतेचा दाखला
  •  सातबारा उतारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र 
  • दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  •  रेशन कार्ड/ कुटुंब प्रमाणपत्र( एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल)
  •  बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुक चा पहिला पानाचा साक्षांकित प्रत
  •  वय आणि जन्मतारखेचा पुरावा
  •  रोजगार सोय रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी करण्याची सत्यप्रत
  •  प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत 

हे देखील वाचा: गाय/म्हैस गोठ्यासाठी 100% अनुदान सुरू|ग्राम समृद्धी योजना|असा करा अर्ज

AH MAHABMS Update:

मित्रांनो,  गाय वाटप योजना बद्दल काही नवीन अपडेट आलेले आहेत.   कोण कोणते अपडेट आहे ते आपण पाहूया.  सर्व लाभार्थ्यांना सांगण्यात येत आहे की लाभार्थ्याला सुलभतेसाठी पासवर्ड चे धोरण बदलण्यात येत आहे. आधी प्रमाणेच लाभार्थ्याचा युजरनेम हा त्याचा आधार कार्ड क्रमांक राहणार आहे. लाभार्थ्यांचा पासवर्ड हा योजनेसाठी अर्ज भरताना ज्या बँक खाते क्रमांकाचा तुम्ही उल्लेख केला आहे त्याचे शेवटचे 6 आकडे राहील. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.

 प्रणालीमार्फत  ज्या लाभार्थ्यांना SMS  आलेले आहेत  त्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा: ग्राम पंचायत अर्ज स्वीकारत नाही? मग अशी करा गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार

गाय वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कार्यपद्धती असणार आहे?

 सर्वात आधी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घ्यावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर दुधाळ गाय किंवा म्हैस वाटप योजनेसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या अर्जा मधून प्राथमिक निवड केली जाईल. निवड झालेल्या  अर्जदारांना त्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगण्यात येईल. अर्जदाराला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना योजनेच्या वेळ पत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने Text SMS  प्राप्त होत जातील. निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर शेवटची यादी तयार करण्यात येईल.  या योजनेअंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थ्याने देणे बंधनकारक असणार आहे.

राज्यामध्ये दूध उत्पादनास चालना देण्यासाठी संकरित गायी किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करणे या नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती  उपयोजना आणि आदिवासी उपयोजना अंतर्गत या योजनेस 30 ऑक्टोबर २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी गाई किंवा म्हैस गट वाटप योजनेला 19 जानेवारी 2019 रोजी मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार राज्यात दुग्धोत्पादन चालना देण्यासाठी या योजनेअंतर्गत दुधाळ  गाईंमध्ये गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, व डांगी या गाईंचा समावेश करण्यात आलेला आहे.

Gai mhashi vatap yojana 2023, Dudhal gai mhashi vatap yojana, Mahabms list, Mahabms online application

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा महाराष्ट्रातील या 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार नाही

1 thought on “गाय म्हैस वाटप योजना GR | असा करा जीआर डाऊनलोड”

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!