नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने योजना काय आहे, त्याचा लाभ कोण कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे. सर्वात आधी आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात कशी झाली.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना काय आहे?
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात आपल्या देशा देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी केली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत आपल्या देशातील शेतकऱ्यांना शेतीचे सिंचन करण्यासाठी ज्या उपकरणांची गरज लागते त्यासाठी सबसिडी(subsidy of equipment for irrigation of their fields.) दिली जाणार आहे. ही सबसिडी शेतकऱ्यांना त्या सर्व योजनेसाठी दिली जाईल ज्या योजनेमुळे पाण्याची बचत कमी मेहनत आणि पैसे खर्चाची पण योग्य मार्गाने बचत होईल. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये सिंचन करण्यामध्ये सुविधा होईल. आज आपण या ब्लॉगमध्ये या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना? अधिक माहिती जाणून घ्या
वर्ष 2026 पर्यंत केला जाणार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा विस्तार:
15 डिसेंबर 2021 ला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंडळाने 5 वर्षापर्यंत आणि 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यावर एकूण 93068 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ज्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते.
या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह रेखावद यांनी पत्रकारांना दिली होती या योजनेच्या विस्तारामुळे जवळजवळ सुमारे 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि त्यापैकी 2.5 लाख अनुसूचित जाती आणि 2 लाख अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत. योजनेवर जे 93068 करोड रुपये खर्च होणार आहे त्याच्यात 37454 करोड रुपयांची सहायता केंद्र सरकार द्वारा दिली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त CCEA द्वारा राज्यांसाठी 37454 करोड रुपयांच्या केंद्रीय सहाय्याने आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2016 दरम्यान सिंचन विकासासाठी भारत सरकारने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 20434.56 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
हे देखील वाचा: Namo Kisan Yojana: नमो किसान योजना आता मिळणार सहा हजार रुपये |अर्ज करण्यासाठी लागणार आहे ही कागदपत्रे
प्रत्येक शेतीला पाणी योजनेसाठी आर्थिक मदत:
जसं की तुम्हाला माहिती आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना केंद्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची सुरुवात करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचन करण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यावर सबसिडी दिली जाणार आहे ज्यामुळे शेतीची करण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. हेच नाही तर ही योजना शेतकऱ्यांच्या आवक मध्ये पण वाढ होईल यासाठी योग्य ठरणार आहे. देशात होणाऱ्या पाणी कमतरतेच्या अडचणीला समोर ठेवून ही योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 च्या अंतर्गत प्रत्येक शेतीला पाणी योजनेची सुरुवात केली आहे.
सरकारकडून या योजनेतून सर्व शेतांना पाणी दिले जाणार आहे. यासाठी कमान क्षेत्र विकास आणि पाणी व्यवस्थापन मंत्रालयाकडून आर्थिक मदत दिली जाईल. या आर्थिक मदतीचा वापर करून शेतकऱ्यांना शेतात पाणी पोहोचावे यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मित्रांनो आता या योजनेतून शेतकऱ्यांना आधी जो पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तो आता करावा नाही लागणार.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय?
आता जाणून घेऊया प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे(PMKSY 2023) काही ठळक मुद्दे:
- योजनेचे नाव: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
- कोणी सुरू केली: श्री नरेंद्र मोदी(PM)
- कधी सुरू केली गेली: वर्ष 2015
- लाभार्थी: भारत देशातील शेतकरी
- ऑफिशियल वेबसाईट: https://pmksy.gov.in/
आता आपण जाणून घेऊया या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 साठी कोण पात्र ठरू शकतो.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 पात्रता:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेचे पात्र लाभार्थी देशातील सर्व प्रवार्गातील शेतकरी असतील.
- या योजनेचा लाभ त्या संस्था आणि लाभार्थ्यांना दिला जाईल ज्यांनी ती जमीन किमान सात वर्षासाठी भाडेपट्टा करारानुसार घेतली आहे ही पात्रता कंत्राटी( करार केलेल्या) शेतीतूनही मिळू शकते.
- या योजनेअंतर्गत, बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य, अंतर्भूत कंपन्या, आणि इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही लाभ दिला जाईल
हे देखील वाचा: PM Svanidhi Loan योजनेअंतर्गत एक वर्षासाठी तारण मुक्त कर्ज
काही अटी:
- जर एखाद्या शेतकऱ्याने 2016-17 पूर्वी एखाद्या सर्वे नंबर साठी लाभ घेतला असल्यास पुढील 10 वर्ष तर 2017-18 ला लाभ घेतला असल्यास पुढील 7 वर्ष त्या सर्वे नंबर वर योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि जर लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याकडे कायमस्वरूपी वीज कनेक्शन असाव. सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
- पाच हेक्टर च्या मर्यादेतील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी 55% तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळेल.
आता आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 साठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 साठी लागणारे कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- विज बिल
- स्वयंघोषणापत्र
- खरेदी केलेल्या संचाचा बिल
- जमिनीची ठेव किंवा शेतीची प्रत
- शेतीचे कागदपत्र(7/12 उतारा व 8 चा उतारा)
- बँक अकाउंट पासवर्ड
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- मोबाईल नंबर
आता आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा.
हे देखील वाचा: PM कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2023 महाराष्ट्र,आला नवीन जीआर, पहा संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 मध्ये अर्ज कसा करावा:
मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईटवर भेट द्यावी. https://mahadbt.maharashtra.gov.in/
- त्यानंतर उजव्या बाजूला वर मराठी ऑप्शन निवडावे जेणेकरून तुम्हाला त्या पेजवरील माहिती मराठीमध्ये दिसेल.
- नंतर करी योजना या ऑप्शनवर क्लिक करावे. पुढे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टलवर पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी नवीन असाल तर नवीन वापरकर्ता ऑप्शन वर क्लिक करा.
- पुढे अर्जदाराचे म्हणजे शेतकऱ्याचे नाव, युजरनेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटी वेबसाईटवर लॉगिन तयार करा. लक्षात ठेवा यासाठी ई-मेल आयडी असणार गरजेचे आहे. मोबाईल नंबर ने वेरिफिकेशन करावे लागेल.
- लॉगिन झाल्यावर अर्ज भरा. आधार कार्ड नंबर टाकून आधार प्रमाणीकरण करून घ्या. शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती तसेच शेत जमिनीची माहिती भरा.
- महाडीबीटी पोर्टलवरून विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक शेतकरी एक अर्ज या पद्धतीद्वारे एकच अर्ज करणे अपेक्षित आहे, त्यामुळे दुसरा अर्ज करता येणार नाही. परंतु पहिला अर्ज रद्द करून पसंतीच्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्याने एकच अर्ज करता येईल. त्यासाठी पहिला अर्ज रद्द करावा लागेल.