Namo Kisan Yojana: नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यासोबतच शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढण्यासाठी विविध योजना सरकारकडून नेहमी राबविल्या जात असतात. अशाच योजनांपैकी एक चांगली योजना आहे नमो किसान योजना. तुम्हीही शेतकरी असाल तर तुम्हीही या पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपयांचा किंवा बारा हजार रुपयांचा देखील लाभ होऊ शकतो. परंतु हा लाभ काही शेतकऱ्यांनाच मिळणार आहे, जे या योजनेसाठी पात्र ठरतील.
पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये म्हणजे दोन हजाराचे तीन हप्ते टोटल 6000 रुपये पाठविले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना तर बारा हजार रुपये देखील मिळू शकतात.
आज आपण जाणून घेणार आहे की नमो किसान योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे. जसे तुम्हाला माहित आहे की सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेप्रमाणेच दर वर्षाला 6 हजार रुपये देण्यासाठी देणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अर्थात तर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या आठ प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी इतर 6 अटी सुद्धा ठेवले आहेत. ही आठ कागदपत्रे कोणती ते आपण जाणून घेऊया.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना: घरकुल योजना संपूर्ण माहिती
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- सातबारा उतारा
- बँक पासबुक पासबुक
- आणि तुमचा मोबाईल नंबर
हे देखील वाचा: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना(PMKSY)पहा संपूर्ण माहिती
काय आहे ही पी एम किसान योजना(Namo Kisan Yojana)?
माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच पी एम किसान योजना काय आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये दिले जाते. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यातही सुरू करण्यात आलेली आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे या योजनेतही 2000 प्रमाणे वार्षिक 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच फॉर्म भरणे सुरू होणार आहे. तुम्हीही आठ कागदपत्रे तुमच्याजवळ तयार ठेवा. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट ची पूर्तता करणे गरजेचे आहे, तरच आपल्याला त्या योजनेचा लाभ भेटण्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही. तुम्ही आधीपासूनच ही आठ कागदपत्रे कागदपत्रांची तुमच्याकडे असल्याची खात्री करून घ्या. लेख आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री जन औषधी केंद्र: ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे, पात्रता
दीड कोटी शेतकऱ्यांचा फायदा
Namo Kisan Yojana या योजनेचा फायदा आपल्या भारत देशातील दीड कोटी शेतकऱ्यांना होणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपयांचे बजेट या योजनेसाठी ठेवलेले आहे. जो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो त्याच्याकडे स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे. सोबतच बँक खाते, आधार कार्ड आणि आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे. त्यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे
हे देखील वाचा: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती
नमो किसान योजनेसाठी असा करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज:
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईट वरती जावं लागेल.
- त्यानंतर उजवीकडे तुम्हाला “former corner” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सात पर्याय दिसतील. त्यापैकी New Farmer registration या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर New Farmer Registration form या नावाने एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडलेला असेल.
- या पृष्ठावरतुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि captcha टाकायचा आहे.
- यानंतर continue या बटन वर क्लिक करा. तुमच्यासमोर एक मेसेज record not fount with given details असा येईल. याचा अर्थ असा की तुमच्या आधार कार्ड क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. तुम्हाला या मेसेज खाली असलेल्या ओके बटणावर क्लिक करावे लागेल.
- तुमच्यासमोर Do you want to register on Pm- kisan portal? असा मेसेज येईल.
- याचा अर्थ असा की तुम्हाला या योजनेसाठी नाव नोंदवायचा आहे का. त्याखाली असलेल्या yes या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- पुढे तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडलेला दिसेल. त्यावर सर्व वैयक्तिक माहिती भरा. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव असं सर्व भरायचं आहे.
- तुमचे नाव तुमच्या आधार कार्डवर असलेले नावाची मॅच झालं पाहिजे.
- त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे.
- म्हणजे तुमच्याकडे एक ते दोन हेक्टर दरम्यान शेती असेल तर तुम्ही पहिला पर्याय निवडा जर जास्त असेल तर आदर पर्याय निवडा.
- पुढे बँक खात्याची माहिती भरायचे आहे. सोबतच ऍड्रेस टाकायचा आहे.
- यानंतर submit for adhar authentication या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या सोबत आधार अथेंतिकेशन सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल.
- पुढे त्याला जमिनीची माहिती भरायची आहे, जसे की सर्वे नंबर, सातबारा उतारा गट क्रमांक, 8अ खाते क्रमांक इत्यादी.
- ही माहिती भरल्यानंतर add बटन वर क्लिक करा.
- ही माहिती भरून झाल्यानंतर “certify that all given details are correct” म्हणजे मी दिलेली माहिती खरी आहे असे लिहिलेल्या रकान्यात तुम्हाला टिक करायचा आहे.
- पुढे self declaration form वर क्लिक करा. शेवटी save या बटन वर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे.