राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2024

 प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण नवीन योजना घेऊन आलो आहोत ती म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना. प्लास्टिक मल्चिंग म्हणजे पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते.  याचा फायदा असा होतो की पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते.  दुसरे फायदा असा की पिकांमध्ये चेतन किंवा गवत वाढ होते त्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.

Join Whatsapp Channel

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती मिळणार, आवश्यक पात्रता काय, प्लास्टिक मल्चिंग पेपर चे लाभ कोणते, आवश्यक कागदपत्रे, अर्ज या सर्वांची माहिती घेऊया.

 राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मल्चिंग पेपर अनुदान किती मिळणार?

 या योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रुपये 32 हजार असून या खर्चाच्या 50% म्हणजे जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान मिळेल. जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्टर 26800 रुपये अनुदान  असणार आहे.  या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18400 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 2 हेक्टर क्षेत्र मर्यादित साठी अनुदान  मिळणार आहे.

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या प्लास्टिक मल्चिंग पेपरचे फायदे कोणते म्हणजेच जर आपण आपल्या शेतामध्ये पण प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर केला तर त्याचा कोणता फायदा आपल्याला होणार आहे.

हे देखील वाचा: ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की वाचा! महत्त्वाचा नवीन शासन निर्णय GR

 प्लास्टिक  मल्चिंग पेपर(plastic mulching paper) चे फायदे कोणते?

plastic mulch sheet
  • शेतातील मातीची धूप रोखल्या जाते.
  •  पण म्हणजेच गवत कमी होण्यास मदत होते.
  •  शेतात  पाण्याचा ओलावा कायम राहतो आणि बाष्पीभवन रोखल्या जाते.
  •  वनस्पतींची मुळे चांगले वाढतात.
  •  जमीन कठीण होण्यापासून वाचवते म्हणजेच पिकांच्या मुळ्या चांगल्या पसरतात.

 राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी कोण सहभाग घेऊ शकतो आणि त्याची काय पात्रता आहे हे आपण जाणून घेऊया.

हे देखील वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप

 राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतो?

  • शेतकरी
  •  बचत गट
  •  शेतकरी उत्पादक कंपनी
  •  शेतकरी समूह
  •  सहकारी संस्था

 मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

आवश्यक कागदपत्र:

  • आधार कार्ड
  • 7/12  उतारा
  • 8 अ प्रमाणपत्र

 या  योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी कृषी  सहाय्यक, तालुका  कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

हे देखील वाचा: अशाप्रकारे करा पीक कर्ज सवलत योजनेसाठी अर्ज, पिक कर्ज सवलत अनुदान योजना संपूर्ण माहिती

 आपल्या पिकानुसार मल्चिंग फिल्म पेपर(plastic mulching paper) कसा निवडायचा?

  •  ज्या पिकांना अकरा ते बारा महिने कालावधी लागतो म्हणजे उदाहरणार्थ पपई यासारख्या फळ पिकांना 50 मायक्रोन जाडीची युवी प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
  •  तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो म्हणजेच उदाहरणार्थ भाजीपाला किंवा स्ट्रॉबेरी साठी 25 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
  •  जास्त कालावधी घेणारी पिके म्हणजे बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणाऱ्या सर्व पिकांसाठी शंभर किंवा 200 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.

हे देखील वाचा: अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

Mulching paper, 25 micron mulching paper price, Mulching paper for 1 acre price, 30-micron mulching paper price, mulch film roll, agricultural mulch film, biodegradable agricultural mulch film, mulching sheet with holes, mulching with plastic, plastic mulch sheet

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!