जमिनीचा नकाशा कसा पाहायचा | अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर जमिनीचा नकाशा असा पाहू शकता 

मित्रांनो, आपल्याला शेत जमिनीचा नकाशा बऱ्याच गोष्टींसाठी लागतच असतो. पूर्वी हा नकाशा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चप्पल पार घसेपर्यंत फेऱ्या मारावा लागायच्या. पण आता असे राहिले नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही बरेच कागदपत्रे तुमच्या मोबाईल वरून मिळू शकतात. तर आता आपण पाहूया शेत जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?  आपल्या शेतात जाण्यासाठी जर आपल्याला एखादा नवीन रस्ता काढायचा असेल किंवा बनवायचं असेल. तसेच आपल्या जमिनीच्या हद्दी जाणून घेऊन कंपाउंड करायचं असेल तर आपल्याकडे पुरावा म्हणून शेतजमिनीचा नकाशा लागतो. या नकाशामध्ये सर्व माहिती दिलेली असते.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

 आता महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ अ उताऱ्यासोबत शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत.  यामुळे तुमची वेळेची त्यासोबतच पैशाची देखील बचत होत आहे. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया शेठ जमिनीचा किंवा जागेचा नकाशा कसा पाहायचा?

हे देखील वाचा: ऑनलाईन सातबारा(7/12) उतारा कसा बघायचा?

 जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी  महाभुमीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in
  • येथे तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल जसे की तुम्ही ग्रामीण भागातील आहात की शहरी? तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे, आणि गावाचे नाव टाका.
  •  आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या माहितीनुसार तुमच्या गावाचा नकाशा दिसेल.
  •  डाव्या बाजूला तुम्ही प्लॉट प्रमाणे जमीन  शोधण्यासाठी तिथे तुमचा गट क्रमांक/  खसरा क्रमांक टाकून सर्च करू शकता.
  •  आता तुम्ही टाकलेल्या  गट क्रमांक चार नकाशा तुमच्यासमोर  उघडेल.
  • जर तुम्हाला हा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही रिपोर्ट पीडीएफ वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला डाउनलोड आणि प्रिंट असे दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्ही जो हवा असेल तो सिलेक्ट करा.

हे देखील वाचा: ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी असा करू शकता अर्ज

 मित्रांनो, शासनाने  ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा उपलब्ध करून दिल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांची वेळेची बचत तर होतेच शिवाय पैशांची बचत देखील होत आहे. ही माहिती जमिनीचा नकाशा कसा पाहायचा यासंबंधीत होती. ती तुम्हाला नक्की मदत पूर्ण ठरेल. अशा स्टेप फॉलो करून तुम्ही जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल वरून पाहू शकतात 

Join Whatsapp Channel

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!