लेक लाडकी योजना: मित्रांनो आज आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती म्हणजे लेक लाडकी योजना. महाराष्ट्र सरकार द्वारा आपल्या राज्यातील मुलींना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याद्वारा विधानसभा मध्ये बजेट 2023-24 सादर करण्यात आला ज्यामध्ये नवीन योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली गेली. या योजनेचे नाव आहे लेक लाडकी योजना 2023. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून आर्थिक स्वरूपात बिकट परिस्थिती असलेला परिवारात जन्म घेतलेल्या मुलींना आर्थिक सहायता देण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार द्वारा मुलीच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंत त्यांना आर्थिक मदत दिल्या जाईल. ही आर्थिक सहायता मुलीच्या अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत दिली जाईल आणि ही मदत मुलीच्या वाढत्या वयानुसार टप्प्याटप्प्याने दिली जाईल. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिला सशक्तिकरण असे आहे. आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा होईल, काय पात्रता असणार आहे, लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कसा करायचा इत्यादी साठी खालील लेख पूर्ण वाचा.
लेक लाडकी योजना (Maharashtra Lek Ladki Yojana):
महाराष्ट्र सरकार द्वारा मुलीच्या सशक्तिकरण साठी विधानसभेमध्ये वर्ष 2023 24 च्या बजेटमध्ये भाषण करताना श्री देवेंद्र फडणवीसद्वारा लेक लाडकी योजना 2023 ची सुरू करण्याची घोषणा केली गेली. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल. शासन द्वारा जन्मापासून मुलीच्या शिक्षणापर्यंत पाच टप्प्यात आर्थिक मदत अनुदान दिल्या जाईल. या अनुदान राशीमुळे मुलीच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि त्यामुळेच आपल्या समाजातील मुली शिकून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
या योजनेच्या माध्यमातून मुलींची सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला अठरा वर्षाची झाल्यावर सरकार द्वारा 75 हजार रुपये अनुदान मिळेल. मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे.
हे देखील वाचा: लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?(2024 Updated)
लेक लाडकी योजना 2023 चे उद्दिष्ट:
महाराष्ट्र सरकार द्वारा सुरू केलेली लेक लाडकी योजना याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दृष्टीने कमजोर असलेल्या परिवारातील मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देणे होय. ज्यामुळे समाजात मुलींविषयी असलेला नकारात्मक विचारांमध्ये बदल होईल.आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ प्कशाप्रकारे मिळेल.
हे देखील वाचा: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेसाठी असा करा अर्ज
लेक लाडकी योजना अंतर्गत अनुदान कसे मिळेल?
या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेले परिवार ज्यांच्याकडे पिवळे आणि नारंगी रेशन कार्ड आहे त्या परिवारात मुलीचा जन्म झाला की पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. त्यानंतर मुलगी जेव्हा शाळेत जायला चालू करेल म्हणजे पहिल्या वर्गात तिला 4000 रुपये सरकारकडून दिले जातील. नंतर सहाव्या वर्गात प्रवेश केल्यावर मुलीला 6000 रुपये सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल. पुढे अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यावर मुलीला 8000 रुपये या योजनेअंतर्गत मिळतील आणि जेव्हा मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होईल तेव्हा सरकारकडून त्या मुलीला 75000 रुपये दिले जातील. या रकमेचा उपयोग मुलीच्या लग्नासाठी सुद्धा केल्या जाईल. या योजनेअंतर्गत मुलींना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवता येईल. आता आपण बघूया या लेक लाडकी योजनेचे लाभ कोणते.
हे देखील वाचा: माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अटी आणि शर्ती काय?
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे लाभ:
- लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब परिवारात जन्म घेतलेल्या मुलींना आर्थिक मदत दिली जाईल.
- या योजनेच्या माध्यमातून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत होईल.
- पिवळ्या आणि नारंगी राशन कार्ड धारक परिवारात मुलींना जन्म होताच 5000 रुपये दिले जातील.
- शाळेत गेल्यावर पहिल्या वर्गात असताना 4000 रुपये मदत मिळेल.
- सहाव्या वर्गात गेल्यावर सहा हजार रुपये मिळतील.
- अकराव्या वर्गात गेल्यावर मुलीला आठ हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळतील.
- या व्यतिरिक्त मुलगी जेव्हा अठरा वर्षाची पूर्ण होईल तेव्हा सरकारकडून तिला 75 हजार रुपये अनुदान मिळेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या आई- वडिलांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झालेला पाहिजे आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीचा जन्म झाल्यावर अर्ज करावा लागेल.
- या योजनेमुळे गरीब परिवारात जन्मलेल्या मुलींना ओझं नाही समजला जाणार.
हे देखील वाचा: Namo Kisan Yojana: नमो किसान योजना आता मिळणार सहा हजार रुपये |अर्ज करण्यासाठी लागणार आहे ही कागदपत्रे
लेक लाडकी योजना 2023 साठी पात्रता:
- लेक लाडकी योजना 2023 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच लागू होईल.
- पिवळे आणि नारंगी रेशन कार्ड धारक मुलींचे परिवार या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ मुलीच्या अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत दिला जाईल.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पिवळे आणि नारंगी राशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- बँक खात्याची प्रत
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
हे देखील वाचा: ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये
लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र साठी अर्ज कसा करावा:
आपण वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार द्वारा बजेट केल्यावर या लेक लाडकी योजनेची सुरू करण्याची घोषणा केली गेली, पण सरकार द्वारा अजून ही योजना लागू करण्यात आलेली नाही. जेव्हा ही योजना लागू केल्या जाईल तेव्हा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही माहिती दिल्या जाईल. आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. जसं सरकारकडून लेक लाडकी योजना अंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज संबंधी माहिती दिली जाईल तशी आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये माहिती पुरवू.
Maharashtra lek ladki yojana, Lek ladki yojana, Lek ladki yojna, kishori shakti yojana
मुलीचे लग्न करायचे आहे त्या साठी योजनेतून काही मदत मिळते का कारण काम प्रायव्हेट आहे.