Vibrant Gujarat Global Summit 2024 | व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 20 वर्षांचा प्रवास | गुजरात मध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा- टाटा, मारुती आणि रिलायन्स समूहाकडून

Vibrant Gujarat Summit: मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे गुजरात मध्ये गांधीनगर येथे दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पासून व्हायब्रंट गुजरात ग्लोबल  समिट ची सुरुवात झालेली आहे.  10 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्हाइब्रन्ट गुजरात परिषदेचे उद्घाटन केले.  त्यांनी या कार्यक्रमात सर्वांना संबोधित केले. येत्या 25 वर्षात भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की 25 वर्षाचा काळ हा भारताचा अमृत काळ आहे. भारत पुढील पंचवीस वर्षाच्या लक्षात काम करत आहे.

Vibrant Gujarat Summit 2024

Vibrant Gujarat Summit 2024

 UAE चे अध्यक्ष मोहम्मद बिन  झायेद प्यांच्यासह इतर अनेक जागतिक नेते आणि उद्योग जगतच्या नेत्यांसह प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे.  सोबतच आपल्या भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी, पंकज पटेल, गौतम अदानी आणि लक्ष्मी मित्तल यांच्यासह देश-विदेशातील आघाडीचे उद्योगपती या परिषदेमध्ये उपस्थित झालेत. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी UAE चे अध्यक्ष मोहम्मद बिन  झायेद हा माझा भाऊ असल्याचे संबोधले. आणि ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे बोलले. भारत आणि UAE आपल्या संबंधाला जी नवीन उंची दिली आहे त्याचे सर्व श्रेय UAE चे अध्यक्ष मोहम्मद बिन  झायेद यांना जाते.

हे देखील वाचा: पंतप्रधान मोदींचे आवाहन “Viksit Bharat @2047 तरुणाईचा आवाज” या उपक्रमात घ्या सहभाग

टाटा समूहाकडून गुजरातमध्ये  कारखाना उभारला जाणार:

 सध्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष  एन चंद्रशेखरन टाटा कंपनी गुजरात मधील  धोलेरा येथे सेमीकंडक्टर कारखाना उभारणार आहे. Vibrant Gujarat Global Summit 2024 मध्ये, चंद्रशेखरन यांनी सांगितले की टाटा समूहाकडून दोन महिन्यात सानंद येथे लिथियम आयन बॅटरी बनविण्यासाठी 20 GW  क्षमतेची गिगा फॅक्टरी सुरू करणार आहे.  गुजरात मध्ये टाटा समूहाच्या टोटल 12 कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे 50000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि आता तर सानंद हे इलेक्ट्रिक वाहन विभागाचे केंद्र बनत आहे.

Join Whatsapp Channel

 गुजरात मध्ये होणार मारुती सुझुकीची 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक:

भारत देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला देखील ओळखले जाते. मारुती सुझुकी  समूहाने देखील या व्हायब्रम गुजरात समिटमध्ये गुंतवणुकीबाबत मोठ्या घोषणा केलेले आहेत. सुझुकी मोटर चे अध्यक्ष तोशीहिरो सुझुकी म्हणाले की गुजरातमध्ये त्यांचा दुसरा प्लांट तयार करण्यासाठी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ते करणार आहेत. हा कार प्लांट दरवर्षी दहा लाख कारचे उत्पादन करेल.

हे देखील वाचा: Majhi kanya bhagyashree yojana कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, उद्दिष्टे, फायदे संपूर्ण माहिती 

 सोबतच ते म्हणाले की, या कार प्लांट मधून उत्पादन सुरू झाल्यानंतर गुजरातमध्ये वार्षिक उत्पादन क्षमता 20 लाख युनिट असेल.

 रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची मोठी घोषणा:

Vibrant Gujarat Summit  रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की रिलायन्स हजिरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे. बोलताना ते पुढे म्हटले की, रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि राहील. 2030 पर्यंत गुजरातच्या ऊर्जेच्या निम्म्या गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. जामनगर मध्ये 5000 एकर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी जिजा कॉम्प्लेक्स चे बांधकाम सुरू केले आहे. पुढे ते म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून जगातील कोणतेही शक्ती रोखू शकत नाही. आणि त्यात एकट्या गुजरातचे अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरची होईल 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!